काठमांडू: नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी चार्ल्स शोभराज या फ्रेंच सिरीयल किलरची सुटका करण्याचे आदेश दिले. त्याने 1970 च्या दशकात संपूर्ण आशिया खंडात अनेक हत्या केल्या होत्या. दोन उत्तर अमेरिकन पर्यटकांच्या हत्येप्रकरणी 2003 पासून नेपाळच्या तुरुंगात असलेल्या 78 वर्षीय शोभराजची आरोग्याच्या कारणास्तव सुटका करण्यात यावी, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याच्यावर आणखी कोणतीही केस सुरू नसल्यास त्याची सुटका करुन 15 दिवसात त्याला मायदेशी पाठवा असेही कोर्टाने निकालात म्हटले आहे.
Breaking News : सिरीयल किलर चार्ल्स शोभराजची सुटका करण्याचे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश - Maharashtra news live updates
19:55 December 21
सिरीयल किलर चार्ल्स शोभराजची सुटका करण्याचे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
18:54 December 21
जुनी पेन्शन योजना कदापी लागू होणार नाही - देवेंद्र फडणवीस
नागपूर - राज्यात जुनी पेन्शन योजना कदापी लागू होणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ते विधानसभेत यासंदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देत होते. जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल असे फडणवीस यांनी सांगितले.
18:40 December 21
आडमुठ्या कर्नाटकला पाणीपुरवठ्याबाबत पुनर्विचार करावा लागेल - शंभुराज देसाई
नागपूर - उन्हाळी हंगामात, कर्नाटकच्या विनंतीनुसार आम्ही महाराष्ट्रातील कोयना आणि कृष्णा नद्यांचे पाणी कर्नाटकातील दुष्काळी भागाला देतो. पण कर्नाटकच्या अलिकडील सीमाप्रश्नासंदर्भातील भूमिकेमुळे त्यांना पाणीपुरवठा करण्याबाबत आपल्याला पुनर्विचार करावा लागेल, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
18:32 December 21
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येसंदर्भात राहुल शेवाळेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप, प्रभू यांचा पलटवार
नवी दिल्ली - सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा संदर्भ आज थेट लोकसभेत देण्यात आला. खा. राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ए यु म्हणजे दुसरे काही नव्हे तर आदित्य उद्धव हे बिहार पोलिसांनी सांगितल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सांगितले. रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल ए यू नावाचे होते, अशी माहिती त्यांनी लोकसभेत दिली. तर शिवसेना नेते सुनिल प्रभू यांनी ठाकरेंना विनाकारण बदनाम करण्यासाठी त्यांचे नाव ओढून ताणून घेतले जात असल्याचा पलटवार केला.
18:07 December 21
भारतात कोरोनाच्या नव्या धोकादायक विषाणूची एंट्री
अहमदाबाद - भारतात कोरोनाच्या नव्या विषाणूची एंट्री झाली आहे. बीएफ.७ असे या विषाणूचे नाव आहे. गुजरातच्या अहमदाबाद आणि वडोदरा शहरात हा विषाणू सापडला आहे. आरोग्य अधिकार्यांच्या मते, कोरोनाचे दोन उप-प्रकार BA.5.2 आणि BF.7 कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त धोकादायक आहेत. हा नवा व्हायरस सापडल्यानंतर आता आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
17:24 December 21
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचाक्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला
पुणे - फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने फेटाळला आहे. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात शिंदे सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. पण न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला आहे.
16:41 December 21
नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांचा दोष मुक्ततेसाठीचा अर्ज फेटाळला
मुंबई - खासदार नवनीत राणा जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राणा आणि त्यांचे वडील यांनी दोष मुक्ततेसाठी अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने हा अर्जा फेटाळून लावला आहे. नवनीत राणा यांनी शिवडी कोर्टाच्या आदेशाला मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. शिवडी कोर्टाने राणा यांचा दोषमुक्तीसाठीचा अर्ज फेटाळला होता. शिवडी न्यायालयाचा निर्णय सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात वर्ष 2014 मध्ये गुन्हा दाखल केला होता.
16:23 December 21
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा - सरकारची सूचना
नवी दिल्ली - गर्दीच्या ठिकाणी, घरामध्ये किंवा बाहेर असाल तर मास्क वापरा, अशा सूचना केंद्रीय ओराग्य मंत्र्यांनी दिल्या आहेत. सहआजार असलेल्या किंवा अधिक वय असलेल्या लोकांसाठी हे महत्त्वाचे आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या कोविडवरील बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
16:20 December 21
कोरोनाबाबत आम्हाला घाबरण्याची गरज नाही - पुनावाला
चीनमधून कोविड प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या बातम्या चिंताजनक आहेत. त्याचवेळी आमचे उत्कृष्ट लसीकरण कव्हरेज आणि ट्रॅक रेकॉर्ड पाहता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. भारत सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यांचे पालन केले पाहिजे, असे ट्विट कोविशिल्डचे निर्मिती आणि पुरवठादार अदर पुनावाला यांनी केले आहे.
