ETV Bharat / state

Schools Uniforms Free : आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत; राज्य सरकारची मोठी घोषणा - Uniforms Free

अर्थसंकल्पात राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्पीय ठराव मांडला. यात शिक्षणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. यापुढे राज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत शिष्यवृत्ती, गणवेश देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

Schools Uniforms Free
Schools Uniforms Free
author img

By

Published : Mar 9, 2023, 4:38 PM IST

Updated : Mar 9, 2023, 7:01 PM IST

मुंबई : राज्य सरकाने अर्थसंकल्पात शोलेय विद्यार्थ्यांसाठी आंनदाची भातमी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थ संकल्प सादर केला. यात शिक्षणासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. यापुढे शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गणवेशही राज्य सरकार मोफत देणार आहे. ५ ते ७ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी एक हजारवरुन ५ हजार रुपय पर्यंत शिष्यवृतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सराकारने घेतला आहे. तसेच ८ ते १० वी च्या विद्यार्थांना १ हजार ५०० वरुन ७ हजार ५०० रुपये करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

आदिवासी आश्रम आदर्श शाळा : आदिवासी विभागाच्या माध्यमातून २५० शासकीय आदिवासी आश्रम शाळांना आदर्श आश्रम शाळा म्हणून घोषित करण्यात येईल अशी माहिती विधिमंडात अर्थसंकल्प सादर करतांना फडणवीस यांनी दिली आहे. अल्पसंख्यांक महिलांच्या आर्थिक विकासासाठी १५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ३ हजार बचत गटाची निर्मिती करण्यात येईल अशी घोषणा देखील करण्यात आली आहे.

दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती : राज्य सरकाने शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण विभागाची निर्माण केला आहे. या विभागाकडून दिव्यांगांचे शिक्षण, पुनर्वसन, रोजगार स्वयंरोजगार यासंबंधी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात करण्यात येणार आहे.

महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण : बचत गटातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. अल्पसंख्यांक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत २५ हजारावरून पन्नास हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.

नवोद्योजकांना अर्थसहाय्य : लिंगायत समाजातील तरुण सुशिक्षित बेरोजगार, नवोद्योजकांना स्वयं उद्योग अर्थसहाय्य देण्यासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे.

बार्टी,सारथीसाठी भरीव तरतुद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन, प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन, प्रशिक्षण संस्था (महाज्योती) महाराष्ट्र संशोधन उन्नती, प्रशिक्षण प्रबोधिनी भरीव तरतुद कण्यात आली आहे.

शिक्षणसेवकांना भरघोस मानधन : शिक्षणसेवकांना भरघोस मानधन देण्याचा निर्णय राज्य करकाने घेतला आहे. शिक्षणसेवकांना सरासरी १० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांना ६ हजारवरुन १६ हजार रुपये वाढ करण्यात येणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांना ८ हजारवरुन १८ हजार रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांना ९ हजारवरुन २० हजार रुपये मानधन मिळणार आहे.

हेही वाचा - Maharashtra Budget 2023 : आता एसटीने कधीही कुठेही फिरा फक्त हाफ तिकीटामध्ये; महिलांसाठी खास घोषणा

Last Updated : Mar 9, 2023, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.