ETV Bharat / state

Breaking News: लोकांना तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले- शीतल म्हात्रे - Maharashtra live update

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 12, 2023, 6:32 AM IST

Updated : Mar 12, 2023, 10:00 PM IST

22:00 March 12

लोकांना तो व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले- शीतल म्हात्रे

मुंबई - स्थानिक आमदार, खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेल्या रॅलीदरम्यान मला लक्ष्य करणारा व्हिडिओ बनवण्यात आला होता. मातोश्री नावाच्या एफबी पेजवर घाणेरड्या गाण्यांसह हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. लोकांना तो व्हायरल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते, अशी प्रतिक्रिया शीतल म्हात्रे यांनी दिली आहे.

20:54 March 12

आदिवासी यांना 'वनवासी' म्हणणे अपमानास्पद - शरद पवार

मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. आदिवासी यांना 'वनवासी' म्हणणे अपमानास्पद आहे आणि जे हा शब्द वापरतात ते त्यांचे अज्ञान दाखवतात, असे पवार यावेळी म्हणाले.

19:36 March 12

इस्लामिक स्टेट- खोरासान प्रांत प्रकरणात पुणे येथे एनआयएचा छापा

नवी दिल्ली - एनआयएच्या पथकांनी काल इस्लामिक स्टेट- खोरासान प्रांत प्रकरणात पुणे येथील तलहा खान आणि सिवनी (मध्य प्रदेश) येथे अक्रम खान या संशयितांच्या घरांची झडती घेतली होती. अशी माहिती एनआयएने आज दिली आहे.

19:36 March 12

वाहतूक पोलिसाला मारहाण व शिवीगाळ प्रकरणी आरोपीला अटक

मुंबई - 11 मार्च रोजी आरोपी खालिद इसाक वसईकर (वय 53) याने कुर्ला एलबीएस मार्गावर सिग्नल तोडला होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता कॉन्स्टेबलला मारहाण आणि शिवीगाळ त्याने केली होती. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दोन फरार आहे. आयपीसी अंतर्गत तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18:26 March 12

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या भाजप आमदारावर गुन्हा दाखल

चंद्रपूर - एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघातील आमदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पतीला मारहाण केल्याचा आरोपही या महिलेने केला आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. भाजपचे कीर्तीकुमार उर्फ ​​बंटी भांगडीया या आमदारावर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 354 यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17:58 March 12

वायू प्रदूषणाबाबत ७ दिवसांत अहवाल सादर करा - मुंबई पालिका आयुक्त

मुंबई - वायू प्रदूषणाबाबत ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. अहवालाच्या आधारे, १ एप्रिलपासून बीएमसी परिसरात धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे पालिकेने सांगितले आहे.

17:58 March 12

हंगामातील सर्वोच्च कमाल तापमान सांताक्रूझमध्ये

मुंबई - आज (12 मार्च 2023) सांताक्रूझ वेधशाळेने हंगामातील सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद केली आहे. सांताक्रूझ येथे ३९.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिली आहे.

17:58 March 12

अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

मुंबई - अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांची KYC सायबर फ्रॉड टोळीने ९९,९९८ रुपयांची फसवणूक केली होती. मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,419,66c आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

16:29 March 12

२१ कोटी रुपये किंमतीचे 'ट्रामाडोल' मुंबई कस्टमने पकडले

मुंबई - दक्षिण सुदानला सुमारे 10 लाख गोळ्या असलेली निर्यातीची खेप मुंबई कस्टमने पकडली आहे. टेस्ट केल्यानंतर ते 'ट्रामाडोल' असल्याची पुष्टी झाली. हा एक सायकोट्रॉपिक पदार्थ आहे. जप्त केलेल्या औषधाची किंमत २१ कोटी रुपये आहे. याबाबत बेंगळुरू, गुंटूर आणि मुंबईत शोध घेण्यात आला आहे. याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे.

15:29 March 12

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाकडून यात्रेदिवशीच वडिलांची हत्या; कराड तालुक्यात खळबळ

सातारा - दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने वडिलांचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना कराड तालुक्यातील जखिणवाडी येथे घडली आहे. ऐन यात्रेदिवशी घडलेल्या या घटनेने कराड तालुक्यात खळबळ उडाली आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी अर्जुन शिवाजी पाटील या संशयितास ताब्यात घेतले आहे.

