मुंबई - मराठा समाजाच्या न्याय-हक्कासाठी नव्याने स्थापन झालेला पक्ष महाराष्ट्र क्रांती सेना व गेल्या वीस वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे बळीराजा शेतकरी संघटना हे २ राजकीय पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकत्र लढणार आहेत. या दोन्ही पक्षांनी राज्यातील सर्व ४८ जागेवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. यासाठी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे आज (बुधवार) संयुक्त पत्रकार परिषदेत याची घोषणा केली.
हे दोन पक्ष व इतर संघटना कोणत्या प्रलंबित प्रश्नावर काम करणार आहेत. तर मराठा आरक्षण, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा आंदोलनामध्ये दाखल झालेले खोटे गुन्हे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतीगृह, अरबी समुद्रातील शिवस्मारक, पार्टीच्या धर्तीवर सार्थी, आत्मबलिदान दिलेल्या युवकांना आर्थिक मदत, शेतकरी कर्जमाफी स्वामीनाथन आयोग, मेगा भरती, कोपर्डी खटला या सर्व विषयांमध्ये समाजाची फसवणूक झाली आहे. तसेच शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय स्वामीनाथन आयोग वाढत चाललेली शेतकरी आत्महत्या दुष्काळ शेतकऱ्याचे जुने कायदे रद्द करणे, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया केंद्र, शेतकरी पेन्शन योजना चालू करणे, या सर्व अडचणी सोडविण्यासाठी हे सरकार यशस्वी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करणार आहेत, असे सुरेश पाटील यांनी सांगितले.
राज्यातील मराठा समाज तमाम शेतकरी वर्ग मुस्लीम समाजाचा आरक्षण, लिंगायत समाजाचा धर्माचा प्रश्न, धनगर समाजाच्या आरक्षण राज्यामध्ये जाती-जातीमध्ये भेदभाव या सर्वाला महाराष्ट्रातील जनता वैतागली आहे. सर्वसामान्य जनतेला तिसरा पर्याय आवश्यक आहे, म्हणून राज्यामध्ये महाराष्ट्र क्रांतीसेना बळीराजा शेतकरी संघटना तसेच जय जवान जय किसान किसान क्रांती शेतकरी संघटना एकत्र येऊन राज्यातील ४८ लोकसभेत जागा लढवून जागा लढविणार आहेत, महाराष्ट्र क्रांती सेना व बळीराजा शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीसाठी पुढील उमेदवार प्रत्येक जिल्हा निहाय उभे करणार आहेत.
जिल्हा आणि उमेदवार -
सातारा पंजाबराव पाटील, हातकणंगले सुरेश पाटील, कोल्हापूर परेश भोसले, नितीन पाटील, सांगली डॉ. उमेश देशमुख, महादेव साळुंखे, माढा संजय पाटील-घाटणेकर, उमेश पाटील, उस्मानाबाद रामजीवन बोंदर, भीमाशंकर बिराजदार, लातूर वैजनाथ पाटील, बारामती गणेश जगताप, रायगड संजय सावंत, रत्नागिरी एसटी सावंत, अशोक जाधव, भंडारा संजय टेंभरे, नागपूर प्रशांत पवार, चंद्रपूर प्रदीप बोबडे, ठाणे रवींद्र साळुंखे, उत्तर पश्चिम मुंबई उल्हास पाटील, दक्षिण उत्तर मुंबई विलास सावंत, कल्याण धनगराज शहा, जळगाव वंदना पाटील, नाशिक शरद पाटील, बीड अॅड. कारंडे, जालना पांडुरंग माळी-मांडलेकर, दिंडोरी अभिजीत गायकवाड.