मुंबई - अजित पवार यांनी (NCP Political Crisis) रविवारी राष्ट्रवादीत बंड करत राजकीय भूकंप घडवून आणला. त्यानंतर लगेच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-
3/7/23 📍मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सागर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, तेव्हा त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगनराव भुजबळ यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल… pic.twitter.com/58DzFriHR0
">3/7/23 📍मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2023
नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सागर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, तेव्हा त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगनराव भुजबळ यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल… pic.twitter.com/58DzFriHR03/7/23 📍मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 3, 2023
नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सागर निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, तेव्हा त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या.
मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या छगनराव भुजबळ यांनाही शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल… pic.twitter.com/58DzFriHR0
खातेवाटपावर चर्चा - रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घतली. तसेच राष्ट्रवादीच्या अन्य 8 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण आता या सर्व मंत्र्यांना कोणती खाती मिळणार हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे खातेवाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सध्या शिवसेना आणि भाजपच्या अनेक मंत्र्यांकडे अतिरिक्त खाती आहेत. त्यामुळे त्यातील अनेक खाती ही आता राष्ट्रवादीच्या शपथ घेतलेल्या 9 मंत्र्यांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
राहुल नार्वेकरांसोबत बैठक - सोमवारी सकाळपासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही याबैठकीला बैठकीला हजर होते. त्यामुळे अजित पवार यांची राहुल नार्वेकरांसोबत काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.
-
#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar along with NCP leaders Praful Patel, Chhagan Bhujbal and Lok Sabha MP Sunil Tatkare met Dy CM Devendra Fadnavis in Mumbai today
— ANI (@ANI) July 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
NCP leader Sunil Tatkare's daughter & MLA, Aditi Tatkare was inducted into the Shinde-BJP cabinet yesterday pic.twitter.com/TU8dYP6rqD
">#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar along with NCP leaders Praful Patel, Chhagan Bhujbal and Lok Sabha MP Sunil Tatkare met Dy CM Devendra Fadnavis in Mumbai today
— ANI (@ANI) July 3, 2023
NCP leader Sunil Tatkare's daughter & MLA, Aditi Tatkare was inducted into the Shinde-BJP cabinet yesterday pic.twitter.com/TU8dYP6rqD#WATCH | Maharashtra Deputy CM Ajit Pawar along with NCP leaders Praful Patel, Chhagan Bhujbal and Lok Sabha MP Sunil Tatkare met Dy CM Devendra Fadnavis in Mumbai today
— ANI (@ANI) July 3, 2023
NCP leader Sunil Tatkare's daughter & MLA, Aditi Tatkare was inducted into the Shinde-BJP cabinet yesterday pic.twitter.com/TU8dYP6rqD
अजित पवारांचे बंड - रविवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड केले. त्यानंतर त्यांनी शिंदे फडणवीस सरकारला जाहीर पाठिंबा दिला. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्र्वादीच्या अन्य 8 आमदारांनीही रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली. पण खातेवाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
बैठकीला बड्या नेत्यांची हजेरी - अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे हे या बैठकीला हजर होते. तसेच अन्य राष्ट्रवादीचे बडे नेते देखील यावेळी हजर होते.
हेही वाचा -