ETV Bharat / state

Breaking News: पुण्यातील कोंढवा भागात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग - Etv Bharat Marathi News

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Nov 3, 2022, 6:21 AM IST

Updated : Nov 3, 2022, 9:53 PM IST

21:53 November 03

Breaking News: पुण्यातील कोंढवा भागात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग

19:47 November 03

मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांचा राजीनामा

फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी राजीनामा दिला आहे. अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटाने जाहीर केली आहे.

19:25 November 03

जिल्हा रुग्णालयात फरशीवर तडफडतोय रुग्ण, रक्त चाटत आहे कुत्रा

कुशीनगर (उत्तरप्रदेश) - कुशीनगर जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये जखमी व्यक्ती जमिनीवर पडून असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याचवेळी कुत्र्याचे पिलू त्याचे रक्त चाटत असल्याचे दिसत आहे. या दरम्यान आपत्कालीन वॉर्डातून डॉक्टर व कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून येत आहे. येथे क्लिक करा आणि पाहा व्हिडिओ.

18:44 November 03

पाण्याच्या वादातून हाणामारीत दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून एकाचा जागीच मृत्यू

ठाणे - एका इमारतीमध्ये शेजारी राहणारे दोघे तरुण पाण्याच्या वादातून पक्के वैरी होऊन दोघात हाणामारी झाली. या हाणामारीत दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन दोघेही इमारतीच्या खाली पडल्याने त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भिवंडी शहरातील काटई नाका परिसरातील इमारतीत घडली आहे. याप्रकरणी दुसऱ्या शेजाऱ्यावर निजामपुरा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषार सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या शेजाऱ्याचे नाव आहे. तर सादीक कासिम अन्सारी (२६) असे जागीच मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

18:36 November 03

पाचूबंदरमधून मच्छीमार बोटीसह खलाशी गायब

वसई - पाचूबंदरमधून मच्छीमार बोटीसह खलाशी गायब. कस्टम व पोलिसांची समुद्रात शोध मोहीम सुरू

18:04 November 03

आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये बदल करणार - सरकार

मुंबई - आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये राज्यसरकार बदल करणार आहे. त्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यन्त सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर हटके सूचना असेल तर बक्षीस देखील मिळेल असे जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

17:40 November 03

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार

लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. त्या गोळीबारात खुद्द इम्रान खानही जखमी झाले आहेत. त्यांच्याशिवाय आणखी चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. त्याचबरोबर इम्रान खान यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

17:05 November 03

शीना बोरा अजूनही जिवंत असल्याचा दावा

मुंबई - शीना बोरा हत्याकांड प्रकरणात आज पुन्हा खळबळजनक दावा करण्यात आला. शीना बोरा अजूनही जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे. राहुल मुखर्जीच्या मोबाईल मधील संभाषण आणि मेसेजचा हवाला देऊन इंद्राणीचे वकील रणजित सांगळे यांनी असा दावा केला आहे. या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार राहुल मुखर्जीची उलटतपासणी झाली. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे त्याने दिली नाहीत. त्यामुळे शीना बोरा जिवंत असल्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी सांगळे यांनी केली.

16:49 November 03

विदेशी चलन दुबाईला घेऊन जाणाऱ्या 3 भारतीयांना अटक

मुंबई - एअरपोर्ट कस्टम्सने केलेल्या कारवाईत दुबईला जाणाऱ्या 3 भारतीयांना अटक करण्यात आली. या तिघांच्या सामानाच्या तपासणीत 4,97,000 USD (अंदाजे 4.1 कोटी रुपये) किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले. सर्व 3 प्रवाशांना अटक करण्यात आली.

16:39 November 03

मुलीच्या अपहरण प्रकरणाची फक्त 48 तासांत उकल

मुंबई - पोलिसांनी एका वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणाची 48 तासांत उकल करून 2 आरोपींना अटक केली. अपह्रत मुलीला सोलापूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेऊन सीपी विवेक फणसळकर यांनी तिच्या आईच्या ताब्यात दिले. आईसोबत झोपलेली असताना सांताक्रूझ येथील रस्त्याच्या कडेला एका महिलेने तिचे अपहरण केले होते.

16:29 November 03

राणा आणि आपण एका पंगतीत जेवायला बसू - बच्चू कडू

राणा आणि आपण एका पंगतीत जेवायला बसू असे विधान आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आता दोघांमध्ये समेट झाला आहे. कोणताही गैरसमज नाही. यापुढेही काही गैरसमज होणार नाही याची ग्वाही त्यांनी पत्रकारांसमोर आज दिली.

