ETV Bharat / state

HSC Paper Answer Printing : बारावीच्या पेपरमध्ये प्रश्नांसोबत उत्तरेही छापली; विद्यार्थ्यांसह शिक्षकही गोंधळले

author img

By

Published : Feb 21, 2023, 9:39 PM IST

Updated : Feb 21, 2023, 9:55 PM IST

राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या आज बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस होता. कॉफीमुक्त परीक्षा करण्याच्या नादात शासनाच्या प्रश्नपत्रिका मंडळामध्ये नाराजी आहे. शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात लक्ष घालावे, असे शिक्षकांनी म्हटले आहे. सीबीएससीच्या परिक्षेसोबत स्पर्धा करताना 12 वी मंडळाच्या पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरे छापणें हा गलथानपणा आहे, असा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला आहे.

12th Paper Answer Printing Case
12वीची परीक्षा

मुंबई: राज्यामध्ये 14 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेसाठी बसलेले आहेत. आज परीक्षेचा पहिला दिवस असल्यामुळे सर्वांनी तयारी करून परीक्षेला सामोरे गेले. मात्र बारावीच्या आजच्या पहिल्या पेपरमध्ये प्रश्नांची उत्तरे नमुन्या दाखल छापली. परीक्षा मंडळाचा गलथानपणा असल्याचं राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून टीकेची जोड उठवली गेली आहे. 10 वी व 12 वी शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी आज पासून सुरू झाली. विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयातून परीक्षेची तयारी तशी रविवारी पासून सुरू होती. कस्टडीत प्रश्नपत्रिकेवर पोलिसांची नजर ठेवली होती. मुंबई विभागीय पातळीवर चार जिल्हे मिळून तीन लाख 40 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला आजपासून बसलेले आहे. यंदा कॉपी ला आळा बसवण्यासाठी हायटेक कॉपी करणाऱ्यांना सुद्धा ब्रेक लावण्याचे काम परीक्षा मंडळांनी मनावर घेतलेले होते.

12th Paper Answer Printing Case
12वी बोेर्डचा गलथानपणा

उत्तरे छापल्यामुळे हा गलथानपणा: महाराष्ट्र उच्च माध्यमिक राज्य मंडळाच्या परीक्षांना आज मोठ्या धामधुमीत सुरुवात झाली. मात्र, राज्य मंडळाने तीन उपप्रश्नांच्या जागी संक्षिप्त उत्तरे चुकीने छापल्यामुळे बारावीच्या पहिल्या पेपरमध्येच गहजब झाला. पहिल्याच पेपरमध्ये प्रश्नपत्रिका ती नको प्रश्नांची उत्तरे छापल्यामुळे हा गलथानपणा असल्याचं शिक्षक मुख्याध्यापक या वर्तुळातून खाजगी मध्ये प्रतिक्रिया उमटू लागल्या.

अन् विद्यार्थी गोंधळले: यासंदर्भात सकाळी 11 वाजता इंग्रजी प्रश्नपत्रिका सोडवण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. पेपर देखील वेळेत सुरू झाला. विद्यार्थ्यांनी तयारी केली मात्र इंग्रजीच्या पेपरमध्ये कविता या दुसऱ्या विभागांमध्ये प्रश्नाच्या नावासह जी तीन उपप्रश्नांची उत्तरे छापण्यात आली, याबाबत शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी या उत्तरामुळे क्षणभर काहीसे गोंधळलेच. मात्र परीक्षा मंडळाकडूनच पेपर छापला जातो आणि त्यांच्याकडूनच ही चूक झाली आहे की काय? असे वाटल्यामुळे जोपर्यंत परीक्षा मंडळ या संदर्भात अधिकृत काही घोषणा करत नाही तोपर्यंत याबाबतचे ठोस उत्तर मिळू शकत नाही, असे देखील शिक्षकांकडून समजले.

हा तर गलथानपणाच: यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते शिवनाथ दराडे यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना म्हटले की, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा आणि माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा हा गलथानपणा आहे. हा भोंगळ कारभार आपल्याला CBSE, ICSE, IGC आणि इतर बोर्डांशी तुलना करून दर्जा वाढवायचा आहे. त्या स्पर्धेत महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी सतत कमी होत आहेत. अशा काळात प्रश्नपत्रिकेत उत्तरे छापणे हा गलथानपणा असून अभ्यासू विद्यार्थ्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही. बोर्डाची गरिमा कायम राहील यासाठी शिक्षणमंत्री महोदय यांनी परीक्षेकडे अधिक लक्ष द्यावे.

हेही वाचा: Sanjay Raut Supari Allegation : ठाण्यात शिजली संजय राऊतांच्या हत्येची खिचडी! वाचा संपूर्ण प्रकरण

Last Updated : Feb 21, 2023, 9:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.