14:56 March 12

महिला कॉन्स्टेबलच्या पतीची आत्महत्या, कॉन्स्टेबल बहिणींसह आई-वडिलांवर गुन्हा दाखल

सातारा - माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलच्या पतीने धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नवनाथ मारूती दडस, असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसवड आणि फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या कॉन्स्टेबल बहिणींसह त्यांच्या आई-वडीलांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेने सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

14:49 March 12

भूम परिवहन आगारास मिळाल्या चार नवीन बस

धाराशिव - जिल्ह्यातील भूम परिवहन आगारास चार नवीन बसेस मिळाल्या आहेत. भूम आगारातील एसटीच्या दुरावस्थेचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात मांडल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आगारातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आले होते. वरीष्ठ पातळीवरून हे निलंबन रद्द करून या आगारास दहा नवीन गाड्या देण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यापैकी ४ बसेस भूम आगारात दाखल झाल्या आहेत. आता उर्वरित बसेस लवकरच दाखल होतील अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.

14:49 March 12

महाड आसनपोई गावात गुरांच्या गोठ्याला आग, आगीत गुरांचा गोठा भस्मसात

महाड औद्योगिक वसाहती मधील आसनपोई गावात अज्ञाताने शेताच्या बांदाला आग लावली होती. या आगीचे रुपांतर वणव्यात होऊन गावालगत असलेल्या गुरच्या गोठ्याला आग लागल्याचा प्रकार घडला आहे. तर या आगीमध्ये आणखी एका शेतकऱ्याचा वर्षभराचा गुरंचा चारा जाळून खाक झाल्याने दोनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरापाई मिळावी अशी मागणी होत आहे.

14:28 March 12

यात्रेसाठी गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार, मुलगा गंभीर

सातारा - यात्रेसाठी मूळगावी निघालेल्या कुटुंबावर काळाने घातला असून रिक्षा आणि ट्रॅक्टरच्या अपघातात आई-वडिलांसह मुलगी जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कराड-चांदोली मार्गावर लोहारवाडी (ता. कराड) हद्दीत हा भीषण अपघात झाला आहे. सुरेश सखाराम महारुगडे (वय 39), सुवर्णा सुरेश महारुगडे (34), समिक्षा सुरेश महारुगडे (13), अशी अपघातातील मृतांची तर समर्थ सुरेश महारुगडे (17) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. म्हारूगडे कुटुंब पुण्याहून यात्रेसाठी पनुंद्रे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) या आपल्या मूळगावी रिक्षाने निघाले होते. मात्र, वाटेतच या कुटुंबावर काळाने घाला घातला.

13:54 March 12

शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून आज किनगावहुन पदयात्रेस प्रारंभ

किसानपुत्र आंदोलनाच्या अवहानानुसार शेतकरी आत्महत्या थांबाव्यात म्हणून आज (13 मार्च) रोजी किनगाव (ता.यावल जि जळगाव) येथून पदयात्रा निघत आहे. ही पदयात्रा चोपडा, अंमळनेर मार्गे 19 मार्च रोजी धुळ्याला पोचणार आहे. किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी सांगितले की, डॉ. राजीव बसर्गेकर (नवी मुंबई) आणि सुभाष कच्छवे (परभणी) हे या पदयात्रेचे संचालन करणार आहेत. पदयात्रेत एकूण अकरा जण पूर्णवेळ राहणार असून अनेक लोक या गावातून त्या गावापर्यंत चालणार आहेत. किनगावहून निघालेल्या या पदयात्रेचा समारोप जेल मैदान येथे सभा घेऊन होणार आहे. या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (अकोला) प्रख्यात विचारवंत विनय हार्डीकर (पुणे) किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब (आंबाजोगाई) हे मार्गदर्शन करणार आहेत.

13:42 March 12

1.05 कोटी रुपये किमतीच्या अवैध विदेशी मूळ सिगारेटचे ७० बॉक्स जप्त

आसाम रायफल्सने 1.05 कोटी रुपये किमतीच्या अवैध विदेशी मूळ सिगारेटचे 70 बॉक्स जप्त केले. 10 मार्च रोजी एका व्यक्तीला अटक केल्याचे आसाम रायफल्सने म्हटले आहे.

13:39 March 12

प्रवाशांचे शौचालयात धुम्रपान, विमान मुंबईत आल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घेतले ताब्यात

लंडन-मुंबईहून निघालेल्या AI130 फ्लाइटमधील एक प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होते. आणि वारंवार चेतावणी देऊनही बेजबाबदार आणि आक्रमक वर्तन करताना आढळले. विमान मुंबईत आल्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.

13:15 March 12

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शितल म्हात्रे यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (शिंदे गट) आणि शितल म्हात्रे या नेत्याचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

13:15 March 12

अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेची आई स्नेहलता दीक्षित यांचे निधन झाले आहे. त्या ९० वर्षांच्या होत्या. स्नेहलता दीक्षित यांच्यावर आज दुपारी ३:०० वाजता वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

12:00 March 12

भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजेवळ जप्त केले दोन किलो अमली पदार्थ आणि दोन किलो आयईडी

भारतीय सैन्याने 11 मार्च रोजी नियंत्रण रेषेजवळ झांगर, नौशेरा येथे ऑपरेशन केले. या कारवाईत दोन अत्याधुनिक पिस्तूल, दोन किलो अमली पदार्थ आणि दोन किलो IED जप्त करण्यात आले.

