मुंबई - भाजप सरकारने तांदळावरील सवलत देणे बंद केल्याने तांदूळ निर्यातदारांना मोठा फटका बसत आहे. या निर्णयामुळे तांदळाच्या निर्यातीने गेल्या ७ वर्षातील निच्चांकी पातळी गाठली आहे. सरकारच्या या गलथान कारभारामुळे देशाची सर्वच क्षेत्रात अधोगती झाल्याचे म्हणत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला.
सरकारने तांदळावरील सवलत देणे बंद केले आहे. या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले. भारतापेक्षा छोटे असणारे व्हिएतनाम आणि म्यानमारसारखे देश तांदळावर सवलत देत आहेत. मात्र, हे सरकार निर्यातदारांना प्रोत्साहन देत नसल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे. सरकारच्या या चुकीच्या कारभारामुळे देशाची सर्वच क्षेत्रात अदोगती झाल्याचे मत काँग्रेसने व्यक्त केले आहे.