ETV Bharat / state

Breaking News Live : वणी तालुक्यातील रांगणा येथे तरुणावर वाघाचा हल्ला; तरुण जागीच ठार

aharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 10, 2022, 6:40 AM IST

Updated : Nov 10, 2022, 10:31 PM IST

22:29 November 10

वणी तालुक्यातील रांगणा येथे तरुणावर वाघाचा हल्ला; तरुण जागीच ठार

वणी तालुक्यातील रांगणा येथे तरुणावर वाघाने हल्ला केला आहे.यात तरुण जागीच ठार झाला आहे.

21:21 November 10

मुंबईत आज ४२ कोरोनाचे नवे रुग्ण, शून्य मृत्यू

मुंबई - गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली आली आहे. आज ४२ नव्या रुग्णांची तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या अडीच वर्षात १६० वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मागील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. त्यातही घट होऊन ३३७ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.

19:40 November 10

येत्या 12 तारखेपासून गुजरात, हिमाचलच्या एक्झिट पोलवर बंदी

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने 12 तारखेला सकाळी 8 AM वाजल्यापासून 5 डिसेंबरला संध्याकाळी 5.30 पर्यंत गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या एक्झिट पोल घेण्यास आणि प्रसिद्ध करण्यास मनाई केली आहे. यादरम्यान कोणताही एक्झिट पोल आयोजितही करता येणार नाही.

19:04 November 10

कळंब अंबाजोगाई रस्त्यावर अपघात, एकाचा मृत्यू एक गंभीर

बीड - कळंब अंबाजोगाई रस्त्यावरअपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. मोटारसायकला पिकअपने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. केज तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवासी लालासाहेब व्यकंट रोकडे हे त्यांचे चुलते किसन दादाराव रोकडे यांच्यासह मोटारसायकलवरून शेतात जात होते. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिल्यामुळे लालासाहेब रोकडे (46) यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना अंबेजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

18:55 November 10

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमधून आणणार - मुनगंटीवार

नांदेड - छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार इंग्लंडमधून परत आणली जाईल. कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.

18:44 November 10

सचिन वाजेने तुरुंगात सुरक्षा रक्षकाला धमकावले

मुंबई - सचिन वाजेने तुरुंगात सुरक्षा रक्षकाला धमकावले, NIA कडून सत्र न्यायालयात तक्रार दाखल

18:29 November 10

नांदेड - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा सुरू

नांदेड - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा सुरू झाली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ही राज्यात पहिली सभा होत आहे. राहुल गांधी काय संदेश देतात याची उत्सुकता.

17:00 November 10

भारत जोडो यात्रेचे स्वागत भाजपनेही करावे - संजय राऊत

मुंबई - राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. आज नांदेडमध्ये सभा आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाची नसून ही देशाला एकत्र आणण्यासाठी काढण्यात आलेली यात्रा आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी एकत्र आणत आहेत. भारत छोडो यात्रा ही ही केवळ यात्रा नसून एक आंदोलन आहे. यामध्ये भाजपनेही सहभागी झाले पाहिजे असे मत खा. संजय राऊत यांनी मांडले आहे.

16:54 November 10

राऊतांच्या संदर्भात ईडीच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी

मुंबई - ईडीच्या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या जामिनाविरोधात ईडी हायकोर्टात गेली होती. राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काल पत्राचाळ कथित मनी लाँड्रीन्ग प्रकरणात संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. आज ही सुनावणी होऊ शकली नाही. उद्या यावर सुनावणी होईल.

15:53 November 10

ईडीच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी

मुंबई - खासदार संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काल पत्राचाळ कथित मनी लाँड्रीन्ग प्रकरणात संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशाला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला होता. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या कोर्टासमोर या याचिकेवर काही वेळात सुनावणी होणार आहे.

15:49 November 10

संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई - संजय राऊत यांनी शरद पवार यांची आज भेट घेतली. सिल्वर ओके निवास्थानी त्यांनी भेट घेतली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंना भेटले. त्यानंतर त्यांनी पवारांची भेट घेतली.

