ETV Bharat / state

Breaking News : एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम - Maharashtra political news

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Feb 21, 2023, 6:36 AM IST

Updated : Feb 21, 2023, 9:47 PM IST

21:46 February 21

एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम

एकनाथ शिंदे मुख्य नेतेपदी कायम

80 टक्के भूमीपुत्रांना नोकरी देण्याचा ठराव

20:49 February 21

नवीन शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात

मुंबई -: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आता शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा वाद सुरू आहे. मात्र, शिंदे गटाने पक्षाला नाव मिळाल्यानंतर आता पुढची पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर लगेचच मुंबईच्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे सर्वच आमदार खासदार आणि नेते उपस्थित आहेत.

20:04 February 21

साताऱ्यातील तळबीड पोलिसांनी पकडला ८४ लाखांचा गुटखा, १ कोटीचा मुद्देमाल जप्त

सातारा - गुटखा भरून कर्नाटकहून पुण्याकडे निघालेल्या कंटेनरवर कारवाई करत तळबीड पोलिसांनी ८४ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर, असा एकूण १ कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. टोलनाका चुकवून कंटेनर पर्यायी मार्गाने जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कराड-मसूर रस्त्यावर सह्याद्री कारखाना परिसरात नाकाबंदी करून ही कारवाई केली आहे.

19:58 February 21

शिवसेना भवन किंवा उद्धव गटाची इतर कोणतीही मालमत्ता आम्हाला नको - दीपक केसरकर

मुंबई - कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे गटाला मुंबईतील शिवसेना भवन किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी छावणीशी संबंधित कोणतीही मालमत्ता ताब्यात घेण्यात रस नाही, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर या विषयावर सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत होते.

18:57 February 21

भारतीय हिमालयीन क्षेत्रात नजिकच्या भविष्यात मोठ्या भूकंपाची शक्यता - तज्ञांचा इशारा

हैदराबाद - पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध प्लेट्स असतात ज्यांची सतत हालचाल सुरू असते. भारतीय प्लेट प्रतिवर्षी सुमारे 5 सेमी सरकत आहे. ज्यामुळे हिमालयाच्या बाजूने ताण साचत आहे. त्यामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता वाढते असे एनजीआरआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी सांगितले आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात भारतातील या भागात मोठ्या भूकंपाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

17:33 February 21

नवलखा यांचे अमेरिकेतील ISI एजंटशी संबंध, एनआयएचा हायकोर्टात दावा

मुंबई - एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेला कार्यकर्ता गौतम नवलखा यांचे अमेरिकेत अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी आयएसआय एजंटशी संबंध होते, असा दावा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामिनाला विरोध करताना केला आहे. नवलखा यांच्या याचिकेला उत्तर म्हणून दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, एकात्मता आणि सार्वभौमत्वावर थेट परिणाम करणारी कृत्ये केल्याचा दावाही केला आहे. एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी सोमवारी न्यायमूर्ती ए एस गडकरी यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. पी डी नाईक यांनी नवलखा यांच्या जामीन अर्जाला विरोध करत उत्तर दाखल केले होते. या अर्जावर २७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल.

17:28 February 21

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 22 फेब्रुवारीला राज्यभर चक्का जाम आंदोलन

सोलापूर - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 22 फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन होईल. संघटनेचे नेते राजू शेट्टींनी याबाबतची घोषणा येथे केली आहे. चक्का जाम आंदोलनास आडकाठी आणल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही राजू शेट्टींनी पोलिसांना दिला आहे.

17:23 February 21

कोश्यारींनी मला महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या 'धमकी' पत्राची माहिती दिली होती : फडणवीस

मुंबई - राज्यातील 12 आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दम दिला होता, याची माहिती राज्यपालांनी आपल्याला दिली होती असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते म्हणाले की माजी राज्यपाल कोश्यारी यांनी मला कळवले होते की एमव्हीए नेत्यांनी विधानपरिषद आमदारांच्या यादीबरोबर धमकी देणारे पत्र लिहिले होते आणि ते मागे घेण्यास नकार दिला होता. त्यामुळेच राज्यपालांनी त्यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली नाही.

