ETV Bharat / state

Political Crisis In Maharashtra : राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालावर नाना पटोले यांचे मोठे विधान - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

राज्यातील सत्ता संघर्षावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षाचा निकाल लागण्याआगोदरच त्यावेळचे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. न्यायालय जो निर्णय देईल ते मान्य असल्याचे झिरवाळ यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितल्याचे पटोले म्हणाले. ते आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

Political Crisis In Maharashtra
Political Crisis In Maharashtra
author img

By

Published : May 10, 2023, 10:55 PM IST

सत्ता संघर्षाच्या निकालावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

ठाणे : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यामध्ये विधानसभेचे त्यावेळचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या वकिलाने न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांनी न्यायालयात सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करून न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असल्याचे म्हटले होते अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे. ते आज ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघेसह बहुतांश कॉंग्रेसचे स्थानिक नेते उपस्थित होते.

नाना पटोले यांची मोदी सरकारवर टीका : केंद्रात ५६ इंच छातीचे सरकार असूनही दररोज काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. ते उद्ध्वस्त होत असतानाच आज काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मात्र भाजप सरकार काश्मीर फाइल, द केरळ स्टोरी सारखे चित्रपट दाखवून लोकांमध्ये जातीवाद निर्माण करत आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. असा एखादा चित्रपटच केंद्र सरकारच्या नावाने काढाय हवा असा टोला कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारला लगावला. पटोले हे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चोरघे यांच्या भिवंडीतील निवासस्थानी आले होते. त्यावेळी पत्राकर परिषदेत त्यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.

मतदार भाजपची नौटंकी ओळखतात : कर्नाटक राज्यात कॉंग्रेसचे सरकार येणार आहे. मात्र, यापूर्वीच भाजपने कर्नाटक राज्यातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर 'द केरला स्टोरी' या चित्रपटाद्वारे निवडणुकीत जातीवादाचे कार्ड खेळत आहे. मात्र, येथील मतदार भाजपच्या नौटंकिला ओळखून असून देशात बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. व्यापाऱ्याचे अनेक मुद्दे बाजूला सारून केवळ समाजात जातीवाद पसरविण्यासाठी द कशिमर फाईल, द केरला स्टोरी असे चित्रपट भाजप दाखवून भांडणे लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
  2. Maharashtra Political Crisis : आमदारकी संकटात असलेले 'ते' 16 आमदार कोण?
  3. Maharashtra political Crisis: सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम फैसला! या आहेत शक्यता?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.