15:28 November 10

विरोधी पक्षाच्या नेत्यांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न - महेश तपासे

मुंबई - भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्याकरता केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विरोधकांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शंका देशातील जनतेच्या मनात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आज ठाकरे आणि त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी काही विधाने केली. त्यावर तपासे प्रतिक्रिया देत होते.

14:42 November 10

अफझल खानाच्या थडग्याभोवतीच्या बांधकामांवर कारवाई विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, उद्या सुनावणी

नवी दिल्ली - अफझल खान याच्या थडग्याभोवतीच्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे. त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात शुक्रवारी सुनावणी करण्यात येणार आहे.

14:03 November 10

संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या ठाणे उपजिल्हा प्रमुखपदी वर्णी

ठाणे - मुख्यमंत्र्यांचा गड असलेल्या मतदार संघात ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची नियुक्ती. संजय घाडीगावकर यांची उपजिल्हा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. काही दिवसापूर्वीच शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला होता. उद्धव ठाकरे यांची सभादेखील याच मतदार संघात घेणार असल्याचे सांगितले.

13:52 November 10

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना त्यांची प्रकृती आणि वृद्धापकाळ लक्षात घेऊन त्यांना नजरकैदेत ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. महाराष्ट्रातील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याची विनंती नवलखा यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली.

13:14 November 10

तपास यंत्रणा केंद्राच्या तालावर नाचत आहेत - उद्धव ठाकरे

मुंबई - तपास यंत्रणा केंद्राच्या तालावर नाचत आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते संजय राऊत यांच्यासोबत पत्रकार परिषदेत बोलत होते. संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्याचा आनंद आहे असे ते म्हणाले.

13:09 November 10

सावधान, 13 नोव्हेंबरपासून 30 दिवसांसाठी मुंबईत ड्रोन उडवण्यावर बंदी

मुंबई - पोलिसांनी 13 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या कालावधीसाठी शहरात कोणतेही ड्रोन, रिमोट-नियंत्रित हलके विमान किंवा पॅराग्लायडर उडवण्यास प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हल्ल्याच्या धमकीच्या पार्श्वभूमिवर ही खबरदारी घेण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

13:00 November 10

मालदीवमध्ये आगीत 10 जण जळून ठार, 9 भारतीयांचा समावेश

माले (मालदीव) - येथे गुरुवारी कामगारांच्या घरांना लागलेल्या आगीत १० जण जळून ठार झाले आहेत. या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत. आगीतील मृतांमध्ये 9 भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. मालदीवमधील भारतीय दूतांकडूनही याबाबतचे एक ट्वीट करण्यात आले आहे. त्यांनी संपर्कासाठी फोन नंबरही दिले आहेत. दआगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

12:54 November 10

नेत्यांनी शांत राहायचे आणि इतरांना बोलायला लावायचे हे बंद करावे लागेल - फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

मुंबई - संजय राऊत काय बोलले ते मी ऐकले नाही म्हणून कुठलीही प्रतिक्रिया मी देणार नाही. राजकारणातील कटूता दूर करायची असेल तर सर्वांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष भूमिका घेऊ शकत नाही. नेत्यांनी शांत राहायचे आणि इतरांना बोलायला लावायचे ही जी पद्धत आहे ती बंद करावी लागेल, असे सूचक वक्तव्यही फडणवीस यांनी केले.

12:37 November 10

आदित्य ठाकरे संजय राऊतांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या प्रवेशद्वारवर

मुंबई - आदित्य ठाकरे संजय राऊतांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारवर उपस्थित होते. संजय राऊत मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहचले आहेत. संजय राऊतांनी आदित्य ठाकरे यांची मातोश्रीच्या दारातच गळाभेट घेतली.