17:18 February 21

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक विमलेश औदित्य यांची मुंबईत आत्महत्या

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाचे उपसंचालक विमलेश औदित्य यांनी मुंबईत आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.

16:35 February 21

एकनाथ शिंदे गट नाही तर 'शिवसेना' म्हणा - शिंदे गटाचे आवाहन

मुंबई - निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार एकनाथ शिंदे गटाने प्रसारमाध्यमांना पत्र लिहून आपले नाव 'शिवसेना' असे नमूद करावे 'एकनाथ शिंदे गट' असे म्हणू नये असे आवाहन केले आहे.

16:27 February 21

किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू नये - हायकोर्ट

मुंबई - माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित एसआरए घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत.

14:56 February 21

संजय राऊत यांचे आरोप बिनबुडाचे - शंभुराज देसाई

मुंबई - संजय राऊत तथ्यहीन आरोप करत असल्याचा दावा मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत होते.

14:48 February 21

आपल्याला मारण्याची सुपारी दिली होती - संजय राऊत

श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली होती असा आरोप ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून त्याची कल्पना दिली आहे.

14:33 February 21

पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तरनी सुनावले खडे बोल, प्रायोजित दहशतवादाचा केला निषेध

नवी दिल्ली - ज्येष्ठ पटकथा लेखक, गीतकार आणि कवी जावेद अख्तर लाहोरमधील 'फैज' महोत्सवात उपस्थित होते. त्यात त्यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानवर जोरदार टीका केली. GNN यूट्यूब चॅनेलने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, ते असे म्हणताना दिसते की, हकीकत ये है की हम दोनो एक दुसरे को इलज़ाम ना दे तो उससे बात नहीं होगी, अहम बात ये है की जो गरम है फिजा, वो कम होनी चाहिये. हम. तो बंबईये लोग हैं। हमने देखा वहान कैसे हमला हुआ था। वो लोग नॉर्वे से तो नहीं आये थे ना इजिप्त से आये, वो लोग अभी भी आपके मुल्क में घूम रहे हैं। तो ये शिकायत अगर हिंदुस्तानी के दिल में हो तो आपको नही बुरा नही मानना चाहिये...

13:59 February 21

'धनुष्यबाण' चिन्ह वाटप निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

नवी दिल्ली - 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्य आणि बाण' चिन्ह वाटप करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. आज ठाकरे गटाने निर्णयावर आक्षेप घेणारी याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 22 फेब्रुवारी उद्या दुपारी 3.30 वाजता याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य केले.

13:49 February 21

धनादेश फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलवर वॉरंट, अमिषाची हायकोर्टात धाव

मुंबई - कोणत्याही सुनावणीशिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून अभिनेत्री अमिषा पटेलने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. धनादेश फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलवर वॉरंट जारी झाले आहे.

13:02 February 21

ठाणे पोलिसांनी 18 चोरीच्या मोटारसायकली केल्या जप्त, 8 जणांच्या मुसक्या आवळल्या

ठाणे - पोलिसांनी 8 जणांना अटक केल्यानंतर चोरीच्या 18 मोटारसायकली जप्त केल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. भिवंडीचे सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांनी सांगितले की, सर्व आरोपींना 18 चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.

12:58 February 21

सोनू निगम वाद प्रकरणी आमदारपुत्र स्वप्नील याच्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबई - सोनू निगम वाद प्रकरणी मुंबईतील चेंबूर पोलिसांनी शिवसेना आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चेंबूर पोलीस त्याला चौकशीसाठी बोलावणार आहेत. स्वप्नीलने सोनू निगम आणि त्याच्या मित्रांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

12:55 February 21

सोहियोंग मतदारसंघात UDP उमेदवाराच्या निधनानंतर मतदान पुढे ढकलले

मेघालय विधानसभा निवडणूक मतदान सुरू आहे. सोहियोंग मतदारसंघात UDP उमेदवाराच्या निधनानंतर मतदान थांबवून पुढे ढकलण्यात आले.

