मुंबई - जोगेंद्र कवाडे यांच्यासोबतची ही युती रामदास आठवले किंवा इतर कोणत्याही ज्येष्ठ आरपीआय नेत्याशी सल्लामसलत न करता करण्यात आल्याने आम्ही नाराज आहोत: जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी झालेल्या युतीबाबत आरपीआय नेते अविनाश महातेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कवाडे यांच्या क्षमतेवर आम्ही भाष्य करणार नाही, पण अशा युतीपूर्वी आमच्या नेत्यांचा सल्ला घ्यायला हवा होता. आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे, असेही आरपीआय नेते अविनाश महातेकर यावेळी म्हणाले.