ETV Bharat / state

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची केंद्राकडे मागणी - महाराष्ट्र पोलीस कोरोना पॉझिटिव्ह केसेसे

सध्या राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे.

maharashtra home minister anil deshmukh  गृहमंत्री अनिल देशमुख लेटेस्ट न्युज  maharashtra corona update  maharashtra police corona positive  १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा  महाराष्ट्र पोलीस कोरोना पॉझिटिव्ह केसेसे  केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : May 13, 2020, 1:40 PM IST

Updated : May 13, 2020, 3:21 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनामुळे पोलीस दलातील जवळपास 1007 हून अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी संक्रमित झाले आहेत. तसेच सध्या सुरू असलेला रमजान व येणारा ईद सण याच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलीस दलाच्या मदतीसाठी केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या(CAPF) वीस कंपन्यांची मागणी करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या द्या, गृहमंत्री अनिल देशमुखांची केंद्राकडे मागणी

सध्या राज्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या ३२ कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने पोलीस दल कार्य करत आहे. मात्र, पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे. पोलिसांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या मिळाव्यात, अशी मागणी केली असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात १००७ हून अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, अनेकजण लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना दिसत नाही. लॉकडाऊनची कडेकोट अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे १००७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर अद्यापही ८८७ पोलिसांवर उपचार सुरू असून यामध्ये ९१ पोलीस अधिकारी आणि ७९६ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या कंपन्या राज्यात पाठवाव्या, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.

Last Updated : May 13, 2020, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.