मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघर्ष सुरु असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे अजित पवार यांचे अभिनंदन केले.
आमच्यासोबत आल्यामुळे अजित पवार,नक्कीच होणार आहे महाविकास आघाडीची हार,
अजित पवारांनी जबरदस्त उडवलाय बार,
म्हणूनच महाविकास आघाडीची होणार आहे हार - रामदास आठवले
आम्हालाही सत्तेत वाटा द्या : 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्यावेळेस राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी आमच्या सोबत आली असती तर त्यावेळेसच मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या विकासात भर पडली असती. मात्र आता राष्ट्रवादी शिवसेना भाजपासोबत आली आहे. रिपब्लिक पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील जसा शरद पवारांशी पाठीशी उभा होता. त्यांच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो. रिपब्लिकन पक्ष देखील आपल्या महायुतीतला घटक पक्ष आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमच्या पक्षाला देखील सत्तेचा वाटा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती, रामदास आठवले यांनी अजित पवारांना केली आहे.
कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी आटोपला : मंत्रिमंडळ विस्तार होणार होता मात्र, आता अजित पवार यांचा विस्तार झाला आहे. या संदर्भात मी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्हालाही मंत्री पद मिळेल, सर्वच कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी आटोपला आहे, असे मला वाटते. राहिलेला विस्तार हा राज्य मंत्र्यांचा बाकी आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकर करावा आणि त्यामध्ये आरपीआयला संधी द्यावी.
हेही वाचा -
- Ramdas Athawale On Ajit Pawar :... तरी अजित पवारांना मुख्यमंत्री होता येणार नाही; आठवले का म्हणाले असे?
- Athawale opinion on Narendra Modi: तरी मोदीच पंतप्रधान होणार; ३५० च्या वर जागा निवडून येतील- रामदास आठवले
- Ramdas Athawale On Sharad Pawar : शरद पवारांचा राजीनामा महाविकास आघाडीला मोठा धक्का : रामदास आठवले