मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर महाराष्ट्र काँग्रसने चांगलाच निशाणा साधला आहे. देशमुख यांच्या २ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे २२ कोटी ८४ लाख रुपये थकवले आहेत. सहकारमंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कारखान्याला ऊस घातल्यानंतर १४ दिवसात ऊसाचे बील देणे बंधकारक असते. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कारखान्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल २२ कोटी ८४ लाख रुपये थकवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. उसाचा गत हंगाम संपून पुढचा हंगाम येण्याची वेळ झाली तरी जिल्ह्यातील 25 साखर कारखान्यांनी शेतकर्यांची ऊस बिलाची देणी दिली नसल्याची बाब उजेडात आली आहे. तब्बल 483 कोटी 59 लाख रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शेतकरी संघटनाही याप्रश्नी मूग गिळून गप्प आहेत.