ETV Bharat / state

Breaking News : कसब्याची लढाई ही हिंदुत्वाची लढाई आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

author img

By

Published : Feb 23, 2023, 6:51 AM IST

Updated : Feb 23, 2023, 9:58 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

21:56 February 23

कसब्याची लढाई ही हिंदुत्वाची लढाई आहे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे: कसबा पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षांकडून निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो.ही लढाई रासने विरुद्ध धंगेकर असलेल्या असे बोलले जाते. परंतु ही लढाई आता हिंदुत्ववादी विरोध राष्ट्र विचारविरोधी ,काश्मीर विरोधी लोकांची आहे .त्यामुळे कसब्यात राष्ट्र विचाराने प्रेरित लोक असल्याने ते भाजपाला मतदान करतील असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे.

21:13 February 23

शिंदे गटातील नगरसेवक संजय भोईर यांना वस्तू आणि सेवा कर खात्याने केली अटक

ठाणे - शिंदे गटातील नगरसेवक संजय भोईर याना वस्तू आणि सेवा कर खात्याने केली अटक. वस्तू आणि सेवा कर थकवल्या प्रकरणी नोटीस बजावत केली अटक. ठाणे कोर्टाने सुनावली न्यायालयीन कोठडी. 1 कोटी हुन अधिक वस्तू आणि सेवा कर थकबाकी.

20:23 February 23

सरकार नियमानुसार स्थापन झाले; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

पुणे - निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, जी गुणवत्तेनुसार निर्णय घेते. आमचे सरकार नियमानुसार स्थापन झाले आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणा्ले. भाजपने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्याला शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

19:59 February 23

मुंबईत बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून 2 ठार

मुंबई - बांधकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून 2 जण ठार एक जण जखमी झाला आहे. नौपाडा बी केबिन इथली ही घटना आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन विभाग दाखल झाला आहे.नौपाडा पोलीसही देखील घटनास्थळी आहेत. मृत्यू झालेले दोन्ही जण हे बांधकाम करणारे कामगार आहेत.

19:47 February 23

पाकिस्तानला पाकमधील कार्यक्रमात सुनावल्याबद्दल सर्व पक्षांनी जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले पाहिजे - संजय राऊत

मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितले की, भारतातील दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याच्या भूमिकेबद्दल पाकिस्तानवर टीका केल्याबद्दल सर्व राजकीय नेत्यांनी प्रसिद्ध गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले पाहिजे. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, अख्तर यांनी जे केले आहे त्यासाठी प्रचंड धैर्याची गरज आहे. पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावणे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही, अख्तर यांनी त्यांच्या धैऱ्यासाठी त्यांचा सन्मान केला पाहिजे असे म्हटले आहे.

19:30 February 23

एमपीएससीच्या निर्णयानंतर शरद पवारांच्या उमेदवारांना ट्विटरवरुन शुभेच्छा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करुन एमपीएससी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते ट्विटमध्ये म्हणतात की, 'तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!' महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नव्या स्वरुपात परीक्षा घेण्याचे आज जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पवारांनी पाठिंबा दिला होता. त्याला यश आल्याने पवारांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

19:25 February 23

तुनिषा शर्मा प्रकरणः शीझान खानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

पालघर - तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला टीव्ही अभिनेता शीझान खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या शुक्रवारपर्यंत तहकूब केली. पोलिसांनी जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानंतर, वसई सत्र न्यायालयाने आजची सुनावणी उद्यावर ढकलली. खान याला त्याची सहकलाकार तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे.

19:15 February 23

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाच आपण ओळखतो - विधानसभा अध्यक्ष

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर आजच, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, सभागृहात स्वतंत्र पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही गटाकडून त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही. निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्याने आणि निवडणुकीत ‘धनुष्य-बाण’ चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

19:09 February 23

नांदेड विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला गडकरी उपस्थित राहणार

औरंगाबाद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात भाग घेतील आणि नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटतील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

18:43 February 23

अजित पवारांसोबत सरकार स्थापनेचे संपूर्ण सत्य लवकरच समोर आणेन : फडणवीस

मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले की नोव्हेंबर 2019 मध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत स्थापन केलेल्या सरकारबाबत लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल. फडणवीस आणि अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडींवर फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेतल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

