ETV Bharat / state

'देशवासीय ऐक्य भावनेने कोरोना संकटावर मात करतील.. कोरोनानंतरचे संकटही तितकेच आव्हानात्मक' - corona

सर्व देशवासीय ऐक्यभावनेने कोरोनाच्या संकटावर मात करतील असा विश्वास विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभा अध्यक्ष आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये व्यक्त केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी लोकसभेतून देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला.

maharastra Assembly Speaker Nana Patole on corona virus
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
author img

By

Published : Apr 22, 2020, 1:24 PM IST

मुंबई - सर्व देशवासीय ऐक्य भावनेने आणि एकदिलाने काम करीत कोरोनाच्या संकटावर निश्चितच मात करतील. कोरोनाच्या संकटानंतर आपल्या समोर अर्थव्यवस्था सावरण्याचे तितकेच मोठे संकट उभे ठाकणार आहे, त्याचाही मुकाबला आपण अशाच ऐक्यभावनेने करुया, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

लोकसभा अध्यक्षओम बिर्ला यांनी मंगळवारी लोकसभेतून देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे विधानभवनातील आपल्या दालनातून या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले.

प्रारंभी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व राज्य विधानसभा अध्यक्षांना संबोधित केले. राष्ट्रकूल संसदीय मंडळ, लोकसभा भारत शाखा ही सर्व राज्यातील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या शाखांची मातृसंस्था आहे. संसदीय लोकशाहीच्या बळकटी करणासाठी देशात विविध उपक्रम राबविले जातात. तसेच दरवर्षी राज्य विधानमंडळांच्या पीठासीन अधिकारी यांची एक परिषदही लोकसभा सचिवालयातर्फे आयोजित केली जात असते. कोरोनाचे संकट टळल्यावर आगामी काळात हाती घेण्यात यावयाच्या उपक्रमांसंदर्भातही या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये विचारविनिमय झाला.

महाराष्ट्रात सर्व यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लवकरच आम्ही कोरोना पूर्णपणे नियंत्रीत करण्यासंदर्भात निर्णायक टप्पा गाठू. कोरोनानंतरचे अर्थव्यवस्था सावरण्याचे संकट देखील तितकेच आव्हानात्मक असणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अन्नधान्य टंचाई, बेरोजगारी, उद्योग व्यापाराच्या समस्या यापुढे आणखी गंभीर होणार आहेत. त्यादृष्टीनेही आपण सखोल नियोजन करणे आणि कार्यवाहीची रुपरेषा आखणे आवश्यक आहे, या महत्वाच्या मुद्याकडे विधानसभा अध्यक्षनाना पटोले यांनी या चर्चेप्रसंगी सर्वांचे लक्ष वेधले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.