15:48 November 03

कोल्हापूर - कथित लव जिहाद प्रकरणातील संशयित न्यायालयात दाखल

कोल्हापूर - कथित लव जिहाद प्रकरणातील संशयित आरोपी न्यायालयात दाखल. संशयिताविरोधात न्यायालयात सुनावणी सुरू. अठरा दिवसापासून एका अल्पवयीन मुलीला घेऊन बेपत्ता होता तरुण. तरुण मुस्लिम समाजाचा असल्याने लव जिहाद झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा होता संशय. काल जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर झाले होते हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन. संशयतिला मुलीसह कर्नाटकातून घेतले ताब्यात.

14:25 November 03

केईएम रुग्णालयात नर्सेस क्वार्टरमधील सीलिंगचा काही भाग कोसळला

मुंबई - पालिकेच्या केईएम रुग्णालयात नर्सेस क्वार्टरमधील सीलिंगचा काही भाग कोसळला. नर्ससाठी जेवण बनवायला आलेली एक महिला जखमी.

14:08 November 03

टिकली किंवा कुंकू लावायचे की नाही ही महिलांची वैयक्तिक निवड - नीलम गोर्‍हे

मुंबई - टिकली किंवा कुंकू लावायचे की नाही ही महिलांची वैयक्तिक निवड आहे. स्त्रियांना बोलण्यासाठी अटी घालणे हे अयोग्य आहे. ही घटना मंत्रालयात घडायला नको होती, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मांडले आहे.

14:01 November 03

पुणे - सोपान नगर येथील अहमदनगर रोडवरील एका गोदामाला आग

पुणे - सोपान नगर येथील अहमदनगर रोडवरील एका गोदामाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. आग विझवण्याचे काम सुरू आहे.

13:49 November 03

ग्रामविकास विभागात वीस हजार पदांची भरती - चंद्रकात पाटील

पुणे - लवकरच राज्यात ग्रामविकास विभागात वीस हजार पदांची भरती होणार आहे अशी माहिती भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी दिली. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे ते म्हणाले. सरकारी नोकरीची एक मर्यादा आहे. पदभरतीसाठी कोण आंदोलन करत असेल तर करू द्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

12:40 November 03

गोव्यात भ्रष्टाचार नाही?

पणजी - गेल्या 5 वर्षांपासून आमच्याकडे लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार आलेली नाही. म्हणजे गोव्यात भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचाराप्रती जनतेची सहनशीलता फार मोठी आहे. केंद्र सरकारचे विभाग येथे भ्रष्ट नाहीत, असे सीबीआयचे एस पी आशेष कुमार यांनी स्पष्ट केले.

12:26 November 03

गुजरात निवडणूक जाहीर, 1 आणि 5 डिसेंबरला मतदान, 8 तारखेला निकाल

गुजरात विधानसभा निवडणूक जाहीर दि. 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला मतदान होईल. तर निकाल 8 डिसेंबरला लागणार. निवडणूक आयोगाने ही गोष्ट आत्ताच जाहीर केली.

12:24 November 03

गुजरात निवडणूक काळात फेक न्यूजवर नजर राहणार

गुजरात निवडणूक काळात फेक न्यूजवर नजर राहणार असे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

12:19 November 03

सलमान खानच्या याचिकेवर आजही निर्णय नाही

मुंबई - अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर आजही निर्णय नाही. न्यायाधीश निवृत्त होत असल्याने दुसऱ्या खंडपीठांसमोर दाद मागण्याचे निर्देश. सलमान खानच्या शेजाऱ्याविरुद्धच्या याचिकेवर पुन्हा नव्या खंडपीठासमोर सुनावणी करावी लागणार आहे. न्यायमूर्ती सीव्ही भडंग, जे निवृत्त होणार आहेत, त्यांनी या प्रकरणाची पूर्ण सुनावणी केली होती. परंतु वेळेअभावी ते निकाल देऊ शकले नाही.

12:10 November 03

पत्रकार परिषदेत गुजरात निवडणुकीची घोषणा

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. या पत्रकार परिषदेत गुजरात निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे.

12:01 November 03

विदेशी चलन जप्त

मुंबई - विमानतळ सीमाशुल्क विभागाने काल दुबईला जाणाऱ्या तीन भारतीय प्रवाशांकडून USD 4,97,000, म्हणजे सुमारे 4.1 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त केले. तिघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

11:56 November 03

राज्यातील सर्व सुशिक्षित तरुणांची निराशा - जयंत पाटील

पुणे - महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पळवून न्यायचे काम चालू आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ढिम्मपणाने ते बघत बसले आहेत. राज्यातील सर्व सुशिक्षित तरुणांची निराशा झाली आहे, असेही ते म्हणाले. foxcon आला असता तर ४ लाख लोकांना रोजगार मिळाला असता. महाराष्ट्र सरकारने गुजरातची चाकरी करण्याचे ठरवले आहे. महविकास आघाडीने अनेक भरतीबाबत निर्णय घेतले होते. सगळे प्रस्ताव पाठवूनसुद्धा हे सरकार अडथळे आणत आहे, असा आरोपही पाटील यांनी केला.

