ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : साहेबांकडे जावे की दादांकडे; आमदारांची झाली गोची, पाहा आकडेवारी - अजित पवार बंड

रविवारी राष्ट्रवादीत अजित )NCP Political Crisis) पवार यांनी भूकंप घडवून आणला. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी (Maharashtra Political Crisis) होण्याचा निर्णय घेतला. तसेच रविवारी अजित पवार यांच्यासह इतर राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याकडे सध्या राष्ट्रवादीचे 8 आमदार आहेत, तर मग इतर 45 आमदार कोणासोबत आहेत व ते कुठे आहेत याबाबत स्पष्टता मिळाली नाही.

maharashtra political crisis
महाराष्ट्र राजकारण
author img

By

Published : Jul 3, 2023, 4:24 PM IST

मुंबई : राज्याचे माजी विरोधी पक्षनेते (NCP Political Crisis) अजित पवार यांनी रविवारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. अजित पवार यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता राज्यात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री असतील. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ (Maharashtra Political Crisis) देण्यात आली.

पक्षावर अजित पवारांचा दावा - अजित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत संपूर्ण पक्षच आपल्या पाठिशी असल्याचा दावा केला होता. तर सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रावादी काँग्रेसच्या ५४ पैकी ४० आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची चर्चा होती. त्यामुळे अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

अजित पवारांकडे किती आमदार - अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, हसन मुश्रीफ या बड्या नेत्यांचा सहभाग आहे. तसेच अजित पवार यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण सध्या तरी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 8 आमदार अधिकृत आहेत. विधानसभेत राष्ट्रवादीचे एकूण 54 आमदार आहेत. त्यातील 8 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत सध्यास्थितीत आहेत. म्हणजेच शरद पवार यांच्याकडे 45 आमदार सध्या आहेत. या 45 आमदारांमधील किती आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही.

maharashtra political crisis
राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या

मी असे समजतो की, ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली आहे, पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनी पलीकडे पाऊल टाकले आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही. त्यांनी कशावर सह्या केल्या असतील तर त्यामधील अनेक आमदार आमच्याशीही बोलत आहेत. अनेकजण शरद पवार यांना जाऊन भेटत आहेत. मलाही दिवसभरात बऱ्याच आमदारांचे फोन आले - जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी

सत्ताधाऱयांचे राजकीय बलाबल - सध्या भाजपकडे 105 आमदार आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 40 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे या दोघांच्याच बेरजेने विधानसभेत मॅजिक फिगर गाठली आहे. तसेच इतर पक्षाचे सात आणि अपक्ष 13 आणि आता राष्ट्रवादीचे 9 आमदार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा आकडा हा आता 174 वर पोहचला आहे.

महाविकास आघाडीचे राजकीय बलाबल - विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या एकूण आमदारांची संख्या 114 एवढी आहे. ठाकरे गटाकडे 17 आमदार, काँग्रसचे 45 तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडे सध्यास्थितीला अधिकृत 45 आमदारांचे संख्याबळ आहे. 9 आमदार वगळता राष्ट्रवादीकडे 45 आमदारांची संख्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडे केवळ 114 आमदार सध्या आहेत.

maharashtra political crisis
सत्ताधाऱ्यांच्या सदस्यांची संख्या

शरद पवारांचे साताऱ्यात शक्तिप्रदर्शन - राष्ट्रवादीत झालेल्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना पवार यांनी राजकीय लढाईचे रणशिंग फुंकले आहे.

महाराष्ट्रातील सामान्य माणूस राज्यात राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची योग्य जागा दाखवून देईल. राज्याराज्यांतील सरकारे उलधून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, पंजाब, हिमाचल प्रदेशमध्येही सुरू आहे. चुकीच्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत. याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवरायांच्या, शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातही हा प्रकार सुरू केला आहे. देशात जातीय हिंसा वाढवायची आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवून आणण्यात आली आहे - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

maharashtra political crisis
विरोधकांच्या सदस्यांची संख्या

राष्ट्रवादीचे अन्य आमदार कुठे आहेत? : अजित पवार यांच्याकडे सध्या 8 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. त्यातील जर अजित पवार यांना धरून 9 आमदार बाहेर पडले असतील तर राहिलेले अन्य 45 आमदार कुठे आणि कोणाच्या बाजूने आहेत हे अजून अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार लवकरच वेगळा निर्णय घेणार आहेत. त्यांची विचारसरणी ही राष्ट्रवादीसोबत मिळतीजुळती आहे. तसेच अनेक आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचे विधान शरद पवार यांनी केले आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील बंडाचे ईडी कारवाई हे कारण नाही - शरद पवार
  2. Maharashtra Political Crisis : अजित पवार, भुजबळ यांनी घेतली फडणवीसांची भेट; खातेवाटपाबाबत चर्चा
  3. Maharashtra Political crisis: राहुल नार्वेकर-फडणवीस यांच्यात बैठक, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आक्षेप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.