ETV Bharat / state

Breaking News : शिखर बँक घोटाळा; नवीन याचिकाकर्ताची नियुक्ती करण्याकरिता अण्णा हजारेंची न्यायालयात धाव

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra breaking News
author img

By

Published : Dec 19, 2022, 6:37 AM IST

Updated : Dec 19, 2022, 9:43 PM IST

21:42 December 19

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाकडून निकाल राखून

मुंबईतील बीडीडी चाळींच्या जागी बांधण्यात येत असलेल्या इमारतींमध्ये हवा, प्रकाश आणि वेंटिलेशन नसल्यामुळे राहणाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा दावा करणाऱ्या शिरीष पटेल आणि सुलक्षणा महाजन या दोन मुंबईकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन्हीही बाजूंचा एक किंवा पूर्ण झाल्यानंतर आपला निर्णय आज राखून ठेवला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात खंडपीठ निकाल देणार आहे त्यामुळे बीडीडी चाळीचे पुढील भव्तव्य जानेवारी महिन्यात स्पष्ट होणार आहे.

21:41 December 19

शिखर बँक घोटाळा; नवीन याचिकाकर्ताची नियुक्ती करण्याकरिता अण्णा हजारेंची न्यायालयात धाव

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कथित महाराष्ट्र सहकार बँक घोटाळा प्रकरणात समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये दुसरा याचिकाकर्ता यांची नियुक्ती करण्यात यावी याकरिता अण्णा हजारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज धाव घेतली आहे.

21:03 December 19

कुख्यात महिला गुंड कल्याणी देशपांडेला 7 वर्ष सक्तमजुरी

पुणे : शहरातील कोथरूड भागात एका सोसायटीत वेश्याव्यवसाय चालविणारी दलाल कल्याणी देशपांडेसह दोघांना विशेष न्यायालयाने 7 वर्ष सक्तमजुरी आणि 10 लाखाचा दंड ठोठावला आहे. पुण्यातील वेश्या व्यावसायच्या माध्यमातून आपले आर्थिक बस्तान बसविणार्या व संघटितपणे गुन्हेगारी करणाऱ्या या कुख्यात कल्याणी देशपांडे सह दोघांना शिक्षा ठोठावली आहे.

21:03 December 19

रासप प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर हल्ला

बीड - परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात तुफान राडा झाला आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांच्यावर यावेळी जीव घेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे राजाभाऊ फड हे रासप प्रदेशाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत.

19:41 December 19

केंद्रिय जीएसटीच्या अधिकाऱ्याला अटक, पोलीस कोठडीत रवानगी

मुंबई - CBI ने काल CGST अँटी इव्हेशन युनिटच्या अधीक्षकाला लाचखोरी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून कागदपत्रे आणि विविध मालमत्ता जप्त करण्यात आली. आरोपीला आज ठाण्यातील न्यायालयात हजर केले. त्याला 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

19:16 December 19

प्रदूषण मंडळाचा अधिकारी असल्याची थाप मारून खंडणी मागणाऱ्यास अटक

ठाणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असल्याचे सांगून डोंबिवली परिसरातील कारखानदारांकडून खंडणी वसुली करणाऱ्या तीन तोतयांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत एकास अटक केली आहे. अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे. मयंक यशवंत घोसाळकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मनोज घोसाळकर आणि समीर चौधरी यांचा शोध घेण्यात येत आहे.

19:05 December 19

अण्णा हजारे यांनी मानले सरकारचे आभार

पुणे : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे केंद्राच्या लोकपाल कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात प्रस्तावित लोकायुक्त कायदा भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी एक क्रांतीकारक माध्यम ठरेल, असे म्हटले आहे. हजारे यांनी राज्य सरकारकडे लोकायुक्त आणण्याची मागणी केली आहे. तसेच मसुदा स्वीकारण्याच्या निर्णयावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

18:48 December 19

आर्थिक परिस्थितीला कंटाळून नवदाम्पत्याची आत्महत्या

नाशिक - त्रंबकेश्वर येथे एका लॉजमध्ये प्रेमीयुगलाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच इंदिरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नवदाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांनी घेतलेल्या अशा टोकाच्या निर्णयामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

18:41 December 19

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

तुमच्या नेतृत्वाखाली तांत्रिक बदलाची वेगवान गती पाहण्यासाठी प्रेरणादायी आहे असे पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर गुगलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी ट्विट करुन म्हटले आहे. आमची मजबूत भागीदारी सुरू ठेवण्यासाठी आणि सर्वांसाठी काम करणारे खुले, कनेक्टेड इंटरनेट धोरण पुढे नेण्यासाठी आणि भारताच्या G20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत, असेही पिचाई यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे.

