मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत 'सामना'च्या अग्रलेखातून खालच्या स्तरावरची टीका करण्यात आली. या टिकेला भाजपाकडून मुंबईत विविध ठिकाणी विरोध होत आहे. शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेरसुद्धा भारतीय युवा मोर्चाच्या नेत्यांनी 'सामना' वृत्तपत्राची होळी केली. तसेच उद्धव ठाकरे त्याचबरोबर संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेत : याप्रसंगी बोलताना भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले की, संजय राऊत यांनी "सामना" या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खालच्या स्तरावरील भाषेचा उपयोग केला आहे. त्या विरोधात आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो जर ते यापुढे असेच करत राहतील तर, "ईट का जवाब पत्थर से देंगे." आम्ही सहन करतो याचा अर्थ असा नाही की, आम्ही शांत राहिलो आहोत. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेत. पण जर तुम्ही आम्हाला मजबूर केल तर त्याला सडेतोड उत्तर त्याच पद्धतीने आमच्याकडून दिले जाईल. तसेच यांच्याकडे बोलण्यासारख काही नाही त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करत आहेत. असेही कोटेचा म्हणाले. त्याचबरोबर आमची भूमिका स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर तुम्ही खालच्या स्तरावरील भाषेचा वापर केला, तर त्याला त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्तर दिले जाईल, असा इशाराही आमदार मिहिर कोटेचा यांनी दिला आहे.
संजय राऊत यांनी "सामना" या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत खालच्या स्तरावरील भाषेचा उपयोग केला. यापुढे असेच करत राहतील तर, "ईट का जवाब पत्थर से देंगे." आम्ही सहन करतो याचा अर्थ असा नाही की, आम्ही शांत राहिलो आहोत. प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा आहेत. - मिहीर कोटेचा, आमदार
पिक्चर अभी बाकी है : याप्रसंगी बोलताना माजी मंत्री, आमदार कृपाशंकर सिंग म्हणाले की, ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है. जर यापुढे अशा पद्धतीची भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल वापरण्यात आली तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्याचा विरोध मोठ्या प्रमाणात राज्यभरात केला जाईल. याप्रसंगी भाजप प्रदेश कार्यालया बाहेर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत सामना वृत्तपत्राची होळी केली. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्याचा प्रयत्नही केला. याप्रसंगी पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
खालच्या स्तरावरची भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल वापरण्यात आली तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्याचा विरोध मोठ्या प्रमाणात राज्यभरात केला जाईल. ये तो अभी झांकी है, पिक्चर अभी बाकी है. कृपाशंकर सिंग,आमदार
काय आहे सामनाच्या अग्रलेखात? : सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे एक संवेदनशील व्यक्ती होते, पण 'उप' झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. 'मुख्य'चा 'उप' झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. 'उप'ची नशा ही 'देशी' बनावटीची आहे. कधीकाळी 'मुख्य' असणाऱ्याने आज अशी 'देशी' स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा! असे प्रकारे सामनाच्या अग्रलेखात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका करण्यात आली.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis Loksabha : फडणवीस नागपुरातून लोकसभा लढवणार? बावनकुळे म्हणाले...
- Sanjay Raut on Corruption : संजय राऊत यांची गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आतापर्यंत दोन पत्रं, भ्रष्टाचारांवर कारवाई कधी करणार...
- Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले