ETV Bharat / state

गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, गृहमंत्रालयाने जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना - सार्वजनिक गणेशोत्सव मार्गदर्शक सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:16 PM IST

मुंबई - सध्या महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचनांचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, विसर्जनावेळी गर्दी टाळण्यासाठी मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी किंवा २०२१च्या भाद्रपद महिन्यात करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी शासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना -

1) सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाची स्थानिक धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

2) कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच न्यायालयाने दिलेले आदेश आणि महानगरपालिका किंवा स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या नियामांचा विचार करुन मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भंपकपणा नसावी.

3) सार्वजनिक मंडळासाठी जास्तीत जास्त ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मूर्ती असाव्यात.

4) यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तींचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तींचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्‍य आहे. जेणेकरून गणेशाचे आगमन व विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.

5) उत्सवासाठी देणगी व वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास प्राधान्य द्यावे.

6) सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

7) आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी तसेच ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.

8) गणपतीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.

9) गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सिंग), मास्क, सॅनिटायझरचा वापर इत्यादी नियम पाळले जातील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

10) गणपतीची आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.

11) महानगरपालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.

12) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी तयार केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होऊपर्यंतच्या मधल्या कालावधीत आणखी काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील पालन करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.