18:28 December 19

राजस्थानमध्ये मिळणार फक्त 500 रुपयात गॅस सिलेंडर

अलवार - राजस्थानमध्ये उज्वला योजना आणि गरिबी रेषेखालील लोकांना 500 रुपयात गॅस सिलेंडर देण्याची घोषणा मुख्ममंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे. ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान बोलत होते.

17:47 December 19

तिकीट तपासनीसावर हल्ला, प्रवाशाने केले जखमी

ठाणे - येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसावर प्रवाशाने हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी झाला आहे. पोलिसांनी याची माहिती दिली आहे.

16:09 December 19

बीड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, 5 जणांवर गुन्हा दाखल

बीड - दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाला आहे. अत्याचार करत असताना महिलेने अश्लील फोटो काढले आहेत. एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दिंद्रुड पोलिसात पाच आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खळबळजनक घटनेने दिंद्रुड परिसर हादरला आहे.

15:52 December 19

नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर 21 ला निर्णय

मुंबई - खासदार नवनीत राणा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांच्या दोषमुक्ततेच्या अर्जावर आज निर्णय देण्यात आला नाही. 21 डिसेंबरला मुंबई सत्र न्यायालय या अर्जावर निकाल देण्यात येईल. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांच्या दोषमुक्ततेसाठी अर्जावर विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या कोर्टासमोर सुनावणी पूर्ण झाली आहे. राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

15:26 December 19

समृद्धी मार्गासाठी बेकायदा उत्खननाच्या चौकशीची मागणी

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामादरम्यान किमान 80 ते 90 एकर जमीन बेकायदेशीरपणे खोदण्यात आल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने केला आहे. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या मतदार संघ फुलंब्री येथे सुरू असलेल्या अवैध खोदाईबाबत प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

15:11 December 19

लोकायुक्त विधेयकाच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांनाही ठेवले आहे - फडणवीस

नागपूर - आम्ही महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक कोणीतरी विशिष्ट लोक लक्षात घेऊन आणत नाही. आम्ही या विधेयकाच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांनाही ठेवले आहे. मोदी सरकारच्या काळात ईडी आणि सीबीआयने कधीही त्यांच्या शक्तीचा गैरवापर केला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे या गोष्टी स्पष्ट केल्या.

13:54 December 19

खासदार माने यांना बेळगावला भेट देण्यास बंदीचा अधिवेशनात निषेध

नागपूर - महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी कर्नाटकसोबतच्या सीमावादाचा मुद्दा उपस्थित करून खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदीचा निषेध केला.

13:51 December 19

कारची ट्रकला धडक, प्रेमी युगुल ठार

अमरावती -शिकवणी वर्गासाठी घराबाहेर पडलेले युवक आणि युवती हे दोघेही सकाळी शहरातील कोंडेश्वर जंगल परिसरात कारने फिरायला गेले. अमरावती नागपूर महामार्गावर त्यांच्या कारने ट्रकला ओव्हरटेक करताना थेट ट्रकलाच धडक दिली. या गंभीर अपघातात ते दोघेही जागीच ठार झाले.

13:39 December 19

डी कंपनी संबंधित आरोपी सलीम सह इतर आरोपींना खंडणी प्रकरणात जामीन

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचे मेव्हणा सलीम फ्रुटला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दक्षिण मुंबईतील संपत्ती खंडणीच्या स्वरूपात हडप केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. दक्षिण मुंबईतील 25 कोटी रुपयांची मालमत्ता हडप केली होती. त्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूटही सामिल होता. याप्रकरणी न्यायालयाने पाचही आरोपींची जामिनावर सुटका केली. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. सलीम फ्रूट, शेरजादा खान, अस्लम पटनी, रिझवान अलाउद्दीन शेख आणि मुस्लिम अजगरअली उमरेटवाला अशी अटक करण्यात आलेल्या 5 आरोपींची नावे आहेत.

12:48 December 19

शोक प्रस्तावानंतर दिवसभरासाठी हिवाळी अधिवेशन तहकूब

नागपूर - दिवसभरासाठी हिवाळी अधिवेशन तहकूब. शोकप्रस्तावानंतर कामकाज तहकूब करण्यात आले. आता उद्या उर्वरित कामकाज होणार आहे.

12:08 December 19

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे नवजात बाळाला घेऊन पोहेचल्या विधानसभेत

नागपूर - राष्ट्रवादीच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आपल्या नवजात बाळाला घेऊन महाराष्ट्र विधानसभेत पोहोचल्या आहेत. त्या 30 सप्टेंबर रोजी आई झाल्या आणि आज हिवाळी अधिवेशनात सहभागी होत आहेत. त्या म्हणाल्या की, 'गेल्या अडीच वर्षांपासून नागपुरात कोविडमुळे एकही सत्र झाले नाही. मी आता आई आहे, पण मी माझ्या मतदारांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्यासाठी येथे आली आहे.'

