ETV Bharat / state

शासकीय अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांची मिळणार सूट - उदय सामंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क व्यतिरिक्त इतर शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

http://10.10.50.85//maharashtra/24-June-2021/mh-mum-7209757_24062021215351_2406f_1624551831_537.jpeg
शासकीय अभियांत्रिकी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शैक्षणिक शुल्कात २५ टक्क्यांची मिळणार सूट
author img

By

Published : Jun 24, 2021, 10:14 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्क व्यतिरिक्त इतर शुल्कात २५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यामुळे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

२० हजार विद्यार्थ्यांना होणार फायदा -
शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी (ट्यूशन) शुल्क शिवाय इतर शुल्क भरावे लागते. त्यामध्ये कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून इतर शुल्क मधील १६ हजार २५० रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना होईल.

बैठकीत घेतले महत्वपूर्ण निर्णय -
माटुंगा येथील वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व संबंधित महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. या बैठीकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच हॉटेल मॅनेजमेंट संस्थेअंतर्गत असलेले ३० रुमचे प्रशिक्षण केंद्र ऑडिटोरिअम व बँकेट हॉल वापरण्यासाठी, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सर्व सुविधा नूतनीकरण करुन पंचतारांकित हॉटेल सोबत सामंजस्य करार करावा. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

वसतिगृहास ‘मातोश्री’ या नावाने नामकरण -
या बैठकीत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, गुरू गोविंद सिंहजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान नांदेड, महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, कराड, चंद्रपूर, अमरावती यांचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर व्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने या वसतिगृहास ‘मातोश्री’ या नावाने नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली.

हेही वाचा - पंजाबमध्ये एकच शिवसेना, बोगस संघटनेशी काडीचा संबंध नाही - गुलाबचंद दुबे

हेही वाचा - महाराष्ट्रात 5 हजार नोकऱ्या मिळणार, १६ हजार ५०० कोटींच्या गुंतवणुकीचा करार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.