मुंबई- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील शेवटच्या आठवड्याचा आज दुसरा दिवस आहे. उद्योमंत्री उदय सामंत हे उद्योगाबाबत श्वेतपत्रिका काढणार आहेत. दुसरीकडे संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणार आहेत.
Live updates-
- जो या खूर्चीवर ( विरोधी पक्षनेते पद) बसेल तो तिकडे जातो. त्या खूर्चीवर काहीतरी पूजा केली पाहिजे. कोणती पूजा करायला हवी, हे मुख्यमंत्री शिंदे यांनाच विचारा, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.
- आधी विदर्भात शिवसेना नव्हती. विजय वडेट्टीवार यांनी विदर्भात शिवसेना वाढविली. विरोधी पक्षनेते पद मिळणे ही एक संधी असून सन्मानाचे पद आहे. ते पदाला न्याय देतील, अशा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिकामे होते.
- विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की वडेट्टीवार विदर्भाचा बुलंद आवाज आहेत. विदर्भातील प्रश्न त्यांनी आक्रमकपणे मांडले आहेत. यापूर्वी त्यांची शिवसैनिक म्हणून ओळख होती. वडेट्टीवार यांचा आवाज माईकपेक्षा जास्त आहे. ते मैत्री जपणारे नाते आहेत. चंद्रपुरात मोठ्या आवाजाची स्पर्धा आहे, अशी कोपरखळी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना मारली आहे.
- काँग्रसेचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की वडेट्टीवार यांची तशी निवड उशीरा झाली आहे. आम्ही वडेट्टीवारांशी हात मिळविले तर काही जण घाबरले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. वडेट्टीवार हे मुळचे शिवसेनेचे असन झुंजार नेते आहेत. विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करतो. ते विरोधी पक्षनेते पदाला न्याय देतील, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
- एडेलवाईज कंपनी ही टेकओव्हर करा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी एडेवाईज ही आधुनिक सावकारी असल्याचा आरोप केला आहे. रसेल शाह यांची चौकशी करा, अशीदेखील त्यांनी मागणी केली आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.
- वनविभागाच्या परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांकडून 1000 परीक्षा शुल्क घेण्यात आले. मात्र छत्रपती संभाजीनगर याठिकाणी मास कॉपी करताना विद्यार्थी पाहायला मिळाले. अशा वारंवार घटना पाहायला मिळत आहेत. एखादा सेंटरवर अशा पद्धतीने कॉपी होत असेल तर दुसरा सेंटरवरच्या मुलांवर अन्याय होताना दिसून येतो. भाजप प्रणित असणाऱ्या राज्यांमध्ये उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये भाजपचे पदाधिकारी क्लास घेतात. त्या ठिकाणचे विद्यार्थी पास होतात. बाकीचे विद्यार्थी पास होत नाहीत असे देखील निदर्शनास आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
अधिवेशनात बुधवारी काय घडले? संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल विधानसभेत बुधवारी गदारोळ झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले की, गांधीजी असोत की सावरकर, महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. नाही. आक्षेपार्ह लिखाणातून सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे मुखपत्र शिदोरीवर कारवाई केली जाईल, असा त्यांनी इशारा दिला. भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचा मुद्दा काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित करून निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी केली. मात्र, सभापती राहुल नार्वेकर यांनी ही मागणी फेटाळून लावली.
जातीय तेढ निर्माण करू नये-फडणवीस- समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी म्हणाले की, एकीकडे सरकार सोशल मीडियावर औरंगजेबाचा दर्जा ठेवल्याबद्दल काही लोकांवर कारवाई करत आहे. मात्र दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर मुघल बादशहाच्या कबरीला भेट दिल्याबद्दल कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यावर उपमुख्यमंत्री फडणीस म्हणाले, की औरंगजेब हा एक शासक होता. तो औरंगाबादमध्ये मरण पावला होता. त्याला तिथेच दफन करण्यात आले होते. ते एक संरक्षित स्मारक आहे. आपण लोकशाही आहोत. जातीय तेढ निर्माण करू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-