ETV Bharat / state

Breaking news : राज ठाकरे यांनी केले ‘महाराष्ट्र शाहीर’ चे टीझर अनावरीत!

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 20, 2023, 7:10 AM IST

Updated : Mar 21, 2023, 6:31 AM IST

21:42 March 20

राज ठाकरे यांनी केले ‘महाराष्ट्र शाहीर’ चे टीझर अनावरीत!

मुंबई - 'महाराष्ट्र शाहीर’ शाहीर साबळे यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा...’ हे अजरामर गीत महाराष्ट्राला दिले आणि हल्लीच ते महाराष्ट्रगीत म्हणून महाराष्ट्र शासनाने अधिकृत केले. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येत असून त्याचे नाव आहे 'महाराष्ट्र शाहीर’. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे करीत असून मराठीतील प्रथितयश अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या आठव्या स्मृतीदिनी ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाचे टीझर राज ठाकरे यांनी अनावरीत केले.

18:32 March 20

बाल तस्करीमुळे समाजाच्या जडणघडणीवर परिणाम होते - मुंबई उच्च न्यायालय

मुंबई - बाल तस्करी हा शोषणाचा सर्वात गंभीर प्रकार आहे, ज्याचा परिणाम केवळ बालक आणि त्याच्या कुटुंबावरच होत नाही, तर समाजाच्या जडणघडणीलाही धोका निर्माण होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाने जामीन नाकारताना म्हटले आहे.

17:43 March 20

विधिमंडळाला नव्हे डुप्लिकेट शिवसेनेला चोरमंडळ म्हटले - संजय राऊत

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज विधिमंडळ सचिवांना पत्र पाठवून आपले म्हणणे मांडले आहे. यात त्यांनी आपण विधिमंडळाला नाही तर डुप्लिकेट शिवसेनेला चोरमंडळ म्हटले होते असे स्पष्ट केले आहे. आपण विधिमंडळाचा आदर करतो. विधिमंडळाची अप्रतिष्ठा करायचा आपला कुठलाही हेतू नाही, असेही ते म्हणाले आहेत.

17:18 March 20

प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्याचा मार्ग मोकळा

मुंबई - वित्त मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याने उच्च शिक्षणातील पदे भरण्याचा मार्ग सुकर झाला आहे. सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

16:59 March 20

राज्य सरकार जुनी पेन्शन लागू करणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई - राज्यातील कर्मचाऱ्यांचे जुन्या पेन्शनसाठी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संपावर होते. जुन्या पेन्शनची त्यांची मागणी होती. ही मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.

16:33 March 20

सोन्याचा दर आज साठहजार पार, शेअर बाजाराने मात्र खाल्ली आपटी

मुंबई - आज शेअर बाजार सपशेल पडला. मात्र सोन्याला चांगलीच झळाळी आली. आठवडाभरापूर्वी 55,000 च्या आसपास सोन्याचा दर होता. आज सोने 60,065 रुपये प्रति तोळा झाले. सोन्याचा दर वाढत असल्याने ग्राहक मात्र दुरावत असल्याचे दिसते.

16:29 March 20

पंतप्रधान मोदींना G7 हिरोशिमा शिखर परिषदेचे निमंत्रण

नवी दिल्ली - जपानचे पंतप्रधान फ्युमिओन किशिदा यांनी पंतप्रधान मोदींना G7 हिरोशिमा शिखर परिषदेचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान मोदींनी निमंत्रण स्वीकारले आहे. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

16:25 March 20

कोरेगावात एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन मित्रांची आत्महत्या

सातारा - एकाच इमारतीत राहणाऱ्या दोन मित्रांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोरेगावमध्ये घडली आहे. दोघे मित्र कोरेगाव शहरातील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहत होते. या घटनेने कोरेगावात खळबळ माजली आहे. एकाने स्वत:ला पेटवून घेतले, तर दुसऱ्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. ऋषिकेश राजेंद्र ताटे (रा. बोधेवाडी, ता. कोरेगाव) आणि सुभाषकुमार सूरज प्रसाद (मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कोरेगाव), अशी त्यांची नावे आहेत. कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्त्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

16:04 March 20

माझ्या विरोधात कारवाई करणे हा विरोधकांचा डाव - संजय राऊत

मुंबई - संजय राऊत यांनी विधिमंडळाच्या सचिवांना दिले पत्र. हक्कभंग प्रस्तावावर दिले स्पष्टीकरण. संजय राऊत म्हणतात...

- सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे या हक्कभंग समितीमधील काही सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

- माझ्या विरोधात ज्यांनी तक्रार केली त्या सदस्यांनाच या समितीमध्ये घेण्यात आले आहे.

- हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. जाणूनबुजून माझ्या विरोधकांना या समितीत घेतले आहे. हे संसदीय लोकशाहीला धरून नाही.

- विधिमंडळाचा मी आदर करतो आणि त्याची अपप्रतिष्ठा होईल असे मी कधीही करणार नाही. माझ्या विरोधात कारवाई करणे हा विरोधकांचा डाव आहे.

15:58 March 20

डायघर भागात भट्टी गोडवूनमध्ये मोठी आग

ठाणे - डायघर भागात भट्टी गोडवूनमध्ये मोठी आग. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या रवाना. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीमही रवाना आगीचे कारण स्पष्ट नाही.

15:36 March 20

आमदार अनिल परब यांना पुन्हा उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई - दापोली रिसॉर्ट प्रकरणी आरोप असलेले उद्धव गटाचे आमदार अनिल परब यांना पुन्हा उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परब यांच्यावर 23 मार्चपर्यन्त कोणतीही जबरदस्तीने कारवाई करू नये असे कोर्टाने म्हटले आहे.

15:16 March 20

मस्करीच्या वादातून सलून चालकावर वस्तऱ्याने वार

ठाणे : सलून दुकानात ग्राहकांची दाढी करताना मस्करी करणाऱ्या आरोपी मित्राला मस्करी करून नकोस मी कामात आहे, असे बोलताच वाद झाला. आरोपीने सलून मधील ग्राहकांसमोर दोन कानशिलात लगावून धारदार वस्तऱ्याने सलून चालकाच्या कानापासून ते ओठापर्यंत वार करून गंभीर जखमी केले.

15:00 March 20

मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी भाजप आणि शिंदे गटाच्या दोषींवर कारवाई करा - दानवे

मुंबई - विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी भाजप आणि शिंदे गटात हाणामारीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली. या हाणामारीत दिसते की डोक्यावर 19 वार केलेत. तसेच या प्रकरणी यंत्रणांवर मोठा दबाव आहे. हॉस्पिटलमध्ये घेतले जात नाही. गुन्हेगारांवर मोक्कासारखा गुन्हा दाखल करावा असे ते म्हणाले.

14:44 March 20

लव्ह जिहादवरुन आ. अबू आझमी यांनी सरकारला विचारला जाब

मुंबई - लव्ह जिहादवरुन आ. अबू आझमी यानी सरकारला जाब विचारला आहे. ते म्हणाले की, विधानभवनात बोलत असताना मंत्र्यांनी 1 लाख लव्ह जिहाद झाले आहेत असे सांगितले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विनापरवानगी आंदोलन सुरू आहे. त्याबाबत चौकशी झाली पाहिजे. आम्ही जेव्हा विचारले होते तेव्हा आम्हाला उत्तर दिले आहे की डिसेंबर ते मार्चपर्यंत लव्ह जिहादच्या झिरो तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तरीही विनपरवानगी आंदोलन सुरू आहे. चुकीच्या गोष्टी बोलल्या जात असताना सरकार काय करतंय, असा सवाल त्यांनी केला. समाजवादी पार्टी यावर गंभीर आहे. आम्ही आता आंदोलन करू, असे आझमी म्हणाले.

13:57 March 20

रोझरी एज्युकेशन ग्रुप प्रकरणात आरोपींची 47.1 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

रोझरी एज्युकेशन ग्रुप आणि त्याचे भागीदार विनय अरान्हा आणि विवेक अरान्हा यांची 47.1 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. आरोपींनी कॉसमॉस बँकेची 20.44 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

13:43 March 20

चंद्रपूर जिल्ह्यात 2022 मध्ये वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू-सुधीर मुनंगटीवार

चंद्रपूर जिल्ह्यात 2022 मध्ये वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात 53 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत दिली. याच काळात विविध घटनांमध्ये १४ वाघांचा मृत्यू झाल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

13:05 March 20

वसईच्या कळंब समुद्रात दोन तरूण बुडाले, एकाचा मृत्यू

वसईच्या कळंब समुद्रात दोन तरूण बुडाले आहेत. एकाला वाचण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे.