12:13 February 21

अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिलीच कशी - ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात सवाल

कपिल सिब्बल यांनी राज्यपालांनी घेतलेल्या अनेक निर्णयांवरही कोर्टात आक्षेप घेतला. कोर्टाने त्यांनी घेतलेले निर्णय कसे घेऊ शकते असे प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळाला न विचारता काही निर्णय राज्यपालांना घेता येत नाहीत. ते त्यांनी कसे घेतले असा सवाल सिब्बल यांनी विचारला. अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या आमदारांना राज्यपालांनी बोलावलेच कसे असा सवाल त्यांनी विचारला. शिंदे यांनी राज्याबाहेर घेतलेल्या पक्षाच्या सर्वच बैठका अवैध असल्याचा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. शिंदे यांच्यावरच अपात्रतेची टांगती तलवार असताना, त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिलीच कशी असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे.

12:07 February 21

सिब्बल यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रत्येक राजकीय चालीचा समाचार घेणे सुरूच

कपील सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात शिंदे यांच्या प्रत्येक राजकीय चालीचा समाचार घेणे सुरूच ठेवले आहे. शिंदे यांनी परराज्यात बसून कसे नेतेपद भूषविले. त्यांनी पक्षप्रमुखाची भूमिका कशी बजावली. निवड किंवा नियुक्ती न होताच त्यांनी कसे निर्णय घेतले आणि विविध व्यक्तींना पदावर नियुक्त केले. तसेच व्हिप कायद्याने बदलता येऊ शकतो, असाही युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यामध्ये फरक आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना शिंदे पक्षाच्या संदर्भात कोणताही निर्णय कसे घेऊ शकतात, असा सवाल सिब्बल यांनी केला. त्यांच्या सर्वच राजकीय निर्णय आणि चाली या बेकायदेशीर आहेत, हे सुप्रीम कोर्टाला युक्तीवादातून पटवून देण्याचा जोरदार प्रयत्न कपिल सिब्बल यांनी सुरू ठेवला आहे.

11:37 February 21

कपिल सिब्बल यांचा ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद, आयोगाच्या निर्णयावर अनेक प्रश्न केले उपस्थित

सुप्रीम कोर्टात शिंदे-ठाकरे गटाच्या फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आपली बाजू मांडत आहेत. सुरुवातीलाच त्यांनी निवडणूक आयोगाने परवाच दिलेल्या निर्णयावर आक्षेप घेतला. तसेच हा निर्णय रद्दबातल ठरवण्याची विनंती कोर्टाला केली. त्याचबरोबर पक्षफूट आणि विधिमंडळातील पक्षाचे बलाबल यामध्ये फरक मानला पाहिजे हा मुद्दा त्यांनी रेटून धरला आहे. त्याअनुषंगाने सिब्बल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एकच मानायचा का, यापासून ज्याप्रमाणे घटनाक्रम झाला, त्यानुसार कोर्टाने नेमकी काय भूमिका घेतली याबद्दल त्यांनी अनेक आक्षेप आणि प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर सरकार कसे बेकायदेशीर आहे याबाबतचे मुद्दे ते मांडत आहेत.

11:10 February 21

निवडणूक आयोगाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

धनुष्य आणि बाण या चिन्हावरील निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या दुपारी 3:30 वाजता सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आधी सत्तासंघर्षावर सुनावणी घेणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

11:06 February 21

एकनाथ शिंदे आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणार

निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणार आहेत.