12:06 November 10

संजय राऊत पवारांसह मोदी आणि शाह यांनाही लवकरच भेटणार

मुंबई - उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची आज भेट घेणार असल्याचे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले. लोकांच्या कामाशी संबंधित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही 2-4 दिवसांत भेट घेणार आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

11:58 November 10

शरद पवार उद्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाहीत - जयराम रमेश

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात आहेत. राहुल गांधींचे आणि त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली. डॉक्टरांनी पवारांना 3-4 आठवड्यांच्या विश्रांतीची शिफारस केली आहे. त्यामुळे शरद पवार उद्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी होणार नाहीत, असे रमेश यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे मात्र उद्या भारत जोडो यात्रेत सामील होतील असे ते म्हणाले.

11:36 November 10

आदित्य ठाकरे उद्या भारत जोडो यात्रेत येणार

आदित्य ठाकरे उद्या भारत जोडो यात्रेत येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड व सुप्रिया सुळे नांदेडला येणार असल्याचे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

11:10 November 10

भारत जोडो यात्रेची अमरावतीत तयारी सुरू

अमरावती : १८ नोव्हेंबर २०२२ रोजी शेगांव येथील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो पदयात्रे दरम्यान होणाऱ्या भव्य जाहिर सभेच्या पूर्व तयारीच्या नियोजना करिता अमरावती शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदधिका यांची बैठक काल काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पालकमंत्री डॉ. सुनिल देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडली. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, माजी महापौर, मिलिंद चिमोटे, प्रदेश चिटणीस असिफ तवक्कल, शोएब खान आदींची प्रमुख प्रमुख उपस्थिती होती.

11:08 November 10

राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवित आहेत-संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमाशी बोलताना शिंदे फडणीस सरकारवर टीका केली. माझा एकांतातला वेळ सत्कारणी लागला, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला. राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवित आहेत. दिल्लीमध्ये फडणवीस, मोदी व शाह यांची भेट घेणार आहे. राज्य सरकारचे काही निर्णय सकारात्मक आहेत, असेही ते म्हणाले.

10:06 November 10

अफजल खानची कबरदेखील काढा, हिंदू ब्राम्हण महासंघाची सरकारकडे मागणी

पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानच्या कबरी भोवतीचे अतिक्रमण करण्यात येत आहे. परंतु आता ही अफजलखानाची कबरथ सरकारने काढावी हे स्वराज्याचे शत्रू होते. हिंदुत्वाचे शत्रु होते. त्यांच्या अवतीभोवतीच्या अतिक्रमण काढताय. त्यांच्या कबरीतरी महाराष्ट्रात कशाला हवे आहेत? या सुद्धा सरकारने काढावी अशी मागणी हिंदू ब्राह्मण महासंघाने सरकारकडे केलेली आहे.

09:05 November 10

छत्तीसगडमधून 23 हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली विभागात दाखल

12-13 ऑगस्ट रोजी छत्तीसगडमधून 23 हत्तींचा कळप महाराष्ट्रातील गडचिरोली विभागात दाखल झाला. त्यांच्यामुळे 2 बळी आणि काही मालमत्तेचे नुकसान झाले. मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई आम्ही एका आठवड्यात शेतकऱ्यांना देऊ, असे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय वायभासे यांनी सांगितले.

09:03 November 10

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मुंबईच्या दौऱ्यावर येणार

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान इंदूर येथे होणाऱ्या गुंतवणूकदार परिषदेसाठी आज मुंबईला येणार आहेत. मध्यप्रदेशातील गुंतवणुकीच्या शक्यतांबाबत, विशेषत: फार्मा आणि वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रातील गुंतवणूकदारांशी ते वन-टू-वन बैठका घेतील.

08:49 November 10

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांची पोलिसांत तक्रार, दोघांविरोधात गुन्हा दाखल

राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा' वापरल्याप्रकरणी एकमेकांवर गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल एकमेकांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. चोप्राच्या तक्रारीवरून राखी सावंत आणि अधिवक्ता फाल्गुनी ब्रह्मभट्ट यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

07:47 November 10

राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांसह सुरू केली नांदेडमधून पदयात्रा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील नांदेड येथील कापशी चौक येथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू केली.

