ETV Bharat / state

LIVE : शरद पवार यांच्या पाठोपाठ नारायण राणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला - राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी

sharad-pawar-came-at-rajbhavn-to-meet-governor-bhagat-singh-koshyari
शरद पवार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला; तर्कवितर्कांना उधाण
author img

By

Published : May 25, 2020, 12:08 PM IST

Updated : May 25, 2020, 4:27 PM IST

16:24 May 25

मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला राजभवनावर पोहोचले आहेत.  

13:36 May 25

मुंबई - काही विमानांची उड्डाणे अचानक रद्द, पहाटे 5 वाजताच मुंबई विमानतळावर प्रवाशांनी हजेरी लावली होती. मात्र गुवाहाटी येथे जाणारे विमान रद्द झाल्याने प्रवाशांची विमानतळावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला.  

13:33 May 25

पुणे - विमानतळावरून कलकत्ता, कोचीन आणि चेन्नई येथील 372 प्रवाशांना घेऊन तीन विमानाचे उड्डाण आणि दिल्ली विमानतळावरून दोन विमानातून 158 प्रवाशी पुण्यात दाखल झाले आहेत. 

13:32 May 25

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाच्या स्वॅब तपासणीच्या लॅबची मंजूरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. येत्या १५ दिवसात जिल्हा रुग्णालयात ही लॅब उभारण्यात येणार आहे.  

12:36 May 25

raj thackeray on up workers
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पत्र

मुंबई - उत्तर प्रदेशातील कामगार हवे असतील तर राज्य सरकारची परवानगी लागेल, असे वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहे. त्यांनी, योगी म्हणतात त्याप्रमाणे असेल यापुढे महाराष्ट्रात येतानाही आमची, महाराष्ट्राची, आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही, हे ही आदित्यनाथ यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा दिला आहे.  

12:09 May 25

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणाऱ्या डॉक्टरसह 6 नवे कोरोना रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 170 वर 

11:43 May 25

Corona LIVE NEWS

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. भेटीनंतर, प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले. 'भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर भेट झालेली नव्हती. तसेच त्यांनी चहासाठी आमंत्रण दिले होते. यामुळे ही सदिच्छा भेट घेतली, यात कोरोनावर चर्चा झाली. पण कोणती राजकीय चर्चा यात करण्यात आली नाही.' 

दरम्यान, या भेटीने राजकीय चर्चांना उधान आले आहे. 

Last Updated : May 25, 2020, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.