ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : मनसे होणार का 41 आमदारांचा पक्ष ?

author img

By

Published : Jul 12, 2022, 1:34 PM IST

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करून शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांना गुवाहाटीचे दर्शन घडवले. शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचा राजकारण (Maharashtra Political Crisis) रोज नवे वळण घेत आहे. सत्ताकारणात शिंदे गटाला दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे लागले तर हा गट मनसेत (MNS) विलीन होऊन मनसे 41 आमदारांचा पक्ष होउ शकतो (Will MNS be the party of 41 MLAs) अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

MNS
मनसे

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंडखोरी केली शिवसेनेच्या 40 पेक्षा अधिक आमदारांना गुवाहाटीचे दर्शन घडवले. सुरुवातीला शिंदे यांच्यासोबत 22 आमदार होते. ते सुरतमध्ये एका पंचतारांकित हॉटेलात थांबले. मात्र, जशी बंडखोर आमदारांची संख्या वाढायला लागली तसा या सर्वांचा मुक्काम गुजरातच्या सुरतेहून थेट आसामच्या गुहाटीमध्ये हलवण्यात आला.शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचा राजकारण रोज नवे वळण घेत आहे. आतापर्यंत शिवसेना विरुद्ध भाजप अशा सुरू असलेल्या या लढाईत आता मनसेच देखील नाव येऊ लागले आहे.

का आली मनसे चर्चेत ? : विधानपरिषद निवडणूकीचा अनेपेक्षित निकाल समोर आला. यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहे असे चित्र असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी सुरतला केलेले बंड सर्वाना आचर्याचा धक्का देणारे होते. दरम्यान हा गट मनसेमधे जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागाला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३ वेळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली अशी माहीती समोर आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील सातत्याने राज ठाकरे यांचे कौतुक केले. त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे शिंदे गट मनसेत सामील होणार का? अशा चर्चाना उधाण आले आहे.

मनसे जवळचा तिसरा पर्याय : शिंदे गटाकडे बहुमत असले तरी सर्व आमदारांचे सदस्यत्व टिकवण्यासाठी कोणत्यातरी सक्रिय पक्षात सामील होणे गरजेचे आहे. पहिला पर्याय त्यांच्याच सोबत असलेले बच्चू कडू यांचा प्रहार. परंतु प्रहार हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पर्याय नाही. दुसरा पर्याय उरतो तो भाजपा परंतु तसे केल्यास या आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, हा पर्याय सध्या सगळ्यांसाठी अडचणीचा ठरु शकतो. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे मनसे. तिसरा पर्याय या बंडखोरांनी आमदारां जवळच असल्याचे देखील दोन करणे सांगितले जातात एक म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वीकारलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्यांच्या नावा सोबतच आलेला ठाकरे हा ब्रँड.

मनसेच का ही आहेत करणं : या दोन्ही पक्षांचा विचार करूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिंदे गटाने संपर्क साधला असावा अशा देखील चर्चा आहेत. शिवसेनेचे जे हिंदुत्व आहे त्याचपद्धतीने मनसे घेऊ पाहत आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरायचे नाही असा शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये निर्णय झाला आहे. मनसे थोडेफार का होईना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात त्यामुळे शिंदे गटाला मनसेसोबत जाण्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. ज्या दिवशी हे बंड झाले त्यादिवसापासून मनसेकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हीच शांतता मनसेला एकनाथ शिंदे गटाच्या जवळ घेऊन जात आहे. यावर मनसेच्या अधिकृत प्रवक्त्यांशी त्यांच्या भूमिकेविषयी विचारणा केली असती यावर त्यांनी बोलणे टाळले.

राजकीय विश्लेषक काय सांगतात : यावर राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेतले. यावर ते म्हणाले की, "एकनाथ शिंदे हा गट मनसेमध्ये किंवा प्रहार संघटनेमध्ये विलीन होईल असे मला वाटत नाही. असे झाल्यास आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचा जो दावा केला जातोय त्याला कुठेतरी छेद मिळेल. दरम्यान, हे प्रकरण सध्या न्याय प्रविष्ठ आहे. यात न्यायालय नेमका काय निर्णय देतंय तसंच निवडणूक आयोग सुद्धा यात काय भूमिका बजावतय यावर या बंडखोर गटाचे पुढचं भवितव्य ठरणार आहे. मात्र, न्यायालयाचा निर्णय शिंदे गटाविरोधात आल्यास या सर्व 40 आमदारांना मनसेच्या इंजिनच्या आधार घेऊन सरकार चालवाव लागेल. तसेच मनसे देखील 1 आमदारांचा पक्ष न राहता 41 आमदारांचा पक्ष होईल. आणि हा एक मनसेसाठी जॅकपॉट असेल अशी चर्चा आहे.

हेही वाचा : Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एनडीएचे निमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.