18:25 February 23

पहिल्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून घेतली बॅटिंग, भारतीय कर्णधार हरमनप्रीत फिट

केपटाऊन - महिला टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ताप आल्याने हरमनप्रीत कौरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र आता ती फिट आहे. हरमनप्रीत नाणेफेकसाठी बाहेर पडल्याने भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

17:42 February 23

पोटनिवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पुण्यात

पुणे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ रॅली होत आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री चंद्रकांत पाटील असे नेते सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री आज पुण्यात कसब्यात रॅली घेत आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची सभा होत आहे.

17:39 February 23

बसची दुचाकीला धडक, 5 वर्षीय बालक जागीच ठार

अमरावती - मोर्शी येथून भरधाव जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 5 वर्षीय बालक जागीच ठार झाला तर आईवडील दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना डवरगाव फाट्यावर आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. अन्वित पंकज वलगावकर (५) रा. अंतोरा आष्टी जि. वर्धा असे घटनेत ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

17:30 February 23

सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२५ पासून लागू - एमपीएससीचे ट्विट

मुंबई - राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

17:10 February 23

मुलीचा छळ केल्याने त्रिकुटाने केली एकाची हत्या केली

नाशिक - शहरात आपल्या कुटुंबातील मुलीची छेड काढल्याने तीन जणांशी झालेल्या भांडणात एका 27 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. पोलिसांनी दोघा कथित हल्लेखोर तिचा भाऊ आणि मेहुण्यांना अटक केली आहे. आता तिसर्‍या व्यक्तीचा, तिच्या काकाचा शोध सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मृत व्यक्तीवर अनेक प्रकरणे होती, असे पोलिसांनी सांगितले.

17:00 February 23

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

नाशिक - शहरात एका 35 वर्षीय व्यक्तीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहरातील अंबड भागातील चुंचाळे येथे बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या 30 वर्षीय पत्नीला ठार केले. त्यानंतर त्याने त्यांच्या घरातच आत्महत्या केली.

16:56 February 23

नाशिकमध्ये आग लागून पोलीस चौकीतील फायबरची केबिन जळून खाक

नाशिक - येथील नाशिकरोड परिसरातील पोलीस चौकीच्या फायबर ग्लास केबिनला गुरुवारी पहाटे आग लागली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. बिटको चौक परिसरातील चौकीला पहाटे 5.30 च्या सुमारास आग लागली आणि आगीत ती जळून खाक झाली.

16:37 February 23

सत्ताधारी विरोधी पक्षांची गळचेपी करत आहेत - संजय राऊत

मुंबई - सत्ताधाऱ्यांना फक्त मोठी बातमी करायची होती, म्हणून त्यांनी पवन खेडा यांना अटक केली, असा टोला खा. संजय राऊत यांनी लगावला. तसेच, छत्तीसगडमध्ये काँग्रेस अधिवेशनाच्या २४ तास आधी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेत्यांवर ईडी आणि सीबीआयने छापे टाकले होते. एकूणच यावरुन सत्ताधारी विरोधी पक्षांची गळचेपी करत आहेत, हे स्पष्ट होते असेही राऊत म्हणाले. ही फक्त आणीबाणी आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.

16:26 February 23

उद्धव-आदित्य ठाकरे केवळ वैचारिक विरोधक, शत्रूत्व अजिबात नाही - फडणवीस

अहमदनगर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकेर आणि आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात आज मवाळ भूमिका घेतल्याचे दिसले. उद्धव ठाकरे असो की, आदित्य ठाकरे आम्ही वैचारीक विरोधक आहोत पण शत्रू बिलकूल नाही, असे स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडले. हे शत्रूत्वही अलीकडे पाहायला मिळते ते संपवावे लागेल असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.

16:11 February 23

भाजपा विरोधी पक्षांची गळचेपी करत असून, ही आणीबाणी आहे - संजय राऊत

मुंबई - स्टंटबाजी करण्यासाठी पवन खेडा यांना अटक केली. तसेच, छत्तीसगडमध्ये काँग्रेस अधिवेशनाच्या २४ तास आधी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेस नेत्यांवर ईडी आणि सीबीआयने छापे टाकले होते. भाजपा विरोधी पक्षांची गळचेपी करत असून, ही आणीबाणी आहे, असे संजय राऊत म्हणाले.

