ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात 18 हजार 67 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 79 रुग्णांचा मृत्यू - नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ

राज्यात कोरोनाच्या ( Maharashtra Corona Update ) रुग्ण संख्येत चढ-उतार होताना दिसून येत आहेत. दिवसभरात 18 हजार 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 79 रुग्णांचा यापैकी मृत्यू झाला आहे. राज्यात ओमाक्रॉन विषाणूचे ( Omicron Variant ) 113 नवे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Feb 2, 2022, 9:16 PM IST

Updated : Feb 2, 2022, 10:58 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या ( Maharashtra Corona Update ) रुग्ण संख्येत चढ-उतार होताना दिसून येत आहेत. दिवसभरात 18 हजार 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 79 रुग्णांचा यापैकी मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.84 टक्के इतका आहे.

दिवसभरात 36 हजार 281 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 74 लाख 33 हजार 633 कोरोना रुग्ण बाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बधितांचे प्रमाण यामुळे 95.87 टक्के इतके आहे. 7 कोटी 49 लाख 51 हजार 750 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10.34 टक्के इतके म्हणजेच 77 लाख 53 हजार 548 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9 लाख 73 हजार 417 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 1 लाख 73 हजार 221 सक्रिय कोरोना रुग्ण ( Active Corona Cases ) आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचे 113 रुग्ण - राज्यात ओमायक्रोनच्या 113 नव्या बाधितांची ( Omicron Variant ) आज ( दि. 2 फेब्रुवारी ) नोंद झाली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने 109 तर 4 बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाने अहवाल तपासले आहेत. नागपूरमध्ये सर्वाधिक 42, मुंबई आणि ठाणे महानगरपालिका 18, नवी मुंबईत 13, पुणे महाननगरपालिका 6, अमरावती 4, सातारा 3, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 2 रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत 3 हजार 334 एवढे रुग्ण आहेत. तर 1 हजार 701 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आज पर्यंत 6 हजार 898 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6 हजार 739 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 159 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
  1. मुंबई महापालिका - 1 हजार 121
  2. ठाणे - 106
  3. ठाणे महानगरपालिका - 184
  4. नवी मुंबई पालिका - 315
  5. कल्याण डोंबिवली पालिका - 158
  6. मीरा भाईंदर - 40
  7. वसई विरार पालिका - 59
  8. नाशिक - 194
  9. नाशिक पालिका - 788
  10. अहमदनगर - 603
  11. अहमदनगर पालिका - 323
  12. पुणे - 1 हजार 262
  13. पुणे पालिका - 2 हजार 966
  14. पिंपरी चिंचवड पालिका - 1 हजार 599
  15. सातारा - 488

हेही वाचा - GST Compensation : निर्मला सीतारामन यांच्या भाषणात राज्यांना जीएसटी परताव्याचा उल्लेख नाही; राज्यांची डोकेदुखी वाढली?

Last Updated : Feb 2, 2022, 10:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.