ETV Bharat / state

कोरोनाची तिसरी लाट नियोजनातून रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश - कोरोना

येत्या काळात तिसरी लाट येईल, अशी भिती वर्तवली जात आहे. ही बाब विचारात घेत, राज्यातील वैद्यकीय यंत्रणांनी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार-कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

Maharashtra CM uddhav Thackeray holds virtual meet with top industrialists for Covid measures

author img

By

Published : Jul 13, 2021, 12:08 AM IST

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक चक्र सुरू ठेवण्यासाठी नियोजनबध्द काम करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिल्या. भारतीय औद्योगिक महासंघ अर्थात सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

आर्थिक चक्राच्या दृष्टीने नियोजन
राज्यात कोविडचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काळात तिसरी लाट येईल, अशी भिती वर्तवली जात आहे. ही बाब विचारात घेत, राज्यातील वैद्यकीय यंत्रणांनी ऑक्सिजन उत्पादन, साठा यांचे नियोजन तसेच उद्योगांतील कामगार- कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणावर लसीकरण करावे. तसेच गर्दी टाळण्यासाठी निर्बंध कडक लागू करावेत. तसेच आर्थिक चक्र सुरू ठेवण्याच्या दृष्टीने कोविड फोर्स तातडीने स्थापन करावा. याशिवाय उत्पादनावर परिणाम होऊ न देणे, कामगारांची कंपनीच्या परिसरातील तात्पुरती फिल्ड निवास व्यवस्था, कामाच्या वेळा, कोविड प्रादुर्भाव होऊ न देणारी व्यवस्था तयार करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीला यांची उपस्थिती
उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास या बैठकीला उपस्थित होते. तर सीआयआयचे पदाधिकारी उदय कोटक, निरंजन हिरानंदानी, हर्ष गोयंका, सलील पारेख, नील रहेजा, अनंत गोयंका, बाबा कल्याणी, बी त्यागराजन, जेन करकेडा, अनंत सिंघानिया, बनमाली अग्रवाल, निखिल मेस्वानी, अश्विन यार्दी, राशेष शहा, केशव मुरुगेश, भारत पुरी, असीम चरनिया, सुनील माथुर, संजीव सिंग, नौशाद फोर्बस, डी के सेन, सुलज्जा फिरोदिया मोटवाणी, शरद महिंद्रा आदि उद्योगपती सहभागी झाले होते.

मागील चोवीस तासात 'इतक्या' नव्या कोरोना रुग्णांची भर

कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने राज्यात १ लाख २६ हजार २४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के आहे. राज्यातील कोरोना मृत्यू दर २.०४ टक्के एवढा आहे. दिवसभरात ७ हजार ६०३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५ हजार २७७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ५९ लाख २७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.१५ टक्के एवढे आहे. आजपर्यंत कोरोनाच्या ४ कोटी ४१ लाख ८६ हजार ४४९ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ६१ लाख ६५ हजार ४०२ (१३.९५ टक्के) रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ८२ हजार ४७६ व्यक्ती होमक्वारंटाइन तर ४ हजार ६५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात सध्या १ लाख ८ हजार ३४३ सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

हेही वाचा - मुंबईत झोपडपट्ट्यापेक्षा इमारतींमध्ये कोरोना रुग्ण

हेही वाचा - लव्ह-जिहाद सारख्या घटनांना महाराष्ट्राने आजवर थारा दिला नाही - उर्मिला मातोंडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.