10:57 November 03

मोरबी दुर्घटनेत बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडेपर्यंत शोध मोहीम सुरू

मोरबी पुल दुर्घटनेत शोध मोहिम सुरू आहे. बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडेपर्यंत शोध मोहीम सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. सर्व एजन्सी सहकार्याने काम करत आहेत, असल्याचे एनडीआरएफचे कमांडंट राकेश कुमार यांनी म्हटले आहे.

10:06 November 03

अय्यान्ना पात्रुडू यांच्या अटकेचा चंद्राबाबु नायडू यांनी केला निषेध

टीडीएस प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी पक्षाचे नेते अय्यान्ना पात्रुडू आणि त्यांचा मुलगा राजेश यांच्या अटकेचा निषेध केला. त्यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली आणि म्हटले- पत्रुडू यांचा विविध प्रकारचा छळ केला जात आहे. ही अटक मागासवर्गीयांचा आवाज दाबण्यासाठी आहे.

09:06 November 03

मच्छिमार सहकारी संस्थांच्या समस्यासाठी आयुक्तस्तरावरील समिती स्थापन करणार

राज्यातील गोड्या पाण्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी, विकासात्मक आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्त स्तरावरील समिती स्थापन करण्यात येणार आहे.

09:05 November 03

वनमंत्री मुनगटीवर यांच्या कार्यावरील ऑडिओ बुकचे मुख्यमंत्री यांनी केले उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा कल्पवृक्ष ऑडिओ बुक उद्घाटन करून सर्वजनिक केले. हे ऑडिओ बुक सुधीर यांच्या कार्यासंबंधी आहे. मंत्रालयामध्ये सायंकाळी या ऑडिओ बुकचे उद्घाटन करण्यात वनमंत्री सुधीर मुनगटीवर देखील उपस्थित होते. विकासा चाकल्पवृक्ष हे ऑडिओ बुक मंत्री सुधीर मनगटीवर यांच्यातील संवेदनशील माणूस लोकांपर्यत पोहोचवेल. त्या दृष्टीने ही ऑडिओ बुकची संकल्पना निश्चितच महत्त्वाची आणि उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऑडियो बुकच्या प्रकाशनप्रसंगी सांगितले.

09:04 November 03

गेल्या 5 वर्षांपासून गोव्यात लाचखोरीची एकही तक्रार नाही, सीबीआयच्या अधिकाऱ्याचा दावा

गेल्या 5 वर्षांपासून आमच्याकडे लाचखोरीची किंवा बेहिशोबी मालमत्तेची एकही तक्रार आलेली नाही. म्हणजे गोव्यात भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचाराप्रती जनतेची सहनशीलता फार मोठी आहे. केंद्र सरकारचे विभाग येथे भ्रष्ट नाहीत, असे एसपी (सीबीआय) आशेष कुमार यांनी म्हटले आहे.

07:47 November 03

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार

गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे.

06:37 November 03

कोल्हापुरातील बेपत्ता शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह सापडली

कोल्हापुरातील बेपत्ता शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह सापडली आहे. कर्नाटकातील संकेश्वरमध्ये दोघेही सापडले आहेत. दोघेही संकेश्वर पोलिसांच्या ताब्यात आहेत. कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले आहेत. 17 दिवसानंतर दोघेही सापडले आहेत. नितेश राणे यांचे सकाळी आंदोलन तर रात्री पोलिसांनी शोध घेतला आहे.

06:24 November 03

शेतकऱ्यांचा बोजा कमी करण्यासाठी सरकार यावर्षी खतांवर सर्वाधिक अनुदान देणार

शेतकऱ्यांचा बोजा कमी करण्यासाठी सरकार यावर्षी खतांवर सर्वाधिक अनुदान देणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली.

06:03 November 03

Breaking News मोरबी दुर्घटनेत बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडेपर्यंत शोध मोहीम सुरू

मुंबई: राम सेतू स्टार अक्षय कुमार महेश मांजरेकर यांच्या पुढील वेदात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाद्वारे मराठी पदार्पण करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षय छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. वेदात मराठे वीर दौडले सातची निर्मिती वसीम कुरेशी यांनी केली आहे.

Last Updated : Nov 3, 2022, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.