11:51 March 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंड्या येथे रोड शो, सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण

कर्नाटकातील मंड्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असताना भाजप समर्थक आणि स्थानिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यांच्या दौऱ्यात पंतप्रधान सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येणार आहे.

10:09 March 12

समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, पाच जण ठार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघातात पाच जण ठार झाले आहेत.

09:55 March 12

इंधनाची पाइपलाइन फुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, ४८ तासानंतर पाईपलाईन दुरुस्त

ठाणे जिल्ह्यातील शिल भागात इंधनाची पाइपलाइन फुटल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही आग 48 तासांनंतर दुरुस्त करण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. मुंबई ते नाशिक जिल्ह्यातील मनमाड ही 18 इंची लाईन आहे. भूमिगत केबलला आग लागल्याने आणि त्यानंतरच्या स्फोटानंतर गळती लागली होती. किमान ६ डझन एजन्सींनी एकत्रितपणे काम करून पूर्ववत केली, असे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले.

09:02 March 12

तीन परदेशी नागरिकांकडून १.४० कोटी रुपयांचे ३ किलो सोने जप्त

आदिस अबाबाहून मुंबईत आलेल्या तीन परदेशी नागरिकांकडून १.४० कोटी रुपयांचे ३ किलो सोने जप्त करण्यात आले. अंडरगारमेंट्स आणि फुटवेअरच्या इनसोलमध्ये सोने लपविल्याचे आढळल्याचे मुंबई कस्टम्स विभागाने म्हटले आहे. ही घटना १० मार्च रोजी घडली होती. आता, त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

08:58 March 12

बंदरे, विमानतळ इत्यादींचे रक्षण करणे खूप महत्वाचे-अमित शाह

पीएम मोदींनी 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे व्हिजन मांडले आहे. त्यासाठी बंदरे, विमानतळ इत्यादींचे रक्षण करणे खूप महत्वाचे आहे. सीआयएसएफ गेल्या 53 वर्षांपासून करत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे रक्षण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात म्हटले आहे.

08:14 March 12

निरमाची जाहिरात दाखवून बीआरएसने अमित शाह यांचे केले उपहासात्मक स्वागत

बीआरएसच्या आमदार के कविता यांच्या सुरू असलेल्या ईडी चौकशीनंतर भाजपविरोधात बीआरएस आक्रमक झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज हैदराबाद शहरातील सीआयएसएफ स्थापना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. अशातच हैदराबादमध्ये इतर पक्षांमधून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांची खिल्ली उडविणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. यामध्ये वॉशिंग पावडर निरमाची जाहिरात दाखविली असून अमित शाह यांचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

07:17 March 12

पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर पुन्हा दगडफेक, घटनेचे चौकशी करण्याचे आदेश

शनिवारी संध्याकाळी पश्चिम बंगालमधील फरक्काजवळ वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे.हावडा स्टेशनचे दृश्य ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याची चौकशी केली जाईल. त्याची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे ईस्टर्न रेल्वेचे सीपीआरओ कौशिक मित्रा यांनी सांगितले.

07:05 March 12

विदेशी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबईच्या आंबोली परिसरात एका विदेशी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोलंडची रहिवासी आहे.

06:55 March 12

पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू-म्हैसूर महामार्ग देशाला करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौर्‍यावर जाणार आहेत. तेथे ते बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे देशाला समर्पित करतील. पंतप्रधान मोदी हंपीच्या स्मारकांच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या होसापेटे रेल्वे स्थानकाचे उद्घाटनही करणार आहेत.

06:24 March 12

Maharashtra Breaking News: इमारतीवरून लोखंडी रॉड पडल्याने दोन जणांचा मृत्यू

मुंबई: जोगेश्वरी पूर्व येथील शाल्यक हॉस्पिटल जवळ एका निर्माण आधीन इमारतीवरून लोखंडी रॉड पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोगेश्वरी स्टेशन रोड येथे शाल्यक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल जवळ एका एसआरए इमारतीचे बांधकाम सुरू होते. या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून एक लोखंडी रॉड खाली कोसळला. इमारती खालून जाणाऱ्या दोन जणांच्या डोक्यावर हा रॉड पडला. या दोन्ही जखमींना एका रिक्षाद्वारे ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी क्षमा बानू असिफ शेख 28 वर्ष या महिलेचा मृत्यू झाला. तर आयात शेख या ९ वर्षीय मुलीला ट्रॉमा केअर रुग्णालयातून कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले. या रुग्णालयात उपचारादरम्यान आयात शेख या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 12, 2023, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.