ETV Bharat / state

Maharashtra Monsoons session 2023: नवी मुंबईतील विमानतळ पुढील वर्षी सुरू होणार-देवेंद्र फडणवीस - Ajit Pawar in Monsoon session

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक कोणता मुद्दा उचलणार? विरोधी पक्षनेत्यांची आज निवड होणार का? सत्ताधारी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कोणत्या घोषणा करणार हे, आजच्या अधिवेशनात दिसून येणार आहे.

Maharashtra Monsoons session 2023
विधिमंडळ पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jul 21, 2023, 9:27 AM IST

Updated : Jul 21, 2023, 1:09 PM IST

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. अधिवेशनात गुरुवारी रायगडमधील दुर्घटनेबाबत चर्चा करण्यात आली. गेली चार दिवस विरोधी पक्षनेत्यांशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालले आहे. विरोधी पक्षनेत्याची आज निवड होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Live Updates

  • नवी मुंबईतील विमानतळ पुढील वर्षी सुरू होणार आहे. नवी मुंबईतील विमानतळामुळे राज्यातील विमान सेवा वाढविता येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृत्यूवरून विधानपरिषद सभागृहात गोंधळ सुरू आहे. यावर उत्तर देताना यावरून राजकारण नको, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
  • शालेय विद्यार्थ्यांचे ९२ टक्के आधार कार्ड व्हेरिफेकेशन झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात साडेतीन हजार मुले तर तीन हजार सहाशे मुली शाळाबाह्य असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी सभागृहात दिली.
  • मणिपूरच्या सरकारचा निषेध करणारा ठराव झाला पाहिजे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. मात्र, अध्यक्षांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांचा निषेध करून आम्ही सभागृहातून बाहेर पडलो आहोत, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. प्रणिती शिंदे म्हणाल्या, सामूहिक हत्याचार होऊन धिंड घडत असेल तर लाजिरवाणी बाब आहे. मोदींची विचारसरणी ही महिलांच्या विरोधात आहे. हा मणिपूरचा नाही, तर देशाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आम्हाला बोलण्याची परवानगी नाकारली आहे. त्यावरून गांभीर्य नसल्याचे कळते.
  • मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानसभेत सभात्याग केला आहे.
  • विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यातील विरोधकांकडून केंद्र सरकाचा निषेध करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले आहे.

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काय घडले?

नीलम गोऱ्हे यांचे अधिकार अबाधित- तत्कालीन तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी उपसभापती नीलम गोर्‍हे यांचे सर्व अधिकार अबाधित राहणार असल्याचा निर्णय दिला. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. जोपर्यंत सदस्य अपात्र ठरत नाही तोपर्यंत सदस्याला सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार आहे, असेही डावखरे म्हणाले. अनिल परब यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अपात्रतेचा मुद्दा मंगळवारी उपस्थित केला होता. त्या विषयावरील चर्चेनंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले नसल्याने त्यांच्या अपात्रतेचा प्रश्न उपस्थित होत नाही. नीलम गोऱ्हे या उपसभापती पदावरून काम करणे हे घटनेनुसार असल्याचेही त्यांनी म्हटले.

मनी लाँड्रिंग कायद्यातील सुधारणेबाबत शाह यांच्याशी चर्चा करणार-मनी लाँड्रिग कायद्यात आता जीएसटीतील करचुकवेगिरीचा समावेश होणार आहे. याबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये भीती आहे. यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, की जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या दौऱ्यात हा मुद्दा अमित शाह यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. या कायद्यामुळे अनेकांना विशेषत: व्यापाऱ्यांना त्रास होऊ शकतो, असे बैठकीत सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार येणार- शेतकरी पिक विमा योजनेसंदर्भात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, की योजनेचा राज्यातील लाखो शेतकरी लाभ घेत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपणा यामुळे आता थांबणार आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजना आणि पंतप्रधान योजनेमुळे 12000 रुपये येणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत चार कोटी 69 लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.

हेही वाचा-

  1. Neelam Gorhe : नीलम गोर्‍हे उपसभापतीपदी कायम राहणार; तालिका निरंजन डावखरेंचा निर्णय
  2. Monsoon Session 2023: शेतकरी पिक विमा योजना राज्याला तारक - कृषी मंत्री मुंडे
  3. Yashomati Thakur Criticizes BJP : मणिपुरात हैवानाचे राज्य; दोन महिलांवर सामूहिक बलात्कार प्रकरणी यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

Last Updated : Jul 21, 2023, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.