ETV Bharat / state

डोळ्यापुढे धूर.. गुदमरणारा श्वास..अन् आक्रोश.. 'झेन'ने सांगितला आगीचा थरार - zen sadavarte news

मुंबईच्या झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती.

zen sadavarte
झेन सदावर्ते
author img

By

Published : Jan 22, 2020, 7:13 PM IST

Updated : Jan 22, 2020, 8:11 PM IST

मुंबई - प्रजासत्ताक दिनी दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यामध्ये मुंबईच्या झेन सदावर्ते आणि औरंगाबादचा आकाश खिल्लारे या दोघांना राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. झेन सदावर्ते हिने तिच्या इमारतीला लागलेल्या आगीतून 17 जणांची सुखरूप सुटका केली होती.

राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त झेन सदावर्ते

झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायालयातील वकील अॅड. गुणरतन सदावर्ते यांची मुलगी आहे. गेल्यावर्षी 22 ऑगस्ट 2018 ला सकाळी मुंबईतील परळ येथील क्रिस्टल टॉवर या 17 मजली इमारतीला आग लागली. या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण जखमी झाले होते. 16 व्या मजल्यावर राहणाऱ्या झेनच्या घरातही आगीचा धूर पसरला. ते बघूनच झेनची आई घाबरली आणि टाहो फोडून रडू लागली. त्या आवाजाने झेनची झोप मोडली आणि ती खडबडून जागी झाली. तिने आसपास बघितले आणि काय झाले आहे त्याचा अंदाज घेतला. दार उघडले तर समोरच्या जिन्यातून धूर येत होता. जवळ वास्तव्य करणारे शेजारी सैरावैरा पळत आक्रोश करत होते, अशा वेळी झेनने न घाबरता 17 जणांचे प्राण वाचवले.

या साहसाकरिता तिला ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ती सध्या पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्ली येथे गेली आहे. शाळेत शिकलेली गोष्ट आपण अंमलात आणून सर्वांचे प्राण वाचवले होते, असे झेनने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

Intro:राष्ट्रीय बाळ शौर्य पुरस्कार प्राप्त झेन सदावर्तेला काय वाटत जाणून घ्या !

मुंबईच्या परळ भागातील राहत्या इमारतीत आग लागून झालेल्या घटनेत झेन सदावर्ते या 10 वर्षाच्या मुलीने 17 जणांचे प्राण वाचविले. याच झेनला तिचं शौर्य पाहून देशातील महत्वाचे समजले जाणारे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार या 26 जानेवारीला मिळणार आहे.याच झेन सदावर्तेला याबाबद्दल काय वाटतं खास ईटीव्ही भारतला तिने प्रतिक्रिया दिली आहे.

काय होती घटना ?

मुंबईतल्या परळ भागात क्रिस्टल टॉवर या गगनचुंबी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर अकस्मात आगडोंब उसळला होता. तेव्हा त्या इमारतीत वास्तव्य करणार्‍या अनेक कुटुंबांची तारांबळ उडालेली होती. कारण तिथली अग्निशमन व्यवस्था नादुसरुस्त होती आणि कोणाला काय करावे ते सुचत नव्हते, की माहिती नव्हते. अशावेळी सोळाव्या मजल्यावर वास्तव्य करणार्‍या सदावर्ते कुटुंबातली बारा वर्षाची कन्या झेन गाढ झोपलेली होती. तिच्या वडीलांनी आपल्या बाथरूमधला गिझर तपासला तर त्यातून धुर येत होता. ते बघूनच झेनची आई घाबरली आणि टाहो फ़ोडून रडू लागली. त्या आवाजाने झेनची झोप मोडली आणि ती खडबडून जागी झाली. तिने आसपास बघितले आणि काय झाले आहे त्याचा अंदाज घेतला. फ़्लॅटचे दार उघडले तर समोरच्या जिन्यातून धुर येत होता आणि जवळ वास्तव्य करणारे शेजारीही सैरावैरा पळत आक्रोश करीत होते. अशा प्रसंगात बारा वर्षाच्या शाळाकरी मुलीने काय करायला हवे होते? नुसता एका बारा वर्षाच्या मुलीचा चेहरा समोर आणा आणि तिला अशा प्रसंगात झोकून द्या. क्षणात आपल्या डोळ्यासमोर काय चित्र उभे राहिल? आईबाप व शेजारीपाजारी यांचा आक्रोश बघून तीही बालिका टाहो फ़ोडून घाबरलेली तुम्हाला दिसू लागेल. जीवाचा आकांत करताना भासेल. पण झेन सदावर्ते त्याला अपवाद होती. ती तितक्या जीवघेण्या परिस्थितीलाही घाबरली नव्हती आणि आता आपणच ही परिस्थिती संभाळू शकतो, अशा आत्मविश्वासाने कामाला लागली. तिने पुढल्या काही मिनीटात मृत्यूच्या दाढेतून सतरा प्रौढ व वृद्धांना सुखरूप बाहेर काढून दाखवले. ह्याला विद्यमान शहरी जीवनातला चमत्कार मानावा लागेल. या चिमुरडीने नुसते कोणाचे प्राण वाचवलेले नाहीत, तर देशातल्या एकाहून एक मोठ्या विद्वान, शासकीय अधिकारी व राज्यकर्त्यांना लाज वाटण्याची स्थिती निर्माण करून ठेवली होती .

अशा ह्या झेनच्या प्रसंगावधानाने व धाडसामुळे 17 जणांचे प्राण वाचले तिच्या या साहसाकरिता ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.ती सध्या पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्ली येथे गेली आहे.झेन ही हायकोर्टाचे वकील गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी आहे.तिने बोलताना झालेल्या घटनेबद्दल सांगितले आणि शाळेत शिक्षणात आपल्याला जे शिकविले होते, ते आपण कसे केले. याबद्दल तिने सांगितले. तसेच अशा एखाद्या घटना घडल्या तर कस प्रसंग सावधान होऊन कृती करावी याबद्दल आणि अनेक सामाजिक संदेश झेनने ईटीव्ही भारत च्या माध्यमातून लोकांना दिले आहेत.Body:नॉर्मल बाईट्स पण शेर केल्या आहेत नॅशनल ला द्यायलाConclusion:।
Last Updated : Jan 22, 2020, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.