15:40 December 21
आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई - आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. कॉर्डिलिया क्रुझ केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर दाखल याचिका, याचिकाकर्त्याने मागे घेतली आहे.
15:34 December 21
बिबट्याच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील मुलगी ठार
कोल्हापूर - बिबट्याच्या हल्ल्यात शाहूवाडी तालुक्यातील मुलगी ठार झाली आहे. उदगिरीपैकी केदारलिंगवाडीच्या हद्दीतील आज सकाळचा हा प्रकार आहे. मनीषा डोईफोडे असे 10 वर्षीय मृत मुलीचे नाव आहे. जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेली असताना बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्यामुळे परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
14:53 December 21
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, किमान 27 डिसेंबरपर्यंत तुरुंगातच
मुंबई - अनिल देशमुखांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टाने वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टाने मान्य केली. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत कोर्टाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर 27 डिसेंबरपर्यंत सुनावणी करून घेण्याची सीबीआयला आता संधी मिळाली आहे.
14:24 December 21
अनिल देशमुखांच्या जामिनाला स्थगिती अर्जावर थोड्याच वेळात उच्च न्यायालयास सुनावणी
मुंबई - अनिल देशमुख त्यांच्या जामिनाला स्थगिती देणाऱ्या अर्जावर थोड्याच वेळात उच्च न्यायालयास सुनावणी सुरू होणार आहे. अनिल देशमुख यांना दिलासा मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. CBI ने उच्च न्यायालयात मुदत वाढवून देण्याकरता अर्ज केला आहे. आता न्यायालयाला सुट्टी असल्याने सुप्रीम कोर्टात अपिलात जाण्यासाठी 3 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.
12:50 December 21
कोरोनासाठी टास्कफोर्स तयार करणार - फडणवीस
नागपूर - राज्यातील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, राज्य सरकार केंद्राच्या समन्वयाने एक समिती किंवा टास्क फोर्स तयार करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
12:42 December 21
फुकट काजूकतलीसाठी पुण्यात गोळीबार
पुणे - सिंहगडरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत गुंडाचा धुमाकूळ दिसून आला. फुकट काजूकतलीसाठी गुंडाने स्विटमार्ट मालकावर बंदूकीतून फायरींग करण्याचा प्रयत्न केला. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
12:28 December 21
कोयना पुनर्वसन प्रकल्पात एकच जमीन दोघांना विकली, कारवाई होणार
नागपूर - कोयना पुनर्वसन प्रकल्पात एकच जमीन दोघांना विकली गेल्याचा मुद्दा विधिमंडळात आज चर्चेला आला. यामध्ये अनियमितता केलेल्या अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी आ. राम शिंदे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की याबाबतीत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. सरकार कोणाला पाठीशी घालणार नाही, असे ते म्हणाले. दोन महिन्यात चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर जयंत पाटील यांनी कोयनेचे पुनर्वसन असेल तर ही बाब गंभीर आहे असे सांगितले. तसेच कारवाईची मागणी केली.
12:20 December 21
ठाण्यातील कारखान्यात स्फोट, कामगार ठार, तर दोनजण जखमी
ठाणे - एका औद्योगिक युनिटमध्ये हवेचा दाब नियंत्रण झडपाच्या चाचणीदरम्यान झालेल्या स्फोटात एका 28 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा अंबरनाथ टाउनशिपमध्ये असलेल्या युनिटमध्ये घडली. जिथे औद्योगिक व्हॉल्व्ह तयार केले जातात, असे त्यांनी सांगितले.
12:10 December 21
नागपूर जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक आजही आक्रमक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर - नागपुरात नगरविकास मंत्री असताना सरकारी जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केला. येथील महाराष्ट्र विधिमंडळ संकुलात त्यासाठी मोठी घोषणाबाजीही करण्यात आली.
11:46 December 21
चीनने जसा प्रवेश केला तसाच आपण कर्नाटक प्रवेश करू - संजय राऊत
नवी दिल्ली - चीनने जसा प्रवेश केला तसाच आपण कर्नाटक प्रवेश करू. आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. तो चर्चेने सोडवायचा प्रश्न आहे. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री याप्रश्नी आग लावत आहेत. महाराष्ट्रात कमकुवत सरकार आहे. त्यावर कोणतीही भूमिका घेत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
11:36 December 21
शालेय विद्यार्थ्यांवरील पोर्नोग्राफीच्या परिणामांची सरकारला चिंता
नागपूर - विधान परिषदेत आज एका महत्वपूर्ण लक्षवेधीवर चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शालेय विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून पसरत चाललेल्या दुष्प्रभावाचा उल्लेख केला. शालेय मुलांमध्ये पॉर्नोग्राफी पाहण्याचे प्रमाण वाढले आहे, असे ते म्हणाले. परिणामी अतिप्रसंगाचे प्रमाणात भर पडतेय, अशीही पुस्ती त्यानी जोडली. राज्य सरकार यावर उपाय म्हणून बृहत कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्था, पोलिसांमार्फत मार्गदर्शन आणि जनजागृती केली जाईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या जातील. शाळा व्यवस्थापन समितीचे ऑडिट करत आहोत, असेही त्यांनी सांगितले. अतिप्रसंगाची विकृती ठेचण्यासाठी उपसभापती यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करू, असेही ते म्हणाले. उमा खापरे यांनी राज्यातील शाळांमध्ये वाढत्या अत्याचाराच्या घटना आणि पोर्नोग्राफीबाबत लक्षवेधी मांडली होती. प्रवीण दरेकर, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
11:25 December 21
कोविड प्रोटोकॉलचे पालन करा किंवा भारत जोडो यात्रा पुढे ढकला, आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र
कोविड प्रोटोकॉलचे पालन करा किंवा भारत जोडो यात्रा पुढे ढकला, असे पत्र केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लिहिले आहे.
