ETV Bharat / state

Maharashtra Politics: बीआरएसचे एमआयएमच्या पावलावर पाऊल; बीआरएस भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करणारा पक्ष ठरणार का? राजकीय विश्लेषक म्हणतात...,

देशातील भाजपा सत्तेला टक्कर देण्यासाठी अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे काम इतर राज्यात करताना दिसत आहे. यापूर्वी एमआयएमने देशामध्ये आपले प्रस्थ होण्यासाठी प्रयत्न केला. एमआयएम भाजपाला अप्रत्यक्षरीत्या फायदा करून देत असल्याचा आरोप विरोधी पक्षातील काँग्रेस आणि इतर पक्षाने देखील केला आहे. त्यातच आता तेलंगणा राज्यातील बीआरएस (भारत राष्ट्र समिती) पक्ष देखील अशाच पद्धतीने महाराष्ट्रात आपले प्रस्थ निर्माण करू पाहत आहे. खरेच बीआरएस पक्ष आपला वर्चस्व महाराष्ट्रात निर्माण करेल काय? या विषयाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Maharashtra Politics
बीआरएस आणि भाजप
author img

By

Published : Jun 5, 2023, 11:07 AM IST

बीआरएसची भाजपाला अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकीत मदत यावर प्रतिक्रिया

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक राष्ट्रीय, राज्य वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रात तेलंगणा सरकारच्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या जाहिराती झळकतांना दिसत आहे. तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. सी. आर यांचा बीआरएस पक्ष सत्तेत आहे. तेलंगणा सरकारने जे जे चांगले निर्णय, कामे, सोयी सुविधा दिल्या, या विषयीच्या जाहिराती स्वरूपात दिसत आहे. राज्यात बीआरएस नावाचा एक पक्ष येऊ पाहत आहे. पावसाळ्यात ज्याप्रमाणे छत्र उगवतात. त्याप्रमाणे राज्यात वेगवेगळे राज्यातील पक्ष येत आहेत. त्यांना माहिती ज्या पक्षाचा महाराष्ट्रावर ताबा असेल, देश त्याच्या ताब्यात असेल या प्रकारचे सूत्र राजकीय पक्षांना माहित आहे.

जनतेचा कररूपी पैसा जाहिरातीत : महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, पहिले तुम्हाला राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला निवडणुकीत उभे राहावे लागेल. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक पक्ष वेगाने आले आणि तितक्याच वेगाने परत गेले. बीआरएस सर्वेसर्वा तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. तेथील जनतेचा कररूपी पैसा महाराष्ट्रात जाहिरातीत उडवला जात आहे. त्यांना महाराष्ट्रात निवडणूक लढवायची आहे. राजकारणतील या पक्षाचा बेस चुकीचा आहे. केंद्रात मोदी सरकारला सपोर्ट आणि राज्यात विरोध आहे. ज्या पक्षाची वैचारिक पातळीच कर्मट आणि गोंधळलेली आहे, त्यांना महाराष्ट्राची जनता स्वीकारणार नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे.

बीआरएस महाराष्ट्रात प्रभाव नाही : केसीआर यांच्या नेतृत्वाखालील भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही, हा आमचा ठाम विश्वास आहे. लोकशाहीनुसार प्रत्येक व्यक्तीला तसेच प्रत्येक पक्षाला आपापल्या ध्येय धोरणानुसार काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे केसीआर यांच्या महाराष्ट्रातील पक्ष बांधणीच्या प्रयत्नांकडे वेगळ्या भावनेतून पाहण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात हिंदुत्वाचा विचार घेऊन अतिशय जोरकसपणे, गतिमानतेने सर्व जाती धर्मीय, सर्व स्तरातील घटकांसाठी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे केसीआर यांच्या बीआरएस पक्षाचा शिवसेना-भाजप युतीच्या मतांवर महाराष्ट्रात कोणताही प्रभाव पडणार नाही, अशी आमची रास्त धारणा असल्याचे मत शिवसेना प्रवक्ता संजीव भोर पाटील यांचे आहे.

बीआरएसने भूमिका स्पष्ट करावी : बीआरएस मोठ्या प्रमाणावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून तेलंगणा सरकारच्या जाहिराती महाराष्ट्रात करत आहे. तेलंगणा राज्यातील जनतेचा पैसा अशा प्रकारे इतर राज्यातील वृत्तपत्रांच्या जाहिरातीत खर्च करणे कितपत योग्य आहे. तेलंगणा सरकारच्या तिजोरीतील पैसा अशा पद्धतीने जाहिरातीवर खर्च केल्याणे राजकारणात काही फरक पडेल, असे मला वाटते. त्यांना त्यांचा पक्ष राष्ट्रपक्ष करण्याची घाई आहे. भाजपा विरोधात पक्षाची भूमिका आहे किंवा नाही स्पष्ट केली नाही. एमआयएमच्या धर्तीवरच बीआरएसचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे.

बीजेपीला फायदा : सुमारे दहा वर्ष तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्रीपद म्हणून के.सी.राव यांनी भूषविल्यानंतर आता राष्ट्र पातळीवर ती आपल्या पक्ष नेण्याचे महत्वकांक्षा वाढली आहे. महाराष्ट्रात देखील त्यांनी आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बीआरएस पक्षात सध्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी सामील होत आहे. या पक्षाचा सर्वात मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसेल असे वाटते. त्यामुळे नकळत याचा फायदा राज्यात भाजपाला होऊ शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक अजय गोरड यांनी व्यक्त केले.

भाजपाला अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकीत मदत : राष्ट्रीय पक्ष करण्याच्या महत्त्वाकांक्षा पोटी बीआरएस हळूहळू महाराष्ट्रात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असाच प्रयत्न यापूर्वी एमआयएमने करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाला हरवण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष एकत्र येताना दिसत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्ष करत असताना बीआरएस निवडणुकीच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना( ठाकरे गट) मते घेणार हे अटळ आहे. त्यामुळे बीआरएस भाजपाला अप्रत्यक्षपणे मदत करेल, असे राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत. खरंच बीआरएस भाजपाला अप्रत्यक्षपणे लोकसभा निवडणुकीत मदत करण्यापेक्षा ठरेल का? हे येणारा काळच ठरवणार आहे.

हेही वाचा :

  1. Nana Patole As Future CM: केवळ बॅनरवरच नव्हे तर केकवरही 'भावी मुख्यमंत्री' म्हणून नाना पटोलेंचे नाव
  2. Politics News : राष्ट्रवादीला धक्का; 'या' आमदारांच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
  3. Ajit Pawar on OBC : भाजप जातनिहाय जनगणना टाळत आहे, ढोंगी लोकांचा पडदा पाडण्याचे काम राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केले पाहिजे- अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.