मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाने 25 मे रोजी दुपारी 2 वाजता इयत्ता 12 वी चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे निकाल mahresult.nic.in, hscresult.mkcl. org, hsc.mahresult.org.in आणि msbshse.co.in. या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.
14 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा : यंदाच्या बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी एकूण 14,57,293 उमेदवार बसले होते. यात 7,92,780 मुले आणि 6,64,441 मुलींचा समावेश होता. मंडळाने काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, निकालांवर समाधानी नसलेले विद्यार्थी verification.mh-hsc.ac.in वर ऑनलाइन अर्ज करून उत्तर लिपींच्या पडताळणीसाठी अर्ज करू शकतील किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती देखील मिळवू शकतील. यावर्षी राज्यात विज्ञान शाखेसाठी 6,60,780 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर कला शाखेसाठी 4,04,761 आणि वाणिज्य शाखेसाठी 3,45,532 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
गेल्या वर्षी 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : 2022 मध्ये, 8 जून रोजी बारावीचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हा राज्याची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 94.22 टक्के होती. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 93.29 टक्के तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 95.35 टक्के होती. परीक्षेसाठी एकूण 14.85 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती ज्यामध्ये 8.17 लाख मुले आणि 6.68 लाख मुली होत्या. गेल्या वर्षी 4 मार्च 2022 ते 7 एप्रिल 2022 पर्यंत या परीक्षा झाल्या होत्या. 2021 मध्ये, कोविड - 19 महामारीमुळे राज्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे, मूल्यांकनाच्या पर्यायी माध्यमाच्या आधारे निकाल जाहीर केले गेले होते.
हे ही वाचा :