10:51 February 21

पुण्यातील हांडेवाडी येथील भाजी मंडईला भीषण आग, दोन टेम्पो जळून खाक

पुणे : पुण्यातील हडपसर भागात हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे भाजी मंडईला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 2 वाजता हडपसर, हांडेवाडी रस्ता, चिंतामणी नगर येथे असणारया भाजी मंडईमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे.. आगीची माहिती अग्निशमन दलाकडे येताच काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्र, हडपसर व कोंढवा बुद्रुक येथून एकुण तीन अग्निशमन वाहने घटनास्थळी दखल झाले होते.

10:47 February 21

मुंबई महामार्गावरील बीरमगुडा रोडवर ट्रक आणि टेम्पो जळून खाक

मुंबई महामार्गावरील बीरमगुडा रोडवर इंजिन गरम झाल्यामुळे ड्रममध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली. शेजारी उभ्या असलेल्या कारलाही आग लागली. कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत नाही. आग विझवण्यात आल्याचे जिल्हा अग्निशमन अधिकारी व्ही श्रीनिवास यांनी सांगितले.

10:16 February 21

सर्व यंत्रणा गुलाम झाल्या आहेत-संजय राऊत

सर्व यंत्रणा गुलाम झाल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय हा देशातील आशेचा शेवटचा किरण आहे. आयोगाच्या अतिरेकी निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

10:15 February 21

वालीव पोलिसांनी शीझान खान विरोधात ५२४ पानांचे आरोपपत्र

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी शीझान खान याने वसई न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. वालीव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल करण्यात आले असून पोलीस तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आरोपींना जामीन देण्यात यावा, असे त्यांच्या याचिकेत म्हटले आहे

10:10 February 21

उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला पाठिंबा

निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरेंच्या मागणीला भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ अर्थमंत्रालयात संशयास्पद होता, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

09:35 February 21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार-नेत्यांची घेतली बैठक

27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगावी दौऱ्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावी जिल्ह्यातील आमदार आणि नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीही उपस्थित होते.

09:34 February 21

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विशेषाधिकाराचा भंग केल्याचा आरोप, १२ खासदारांची नावे यादीत

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विशेषाधिकाराचा भंग केल्याच्या आरोपानंतर राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी 12 विरोधी खासदारांची नावे आरएसच्या विशेषाधिकार समितीकडे पाठवली आहेत. समितीने तपासणे, चौकशी करणे आणि अध्यक्षांना अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.

09:33 February 21

तेलुगू देसम पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड, नेत्याच्या कारला अज्ञाताने लावली आग

20 फेब्रुवारी रोजी अज्ञात लोकांनी तेलुगू देसम पक्षाच्या (टीडीपी) गन्नावरम येथील कार्यालयाची तोडफोड केली. पक्षाचे सरचिटणीस कोनेरू संदीप यांच्या कारला आग लावली.

09:15 February 21

2006 पासून फरार असलेल्या दोन नक्षलवाद्यांना अटक

महाराष्ट्र पोलिसांनी 2006 पासून फरार असलेल्या आणि 10 लाखांचे सामूहिक बक्षीस पकडले आहे. हे नक्षलवादी हैदराबादमधील सुरक्षा फर्म आणि कार शोरूममध्ये काम करत होते.

09:13 February 21

पृथ्वी शॉ आणि इतरांविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करा, सपना गिलची पोलीस ठाण्यात तक्रार

सोशल मीडिया इन्फल्युन्सर सपना गिल हिने मुंबई पोलीस ठाण्यात भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि इतरांविरुद्ध तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे.

08:51 February 21

बंदुकीचा धाक दाखवून लासुर स्टेशन येथील कापूस व्यापाऱ्याला २७ लाख रुपयाला लुटले

गंगापूर तालुक्यातील देवळी येथील कापूस व्यापारी औरंगाबाद येथून हवाल्याचे पैसे घेऊन निघालेल्या त्यांच्या स्विफ्ट कारला सोलापूर धुळे महामार्गावर करोडी पुलाजवळ अडविण्यात आले. मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी कारची समोरील काच फोडून पिस्तूल लावून २७ लाखांला लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी आठ वाजेच्या दरम्यान सोलापूर धुळे महामार्गावर करोडी फाटा येथे घडली आहे. महामार्गावर बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करून दुचाकीवर आलेले चोरटे पसार झाले आहे.

