मुंबई : आजवर महाराष्ट्रात अनेक राज्यपाल (Governor Bhagat Singh Koshari) झाले. त्या राज्यपालांचा नावलौकिकही होता. मात्र हे राज्यपाल नाहीत. राज्यपालांची हकलपट्टी करा, अशी मागणी ही शरद पवार यांनी महामोर्चादरम्यान (Mahavikas Aghadi Hallabol Morcha) आपल्या भाषणातून केली आहे.
कर्नाटकमधील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील व्हावा - संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांवर सत्तर वर्ष आधी देखील मोर्चे निघाले होते. कर्नाटकमधील मराठी भाषिक भाग महाराष्ट्रात सामील व्हावा, ही या मोर्चाची भावना होती. मात्र ते होऊ शकले नाही; पण आताही महाराष्ट्रावर हल्ले होत आहेत. (Latest news from Mumbai) महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत, असे ज्वलंत मुद्दे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाषणातून मांडले. (Mumbai Crime)
शरद पवार यांचा सवाल : सत्तेतील एक मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागितले अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करतात. पण या महापुरुषांनी महाराष्ट्रात सर्वसामान्य शोषित वर्गासाठी शिक्षणाची दालने खुली केली, हे सत्ताधारी पक्ष विसरले का? असा सवाल शरद पवार यांनी या मोर्चाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.