15:55 February 23

मुंबईतील केरळच्या जोडप्याला मुलाच्या औषधासाठी अज्ञात देणगीदाराने दिले चक्क 15.31 कोटी रुपये

मुंबई - नुकतेच केरळमध्ये स्थलांतरित झालेल्या मुंबईतील एका जोडप्याला त्यांच्या 16 महिन्यांच्या मुलाच्या उपचारासाठी जीवरक्षक औषध खरेदी करण्यासाठी अज्ञात देणगीदाराकडून 15.31 कोटी रुपये मिळाले आहेत. सागरी अभियंता सारंग मेनन आणि आदिती नायर यांचा मुलगा निर्वाण याला स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी (SMA) टाइप 2 चे निदान झाले आहे. हा एक दुर्मीळ आजार आहे. ज्यासाठी एक वेळच्या औषधाची किंमत सुमारे 17.3 कोटी रुपये आहे.

15:38 February 23

काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टात अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली - काँग्रेस नेते पवन खेडा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भातील वक्तव्यावरुन त्यांच्या विरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने दोन मिनिटात त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या एफआयआर एकत्र करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आसाम पोलीस आणि यूपी पोलिसांना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत याचिकाकर्त्याची द्वारका न्यायालय अंतरिम जामिनावर सुटका करेल, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने द्वारका न्यायालयाला खेडा यांना अंतरिम दिलासा देण्याचे निर्देश दिले.

15:26 February 23

महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर असल्याचा सिब्बल-सिंघवी यांचा युक्तीवाद, ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षाची आजची सुनावणी पूर्ण

नवी दिल्ली - ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांच्या युक्तीवादानंतर आजची सुनावणी संपली आहे. आता पुढील आठवड्यात पुन्हा युक्तीवाद होईल. त्यावेळी शिंदे गटाच्या वकिलांना युक्तीवाद करण्यासाठी वेळ मिळण्याची शक्यता आहे.

15:23 February 23

राऊत यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची निदर्शने

ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला हानी पोहोचवण्यासाठी सराईत गुन्हेगार भाड्याने घेतल्याचा दावा केल्याबद्दल शिवसेना (यूबीटी) राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी ठाण्यात निदर्शने केली.

15:20 February 23

राष्ट्रीय सुरक्षेसाठी काहीही करण्यास देशाची तयारी : जयशंकर

पुणे - परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले की, आज भारताची प्रतिमा अशी आहे की राष्ट्रीय सुरक्षेसाठी देश कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे. प्रत्येक देशासमोर आव्हाने असतात आणि कोणतेही आव्हान राष्ट्रीय सुरक्षेइतके मोठे नसते, असेही ते म्हणाले.

15:14 February 23

लाचखोरी प्रकरणी कर अधिकाऱ्याला 4 वर्षांची शिक्षा

ठाणे - न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षता कक्षाच्या कर अधिकाऱ्याला जकात एजंटकडून 3 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याबाबत दिलेल्या आदेशात विशेष न्यायाधीश अमित शेटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रकरणांची सुनावणी करताना आरोपी सुनील बने यांना २० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

14:49 February 23

कोर्टाने घड्याळाचे काटे उलटे फिरवून निर्णय देण्याची वेळ आली आहे - सिंघवी यांचा युक्तीवाद

नवी दिल्ली - नबाम रेबिया केसमध्ये, कोर्टाने घेतलेला निर्णय आठ महिन्यापूर्वीची स्थिती जैसे थे करण्याचे निर्देश दिले. याच केसचा आधार घेऊन आजही महाराष्ट्राच्या बाबतीत तसाच निर्णय घेण्याची वेळ आली आहे. याबाबतचा जोरदार युक्तीवाद सिंघवी यांनी केला.