09:57 December 21
युनिव्हर्सिटीतून महिलांना बंदी घालण्याच्या तालिबानच्या निर्णयाचा अमेरिकेकडून निषेध
युनिव्हर्सिटीतून महिलांना बंदी घालण्याच्या तालिबानच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध केला. त्याला अस्वीकारहार्य भूमिका असल्याचे म्हटले आहे.
09:56 December 21
करुणा आणि अहिंसा ही भारताची संकल्पना महत्त्वाची
हे जग शेवटी संपूर्ण मनावर अवलंबून आहे. समाज आणि धर्मात भेद नाही. आम्ही एकत्र प्रार्थना करतो. करुणा आणि अहिंसा ही भारताची संकल्पना महत्त्वाची आहे आणि ती आपण जपली पाहिजे, असे मत तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी व्यक्त केले.
09:51 December 21
जनता दलाचे नेते कामेश्वर सिंह यांच्या घरामधून मोठ्या प्रमाणात दारू साठा जप्त
छपराच्या मधौरा नगर भागात जनता दलाचे नेते (जेडीयू) नेते कामेश्वर सिंह यांच्या नावाने नोंदवलेल्या घरातून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली आहे.
09:43 December 21
भारतामध्ये २० कोटीहून अधिक कोरोना लसीकरण- डॉ भारती पवार
भारतामध्ये २० कोटीहून अधिक कोरोना लसीकरण झाले आहे. त्यामुळे रुग्णांचे कमी प्रमाण झाले आहे.
09:40 December 21
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले
कोल्हापूरमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविले आहे. हे कार्यकर्ते अतिक्रमण हटविण्यासाठी विशाळगडाकडे जात होते.
08:57 December 21
बोम्मईंना जशास तसे उत्तर शिंदे फडणवीस सरकारने द्यावे- अजित पवार
सीमावादावर सरकारने पाठिंबा दिल्यास सरकारला पाठिंबा देणार आहोत. बोम्मईंना जशास तसे उत्तर शिंदे फडणवीस सरकारने द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
08:20 December 21
मलिकार्जुन खरगे आज संसदेतील गांधी पुतळ्यासमोर निदर्शने
काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांनी समविचारी विरोधी नेत्यांना आज संसदेतील गांधी पुतळ्यासमोर चीनवर चर्चेच्या मागणीसाठी निदर्शनास बोलावले. या निर्दशनात १२ पक्ष सहभागी होणार आहेत.
07:34 December 21
मुंबईकरांचे पाणी महागले, दरवाढीला आयुक्तांची मंजुरी
एकीकडे महागाई वाढत असताना मुंबईकर नागरिकांना आणखी महागाईला समोर जावे लागणार आहे. मुंबईकरांच्या पाणीपट्टीत सन २०२२-२३ मध्ये ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जूनपासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही दरवाढ लागू होणार आहे. या दरवाढीला पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली आहे.
07:14 December 21
इम्रान खानची 'फोन सेक्स' ऑडिओ क्लिप लीक
इम्रान खानची 'फोन सेक्स' ऑडिओ क्लिप लीक आहे. इम्रान यांच्या पीटीआय पक्षाने ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे म्हटले आहे.
06:40 December 21
एकवेळच्या वापराच्या प्लास्टिकवर एम्सच्या आवारात बंदी
एम्स दिल्लीने हॉस्पिटलच्या आवारात, कॅम्पसमध्ये एकवेळच्या वापराच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.
06:28 December 21
Breaking News : कोविड प्रोटोकॉलचे पालन करा किंवा भारत जोडो यात्रा पुढे ढकला, आरोग्यमंत्र्यांचे राहुल गांधींना पत्र
मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत बेस्ट उपक्रम आहे. या उपक्रमाकडून आपल्या १० लाख वीज ग्राहकांना दोन महिन्याचे मासिक बिल सुरक्षा अनामत म्हणून भरण्याचे पत्रक काढले आहे. सुरक्षा रक्कम ही नवीन कनेक्शन घेताना घेतले जाते. यामुळे १० लाख ग्राहकांवर अन्याय होणार आहे. हे पत्रक बेस्टने मागे घ्यावे अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.