06:54 November 10

भारत जोडो यात्रेत आज नांदेडमध्ये पदयात्रा, असा असेल दिवसभरात कार्यक्रम

स. 5.45 वा. कापशी गुंफा पदयात्रा प्रारंभ

स. 6.15 वा. महाटी फाटा

स. 6.40 वा. मारतळा

स. 8.00 वा. काकांडी

स. 8.45 वा. जवाहरनगर

स. 9.00 वा. तुप्पा फाटा

स. 9.30 वा. चंदासिंग कॉर्नर, नांदेड येथे राखीव

दु. 3.00 वा. देगलूर नाका, नांदेड पदयात्रा प्रारंभ

दु. 3.20 वा. बाफना टी-पॉईंट, नांदेड

दु. 3.35 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नांदेड

दु. 3.45 वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नांदेड

दु. 3.50 वा. मुथा चौक, वजिराबाद

दु. 3.55 वा. आयुर्वैदिक महाविद्यालय, नांदेड

दु. 4.00 वा. कलामंदीर, नांदेड

दु. 4.10 वा. जनता मार्केट, शिवाजीनगर, नांदेड

दु. 4.20 वा. महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, नांदेड

दु. 4.30 वा. डॉ. शंकरराव चव्हाण पुतळा

दु. 4.40 वा. नवा मोंढा मैदान जाहीर सभा

06:49 November 10

निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने काँग्रेस आमदाराचा राजीनामा

गुजरातमधील झालोद येथील काँग्रेस आमदार भावेश कटारा यांनी विधानसभा अध्यक्ष निमाबेन आचार्य यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यांना गुजरात विधानसभेत काँग्रेसकडून तिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले होते.

06:45 November 10

मुंबईत गोवर रुग्णांचे वाढते प्रमाण, केंद्राचे पथक शहरात दाखल

गोवर प्रकरणांचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्राने बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय पथक तैनात केले. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.

06:44 November 10

किंग चार्ल्स तिसरा आणि पत्नीवर अंडी फेकण्याचा प्रयत्न

किंग चार्ल्स तिसरा आणि त्याची पत्नी राणी कॉन्सॉर्ट कॅमिला यांच्या उत्तर इंग्लंडच्या भेटीदरम्यान अज्ञाताने अंडी फेकण्याचा प्रयत्न केला. पण, दोघेही अंड्याच्या फटक्यातून बचावले आहेत. पोलिसांनी अंडी फेकणाऱ्याला अटक केली आहे.

06:40 November 10

आसाममध्ये 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची नितीन गडकरींकडून घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आसाममध्ये 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा केली.

06:36 November 10

सुकेश चंद्रशेखरकडून दुसऱ्या तुरुंगात हलविण्याची मागणी, दिल्लीच्या नायब राज्यपालांना लिहिले पत्र

सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहून, त्यांना आणि त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या बाहेर इतर कोणत्याही तुरुंगात स्थानांतरित करण्याची मागणी केली. सतत धमक्या आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा आरोप त्याने केला. तुरुंगात सीआरपीएफ जवानांनी मारहाण केल्याचा आरोपही सुकेशने केला. फसवणुकीच्या प्रकरणात सुकेश चंद्रशेखरला अटक आहे.

06:27 November 10

Maharashtra Breaking News भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत तुरूंगातून बाहेर आले आहेत. बुधवारी त्यांचा कोर्टाने जामीन मंजूर केला. कोर्टाने संजय राऊत यांना जामीन जाहीर करताच त्यांच्या समर्थकांनी टाळ्या वाजवल्या. संजय राऊत अर्थर रोड कारागृहातून बाहेर येताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. कारागृह ते संजय राऊत यांचे भांडुप येथील घर अशी मोठी रॅली काढली.

Last Updated : Nov 10, 2022, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.