08:47 February 21

अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने महाविद्यालयीन युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील विमाननगर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. मैत्रिणीने अमली पदार्थांचे सेवन करण्यास भाग पाडल्याने तसेच मित्राने संशय घेऊन मारहाण केल्याने एका महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

07:39 February 21

एनआयएचे विविध राज्यांत ७० हून अधिक छापे

एनआयएने पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात 70 हून अधिक ठिकाणी शोध घेत छापे टाकले. हे छापे गुंड आणि त्यांच्या गुन्हेगारी सिंडिकेटविरुद्ध टाकण्यात आले आहे.

07:17 February 21

शोएब अख्तरला होती बॉलीवूडमध्ये मुख्य भूमिकेची ऑफर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमीच विधाने करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. बॉलीवूड चित्रपट गँगस्टरमध्ये मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती, असा त्याने दावा केला आहे.

07:17 February 21

तुर्कीमध्ये भूकंपाने पुन्हा केला कहर

तुर्कीमध्ये भूकंपाने पुन्हा कहर केला आहे. आणखी दोन भूकंप झाल्याने 3 ठार झाले आहेत. तर 213 जखमी झाले आहेत.

07:07 February 21

बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची निती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती

बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांची निती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सीईओ असलेले परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

06:47 February 21

प्रियकराशी बोलताना दिसल्याने वडिलासह दोन भावांनी मुलीची केली हत्या

सादिया कौशर या २० वर्षीय महिलेची चक्रधरपूरमध्ये तिचे वडील मुस्तफा अहमद आणि दोन भावांनी रात्री प्रियकराशी बोलताना दिसल्याने तिची हत्या केली. त्यांनी तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला आणि तिच्यावर कोणीतरी बलात्कार करून खून केल्याचा संशय आहे.

06:45 February 21

महाराष्ट्र सीमेजवळ नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान ठार, प्रत्युत्तरात दोन नक्षलवादीही ठार

राजनांदगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र सीमेजवळ नक्षलवाद्यांनी दोन जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही नक्षलवादी ठार झाले. शोध घेण्यात आला आणि पुढील तपास सुरू असल्याचे राजनांदगावचे एएसपी लखन पटले यांनी सांगितले. महाराष्ट्र सीमेपासून 800 मीटर अंतरावर छत्तीसगडमधील एका चेकपोस्टवर 14-15 नक्षलवाद्यांनी निशस्त्र छत्तीसगड पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याने दोन पोलिस कर्मचारी ठार झाले, तर एक जखमी झाल्याची माहिती नक्षलविरोधी ऑपरेशनचे डीआयजी संदिप पाटील यांनी दिली.

06:28 February 21

Maharashtra Breaking News : बारावीचा निकाल लांबण्याची चिन्ह, शिक्षक उत्तरपत्रिका न तपासण्यावर ठाम

मुंबई : बारावीच्या परीक्षा मंडळाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र राज्यातील 60000 कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्तर पत्रिका न तपासण्यावर ठाम राहिल्याने पुढील दोन चार दिवसांमध्ये याबाबत हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे . शासन हजारो शिक्षकांच्या मागण्यांना कोणता प्रतिसाद देते त्यावरच या आंदोलनाचे स्वरूप अवलंबून असेल. त्यामुळे बारावीच्या मंडळाच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत. 24 फेब्रुवारी पासून शिक्षक उत्तरपत्रिका तपासणार नाहीत. त्यामुळे निकाल लांबणार अशी चिन्ह दिसत आहेत.

Last Updated : Feb 21, 2023, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.