12:05 December 19

सुनील प्रभू यांनी उपस्थित केला मंत्र्यांच्या बंगल्याबाबत हरकतीचा मुद्दा

नागपूर - मंत्रीच नसताना बंगले कसे दिले, आमदार प्रभू यांचा सवाल. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्य मंत्र्यांसाठी असलेले बंगलेसुद्धा रंगवण्यात आले आहेत. त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. राज्य मंत्रीच अस्तित्वात नसताना हे कसे घडले असा सवाल, आमदार सुनील प्रभू यांनी विचारला आहे. सरकार जनतेच्या पैशांचा अपव्यय करत असल्याचा आमदार प्रभू यांनी आरोप केला.

12:01 December 19

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनरची बसला धडक, 1 ठार 10 जखमी

मुंबई - रायगड जिल्ह्यातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी एका कंटेनर ट्रकने धडक दिल्याने बस चालकाचा मृत्यू झाला आणि अन्य 10 प्रवासी जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

11:50 December 19

महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी नाकारली, सीमेवर आंदोलन

बेळगाव - पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला महामेळावा घेण्यास परवानगी नाकारली आहे. महामेळाव्याच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजपासून सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी बेळगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेजवळील कोगनोली टोल प्लाझा येथे आंतरराज्य सीमा प्रश्नावर आंदोलन केले.

11:46 December 19

प्रथमच केंद्रीय गृहमंत्र्यांची आंतरराज्य सीमा वादात मध्यस्थी - मुख्यमंत्री

नागपूर - प्रथमच केंद्रीय गृहमंत्र्यांनी आंतरराज्य सीमा विवादात (महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान) मध्यस्थी केली आहे. आता या विषयावर राजकारण होता कामा नये. सीमावासीयांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत व्यक्त केली.

11:41 December 19

कर्नाटक विधानसभेत सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण, काँग्रेसचे आंदोलन

बेळगाव - कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात सावरकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. दुसरीकडे वाल्मिकी, बसवण्णा, कनका दासा, डॉ. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर अनेक व्यक्तींच्या प्रतिमा लावण्यासाठी विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना पत्र लिहून काँग्रेस आमदारांनी आंदोलन केले. इतरही अनेक मुद्यांवर हे अधिवेशन गाजणार असेच दिसत आहे.

10:29 December 19

विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन सुरू

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन सुरू केले आहे.

08:19 December 19

तेलंगाणामध्ये काँग्रेसला मोठा झटका, १२ नेत्यांनी दिला राजीनामा

नुकत्याच स्थापन झालेल्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या १२ सदस्यांनी राजीनामा दिला. राजीनामा पत्रांमध्ये त्यांनी नमूद केले आहे की केसीआर राज्यात हुकूमशाही राजवट चालवत आहेत. केसीआर यांना पदच्युत करण्यासाठी तीव्र संघर्षाची गरज आहे.

07:01 December 19

अंधेरीत २५ वर्षीय महिलेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

मुंबईतील अंधेरी येथे एका २५ वर्षीय महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डीएन नगर पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला.

06:41 December 19

नाशिक शहरात शैक्षणिक फेअर लर्निंग एरिना आयोजित, विद्यार्थ्यांनी दिली प्राण्यांची माहिती

स्पॅलियर हेरिटेज स्कूलने महाराष्ट्रातील नाशिक शहरात शैक्षणिक फेअर लर्निंग एरिना आयोजित केला होता. येथे 40 हून अधिक विविध प्रकारचे प्राणी होते. विद्यार्थ्यांना त्यांचे वर्णन करण्यास आणि लोकांसमोर सादरीकरण करण्यास सांगितले जाते," असे मुख्याध्यापक सचिन जोशी यांनी सांगितले. या मेळ्यामुळे विद्यार्थ्यांना जिवंत प्राण्यांचे साक्षीदार होण्यास आणि त्यांच्याशी नाते निर्माण करण्यास मदत झाली आहे. विद्यार्थी सहसा त्यांच्या पुस्तकात या प्राण्यांबद्दल वाचतात परंतु त्यांनी त्यांना पाहिले आणि स्पर्श केला तर त्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होते, असे प्राचार्य सचिन जोशी यांनी सांगितले.

06:27 December 19

Breaking News : विधानभवनाच्या पायऱ्यांवरून विरोधकांचे आंदोलन सुरू

नवी मुंबई: राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने धडक कारवाई करत पनवेल परिसरातील कोपरा गावच्या हद्दीत अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. एकूण ७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मद्यसाठा आला होता. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठा येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली आहे.

Last Updated : Dec 19, 2022, 9:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.