14:25 February 23

राज्यातील सरकार बेकायदेशीर सांगताना विविध घटनापीठांच्या निर्णयांचा सिंघवी यांनी दिला संदर्भ

नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील सिंघवी सध्या जुन्या विविध घटनापीठांनी दिलेल्या निर्णयांचा संदर्भ देऊन सध्या शिंदे सरकार स्थापन करताना ज्या प्रकारच्या घटना घडल्या, त्या कशा घटनाविरोधी आहेत. तसेच कायदा विरोधी आहेत हे न्यायालयाला पटवून देत आहेत. यावेळी त्यांनी राणा, तसेच श्रीमंत पाटील यांच्यासंदर्भातील घटल्यांमधील निकाल उदघृत केले.

14:17 February 23

राहुल नार्वेकरांच्या निवडणुकीचा विचार केला तरीही आमदार अपात्र ठरतात - सिंघवी यांचा दावा

नवी दिल्ली - ठाकरे गटाचे वकील डॉ. अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू. राहुल नार्वेकर यांच्या निवडणुकीच्यवेळीच घटनेच्या दहाव्या परिशिष्टात दिलेल्या तरतुदींचे थेट उल्लंघन केल्याचा दावा सिंघवी यांनी केला. कारण त्यावेळी व्हिपची पायमल्ली केल्याचे स्पष्ट दिसते.

13:41 February 23

आसाममध्ये काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील पवन खेरा यांचा रिमांड घेण्यासाठी आसाम पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आहे.

13:07 February 23

ठाण्यात वडिलांच्या हत्येप्रकरणी २० वर्षीय तरुणाला अटक

ठाणे - एका 20 वर्षीय युवकाला त्याच्या 69 वर्षीय वडिलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या मुलावर त्याच्या वडिलांनी वारंवार अत्याचार केला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिली. आरोपी आणि त्याचे आई-वडील डोंबिवलीतील खंबाळपाडा येथील रहिवासी आहेत. त्याची आई घरकाम करणारी आहे, असे टिळक नगर पोलीस ठाण्याचे पांडुरंग तिठे यांनी सांगितले.

13:03 February 23

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत नवघरे यांचा हॉटेलमध्ये अ‍ॅलर्जी झाल्याने मृत्यू

मुंबई - दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सचिव म्हणून नियुक्त केलेल्या IAS अधिकाऱ्याचा अ‍ॅलर्जीमुळे मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव प्रशांत दत्तात्रय नवघरे हे काळा घोडा परिसरातील हॉटेलमध्ये जेवायला गेले असताना ही घटना घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

12:39 February 23

शिंदे यांचा शपथविधी कसा चुकीचा होता यावर सिंघवी यांचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांचा शपथविधीच कसा चुकीचा होता. त्यासंदर्भातील संविधानिक बाजू सध्या डॉ. अभिषेक मनु संघवी सुप्रीम कोर्टात सांगत आहेत. त्यांच्या युक्तीवादावर न्यायमूर्ती शाह यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावरही सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू आहे.

12:23 February 23

जय महेश साखर कारखान्यात बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

बीड - जय महेश साखर कारखान्यात कामगारांना सुरक्षा किट नसल्याने बेल्टमध्ये अडकून एकाचा मृत्यू झाला आहे.

12:13 February 23

निवडणूक आयोगाची शिंदे गटाने दिशाभूल केली, सिब्बल यांचा पुराव्यानिशी आरोप

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचे त्यांच्याकडे दाखल केलेल्या कागदपत्रातील वस्तुस्थितीवरुन दिसते, असा थेट युक्तीवाद सिब्बल यांनी केला. त्यांनी स्पष्ट केले की निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या याचिकेतील कागदपत्रात भविष्यातील संदर्भ दिल्याचे सिब्बल यांनी दाखवून दिले. त्यांनी 19 जुलैच्या याचिकेत 22 जुलैच्या बैठकीचा उल्लेख केलेला आहे. हे कसे असा सवाल सिब्बल यांनी केला.

12:10 February 23

जेट एअरवेजच्या नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना हायकोर्टाचा दिलासा

मुंबई - जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धची अंमलबजावणी संचालनालय (ED) चे ECIR रद्द केले आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश दिला.