13:03 March 20

मोबाईलवरून फोटो पाठविला तरी शेतकऱ्यांचे नुकसानीचे होणार पंचनामे

सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा निर्णय विधानसभेत जाहीर केला आहे. मोबाईलवरून फोटो पाठविला तरी शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

12:56 March 20

प्राध्यापकांच्या तासिका दरात वाढ, पदभरतीही सुरू करण्याचाी विधानसभेत घोषणा

राज्यातील उच्च आणि तंत्र संचालनालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्राध्यापकांच्या तासिका दरात वाढ करण्याबरोबरच प्राध्यापकांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. 2088 पदे भरण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली. एकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना प्राध्यापकांना सरकारने भेट दिली आहे.

12:54 March 20

गोमांसा बंदीची होणार कठोर अंमलबजावणी, राज्य सरकार स्थापन करणार गाय सेवा आयोग

मंत्रिमंडळाने गोमांसावर बंदी घालण्यासाठी 2015 च्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि पशुधनाच्या सर्वांगीण भल्यासाठी उपाययोजना करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार गाय सेवा आयोग स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

12:39 March 20

आंतरधर्मीय विवाह समितीला समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून आव्हान, उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

राज्यामध्ये आंतरधर्मीय आणि आंतरजातीय अशी समिती स्थापन शासनाने निर्णय घेतला. मात्र राज्यभरातून विरोधी पक्षाकडून विरोध केला गेला होता. आता समाजवादी पक्षाचे आमदार रवी शेख यांनी संविधानाच्या मूल्यांना हरताळ फासणारी ही समिती असल्याचा आरोप करीत मुंबई उच्च न्यायालयात या समितीला आव्हान दिले आहे. आज त्यावर सुनावणी होणार आहे.

12:39 March 20

मदन कदम गोळीबार प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचे चौकशीचे निर्देश

सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ मदन कदम या व्यक्तीने गोळीबार करून दोन व्यक्तींचा जीव घेतला आहे. तर एक व्यक्ती गंभीर असून याप्रकरणी सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारने चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश दिले.

12:38 March 20

शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसे साजरे करायचे - अजित पवार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून शेतकऱ्यांचा मुद्दा मोठ्या प्रमाणामध्ये लावून धरलेला आहे. आज सभागृहात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दोघेही गैरहजर आहेत. विरोधकांनी ५७ अन्वये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची विनंती सभागृहात केली. पण सरकार तयार नसल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

12:27 March 20

वन रँक वन पेन्शन योजनेनुसार सैनिकांचा कुटुंबियांना राहिलेली पेन्शन द्या-सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला ३० एप्रिल २०२३ पर्यंत वन रँक वन पेन्शन योजनेनुसार सशस्त्र दलातील पात्र कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांना आणि शौर्य विजेत्यांना, ७० वर्षावरील पात्र पेन्शनधारकांना ३० जून २०२३ पर्यंत आणि उर्वरित पात्र पेन्शनधारकांना समान हप्त्यांमध्ये किंवा त्यापूर्वी थकबाकी देण्याचे निर्देश दिले आहेत.

12:26 March 20

नक्षलवाद्यांनी रस्ते काम सुरू असताना जाळली २ जेसीबी, २ बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टर

रस्ते काम सुरू असताना 2 जेसीबी, 2 बुलडोझर आणि 8 ट्रॅक्टर कोयलीबेडा पीएस भागात, कांकेर येथे 19-20 मार्चच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी जाळले आहेत. ही माहिती बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी दिली आहे.

12:02 March 20

बुकी जयसिंघानी याला अटक, गुजरातमध्ये जाऊन मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

अमृता फडवणीस यांना एक कोटीची लाच दिल्याच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने बुकी जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील धागेदोरे आणखी समोर येणार आहेत.

11:16 March 20

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांचा सभात्याग

अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू असताना विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केल्यानंतर त्यांनी सभागृहातदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा मुद्दा लावून धरला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावा द्वारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या गारपीट आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

10:52 March 20

ठाणे जिल्ह्यात परवानगीशिवाय इमारती विकसित केल्याप्रकरणी चार जणांना अटक

ठाणे जिल्ह्यातील कळवा टाऊनशिपमधून बेकायदेशीरपणे इमारती बांधण्यासाठी आणि ग्राहकांना सदनिका विकण्यासाठी नागरी कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी चार विकासकांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

10:51 March 20

बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ३३.६५ लाख रुपयांची फसवणूक

किफायतशीर परताव्याचे खोटे आश्वासन देऊन बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून फसवणूक करून ठाण्यातील मीरा रोड येथील एका ३७ वर्षीय व्यावसायिकाची ३३.६५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.

