मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्या आज घटली असून दिवसभरात 22 हजार, 444 रुग्णांची नोंद झाली आहे. ( Maharashtra Corona Update 30 January 2022 ) तर 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याची ( 50 Corona Patients Died on 30 January 2022 ) आकडेवारी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे. शनिवारी रुग्ण संख्येत किंचित वाढ झाली होती. मात्र, रविवारी रुग्णसंख्या घटल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. ओमायक्रोनचे पाच रुग्ण आढळून आले आहे. सर्व रुग्ण पुणे मनपा विभागातील आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट स्थिर झाली असून रुग्ण संख्येत चढ-उतार होत आहे. शुक्रवारी 27 हजार 971 रुग्ण आढळून आले होते. आज 22 हजार 444 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.85 टक्के इतका आहे. दिवसभरात 39 हजार 15 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 73 लाख 31 हजार 801 करोना बाधित बरे झाले आहेत. यामुळे बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण 95.14 टक्के इतके आहे. तर 7 कोटी 45 लाख 2 हजार 688 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 77 लाख 5 हजार 969 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 12 लाख 61 हजार 198 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3332 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 27 हजार 771 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
आणखी पाच ओमायक्रॉन रुग्ण -
राज्यात रविवारी पाच ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. दिवसभरात नोंद झालेल्या रुग्णांमध्ये पुणे मनपातील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 3 हजार 130 ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी १ हजार ६७४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ६ हजार ६०५ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ६ हजार ५१० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 1160
ठाणे - 109
ठाणे मनपा - 262
नवी मुंबई पालिका - 403
कल्याण डोबिवली पालिका - 99
मीरा भाईंदर - 65
वसई विरार पालिका - 72
नाशिक - 204
नाशिक पालिका - 686
अहमदनगर - 566
अहमदनगर पालिका - 274
पुणे - 1491
पुणे पालिका - 3897
पिंपरी चिंचवड पालिका - 1978
सातारा - 301
नागपूर मनपा - 1846