12:01 February 23

शिवसेना चिन्ह आणि नाव देऊन निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाचाच अवमान केला - कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आड लपून सुप्रीम कोर्टाचाच अवमान केल्याचा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला. निवडणूक आयोगाने चुकीच्या पद्धतीने निर्णय देऊन चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिले असा जोरदार युक्तीवाद सिब्बल यांनी केला.

11:52 February 23

महाराष्ट्रातील सत्तापालट हे घटनात्मक तरतुदींना तिलांजली देऊन केलेले खूप मोठे कटकारस्थान - सिब्बल

नवी दिल्ली - महाराष्ट्रात जे झाले ते सगळे कट कारस्थान होते. त्यामध्ये कोणतीही कायदेशीर किंवा घटनात्मक तरतुदींना धरून झालेली कृती नव्हती. जर अविश्वास प्रस्ताव सादर करुन कायदेशीर रित्या विरोधक सर्व करु शकले असते. मात्र त्यांनी तसे केले नाही. कारण त्यामध्ये व्हिपच्या विरोधात मतदान केले असते तर सर्व आमदार अपात्र ठरले असते. त्यामुळेच सर्वच घटनात्मक गोष्टी बाजूला ठेवून राज्यपालांनी काही निर्णय घेतले. वास्तविक हे सगळे कट कारस्थान होते. ज्याचा आराखडा खूप आधीच ठरवण्यात आला होता, असा युक्तीवाद सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात केला.

11:45 February 23

जमिनीच्या व्यवहारात 3.15 कोटी रुपयांची फसवणूक, दोघांविरोधात गुन्हा दाखल

दोन जणांनी नागपूर शहरातील एका व्यावसायिकाला जमिनीच्या व्यवहारात 3.15 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

11:44 February 23

तहसीलदारावर जालन्यात वाळू माफियाचा हल्ला

जालना जिल्ह्यातील एका तहसीलदारावर (महसूल अधिकारी) वाळू माफियांनी वाळूचा अवैध उत्खनन आणि त्याची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. ही घटना बुधवारी अंबड तहसीलदार कार्यालयात घडली असून, मंगळवारी अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या आरोपींची तीन वाहने जप्त करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.

11:43 February 23

श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्यासाठी संजय राऊत यांचे आरोप-शंभूराज देसाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची बदनामी करण्यासाठी शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे.

11:37 February 23

कुणाकडे किती आमदार होते, राज्यपालांनी काय निर्णय घेऊ शकत होते, यावर सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात कुणाकडे किती आमदार होते. त्यांच्यातून किती आमदार फुटले त्याचबरोबर शेवटी किती आमदार सत्ताधारी आघाडीकडे होते. तसेच या परिस्थितीत राज्यपाल काय करु शकतात. त्यांच्याकडे कोणते पर्याय होते. त्यातील त्यांनी कोणते पर्याय निवडणे गरजेचे होते. यावर सध्या युक्तीवादासह चर्चा सुरू आहे.

11:35 February 23

नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू

नागपुरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

10:26 February 23

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अटकेचे आदेश, प्रशासनात खळबळ

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातींवर प्रशासनाने अन्याय केल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे जिल्हाधिकारी यांची तक्रार केली होती. या संदर्भात आयोगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना हजर राहण्याचे वारंवार आदेश दिले होते. मात्र गौडा यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम म्हणून आता आयोगाने त्यांच्या विरोधात अटक करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.

10:22 February 23

एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासह ६ जणांना अटक

दहशतवादी-गँगस्टर-ड्रग स्मगलरच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएने 8 राज्यांमधील 76 ठिकाणी छापे टाकले. एनआयएने लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्यासह गुंडांचे सहकारी म्हणून काम करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे.

10:10 February 23

जावेद अख्तर यांचे संपूर्ण देशाने अभिनंदन करायला हवे-संजय राऊत

पाकिस्तानात जाऊन केलेल्या कामाचे जावेद अख्तर यांचे कौतुक करायला हवे. त्यांचे संपूर्ण देशाने अभिनंदन करायला हवे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

10:03 February 23

शिवसेनेचा व्हीप बदलण्याचे काम झाले-अनिल देसाई

सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी आहे. या सुनावणीत ठाकरे गटाकडून वकील अभिषेक सिंघवी व देवदत्त कामत हे युक्तीवाद करणार आहेत. शिवसेनेचा व्हीप बदलण्याचे काम झाले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल येईल, अशी अपेक्षा शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली आहे.