10:50 March 20

एकनाथ शिंदे यांनी योगींचा आदर्श स्वीकारावा आणि अतिक्रमण हटवण्यासाठी बुलडोझरचा वापर करावा- टी राजा सिंह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अनुकरण करून सरकारी जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमणे बुलडोझरच्या सहाय्याने पाडावीत, असे तेलंगणातील भाजपचे निलंबित नेते टी राजा सिंह यांनी म्हटले आहे.

10:49 March 20

राहुल गांधींविरुद्ध पोलिसांची कारवाई हे घाबरलेल्या मोदी सरकारचे भ्याड कृत्य- नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावरील पोलिसांची कारवाई हे घाबरलेल्या नरेंद्र मोदी सरकारने केलेले भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. पोलिसांचा वापर करून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अशी टीका पटोले यांनी केली आहे.

10:32 March 20

खेडच्या सभेत एकनाथ शिंदेंनी भाजपची वाचली स्क्रिप्ट-अंबादास दानवे

खेडच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपची स्क्रिप्ट वाचली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

10:31 March 20

2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दीपक तिजोरीची निर्मात्याविरोधात पोलिसात तक्रार

अभिनेता-दिग्दर्शक दीपक तिजोरीने सह-निर्मात्याविरोधात 2.6 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

09:39 March 20

पीडितेचा फोटो ट्विट केल्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत हे अडचणीत सापडले आहेत. पीडितेचा फोटो ट्विट केल्याने त्यांच्यावर बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

08:49 March 20

जपानचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर पोहोचले

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

08:42 March 20

राजलक्ष्मी कृष्णन यांच्या मृत्यूनंतर धावपट्टू संतप्त, वरळी पोलीस स्टेशनबाहेर केली निदर्शने

राजलक्ष्मी कृष्णन या धावपट्टू महिलेचा काल वरळी डेअरीजवळ मॉर्निंग वॉक करत असताना अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या धावपटू आणि जॉगर्सनी वरळी पोलीस स्टेशनबाहेर निदर्शने केली आहेत.

08:03 March 20

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात दरोडा, साडेचार लाखांचे साहित्य लंपास

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाण्यातील कार्यालयात मोठा दरोडा पडला आहे. चोरट्यांनी कार्यालयातील एसीसह इतर साहित्य लंपास केले आहे. गुणरत्न यांनी नुकतेच कर्मचारी संपाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

08:00 March 20

अमृतपाल सिंग याचे काका आणि ड्रायव्हर यांनी केले आत्मसमर्पण

वारिस पंजाब देचे प्रमुख अमृतपाल सिंग याचे काका आणि ड्रायव्हर यांनी काल रात्री पंजाब पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ही माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे.

07:23 March 20

खलिस्तानी पुन्हा भारताविरोधात आक्रमक.. इंग्लंडमधील भारतीय ध्वज खाली खेचण्याचा प्रयत्न

खलिस्तानची मागणी करणाऱ्या नागरिकांनी इंग्लंडमधील भारतीय ध्वज खाली खेचण्याचा प्रयत्न केला. तसेच भारतीय उच्चायुक्तालयाची तोडफोडदेखील करण्यात आली आहे. परंतु लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय सुरक्षा कर्मचार्‍यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने भारतामधील इंग्लंडच्या परराष्ट्र सचिवांना समन्स बजावले आहे.

07:23 March 20

अमृतपाल सिंगला अटक? वारीस पंजाब देच्या सल्लागाराचा दावा

अमृतपाल सिंगला पोलिसांनी अटक केली, असा दावा वारीस पंजाब देच्या कायदेशीर सल्लागाराने केला आहे

07:06 March 20

Maharashtra breaking news : गिर्यारोहकाचा डोंगरावरून खोल दरीत पडून मृत्यू

मुंबई :नाशिकहून गिर्यारोहक टीमसोबत माळशेज घाट परिसरात आलेल्या एका गिर्यारोहकाचा डोंगरावरून खोल दरीत पडून मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 21, 2023, 6:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.