मुंबई - शैक्षणिक वर्षाच्या फी साठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून तगादा लावणाऱ्या मुंबईतील महाविद्यालयांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पत्र पाठवून फी भरण्यास तगादा न लावू नये, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागले, असा इशारा उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी पत्राद्वारे दिला आहे.
महाविद्यालयांनी शैक्षणिक वर्षांसाठी शुल्क वाढवू नये. तसेच ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल अशा विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना फी सुलभ हफ्त्याने भरण्याची मुभा द्यावी, असे परिपत्रक मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काढले आहे. तरीही अनेक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना फीसाठी सतत विचारणा होत आहे. कोरोनामुळे काही काळ शिक्षण ऑनलाइन माध्यमातून होणार आहे.
कोरोनाच्या झालेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा सर्वांचा विचार करून महाविद्यालयांच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना हफ्त्याने फी भरण्याची सवलत द्यावी. फी भरण्यासाठी सतत तगादा लावू नये, अन्यथा त्या महाविद्यालयांना महाराष्ट्र विद्यार्थी सेनेच्या रोषाला सामोरे सेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा महाराष्ट्र विद्यार्थी सेनेकडून महाविद्यालयांना पत्राद्वारे देण्यात आला आहे.
हेही वाचा - अंतिम परीक्षा रद्द प्रकरणी माजी शिक्षणमंत्री आशिष शेलारांचा ट्विटरवरून सरकारवर निशाणा