09:50 February 23

बिहारमध्ये मालगाडीचे १३ डबे घसरले, रेल्वे वाहतूक विस्कळित

गया-डीडीयू रेल्वे मार्गाच्या पहलाजा आणि कराबंदिया रेल्वे स्थानकादरम्यान मालगाडीच्या 13 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. त्यामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे.

09:49 February 23

हैदराबाद विमानतळावर १४ किलो तस्करीचे सोने जप्त

हैदराबाद कस्टम्सच्या एअर इंटेलिजेंस युनिट व एअरपोर्ट कस्टम्सने 14.9063 किलो सोने तस्करी होताना जप्त केले आहे. हे सोने सुदानहून शारजाहमार्गे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 23 सुदानच्या नागरिकांना अटक केली आहे.

09:05 February 23

भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर राजगोपालाचारी यांच्या नातूने दिला काँग्रेसचा राजीनामा

काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी काँग्रेस पक्षाचा आज राजीनामा दिला.

08:08 February 23

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या सदस्याविरोधात चेन्नईत गुन्हा दाखल

तामिळनाडू सरकार भाजपविरोधात आक्रमक झाले आहे. चेन्नई पोलिसांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि माजी कर्नल बीबी पांडियन (निवृत्त) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भाजपने आयोजित केलेल्या उपोषणादरम्यान डीएमके नगरसेवकाने कथित लष्करी जवानाच्या हत्येबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

08:01 February 23

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात ठाकरे गटाच्या नेत्याला भाजप कार्यकर्त्यांची मारहाण

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल नाना काटे यांच्या प्रचारासाठी घरोघरी जात असताना ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला आहे. हा हल्ला भाजपचे पाच कार्यकर्त्यांनी केल्याचा दावा भोसले यांनी केला आहे.

07:53 February 23

मित्राच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सुनावली १० वर्षांची शिक्षा

मित्राच्या मुलीवर बलात्कार, गर्भधारणा केल्याप्रकरणी आरोपीला 10 वर्षांची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली आहे. 33 वर्षीय व्यक्तीला घरात भाड्याने राहण्याची जागा दिली होती. त्याने हा गुन्हा केल्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

07:28 February 23

कारखान्याला लागलेल्या आगी प्रकरणात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यातील कारखान्याला लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कंपनीचा मालक, व्यवस्थापक आणि ऑपरेटरसह सात जणांचा समावेश आहे.

07:12 February 23

आरएसएसबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कुमार विश्वास यांनी मागितली माफी

आरएसएसबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कवी कुमार विश्वास यांनी सारवासारव केली आहे. कुमार यांनी म्हटले आहे, मी फक्त त्या मुलाला सांगितले की बेटा नुसते बोलून चालणार नाही. तुला प्रत्यक्षात अभ्यासच करावा लागणार आहे. काही मित्रांना ती गोष्ट वाईट वाटली. मी माफी मागतो.

07:11 February 23

दिल्ली महापालिकेतील गोंधळ थांबेना, सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा तहकूब

नवी दिल्ली: दिल्ली महापालिकेतील गोंधळ थांबता थांबेनासा झाला आहे. चौथ्यांदा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर आप-भाजप नगरसेवक एकमेकांशी भिडले. त्यामुळे एमसीडीच्या सभागृहात गोंधळ आणि घोषणाबाजी सुरूच आहे. काल रात्रीपासून एमसीडीचे सभागृह पुन्हा पाचव्यांदा तहकूब करण्यात आले.

06:41 February 23

सुपारी दिल्याचे वक्तव्य संजय राऊत यांच्यावर बुमरँग

ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्यावर कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्यासाठी सुपारी दिल्याचे वक्तव्य करून खासदार राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती.

06:38 February 23

Maharashtra Breaking News : पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मुंबई : पोलीस भरतीसाठी अमरावतीतून मुंबईत आलेल्या अमर सोलंके या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

Last Updated : Feb 23, 2023, 9:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.