सातारा - वीटभट्टीवर कामगार पुरवतो म्हणून पैसे घेऊन कामगार पुरवला नाही. तसेच घेतलेले पैसेही परत करत नसल्याने सोलापुरातील एकास गाडीत घालून आणताना केलेल्या मारहाणीमुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आंबोली घाटातून मृतदेह टाकताना दोघांपैकी एकजण तोल जाऊन दरीत पडला. त्यात त्याचाही मृत्यू झाला. भाऊसाहेब माने (रा. गोळेश्वर, ता. कराड), असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी निखील पवार (रा. सुर्यवंशी मळा, कराड) याला चौकशीसाठी आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Breaking News Live : आंबोली घाटात मृतदेह टाकायला गेलेल्या कराडमधील दोघांपैकी एकाचा दरीत कोसळून मृत्यू - ईटीव्ही भारत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
21:48 January 31
आंबोली घाटात मृतदेह टाकायला गेलेल्या कराडमधील दोघांपैकी एकाचा दरीत कोसळून मृत्यू
20:14 January 31
माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

19:45 January 31
चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची भर रस्त्यात हत्या, स्वत: केला आत्महत्येचा प्रयत्न
पालघर - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरातील एका ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या ४० वर्षीय पत्नीचा रस्त्यावर गळा चिरून खून केला आणि स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
18:05 January 31
कौटुंबिक कलहातून विवाहितेची तीन वर्षांचा चिमुकलीसह अंबाझरी तलावात आत्महत्या
नागपूर - अंबाझरी तलावात एका 28 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या अवघ्या तीन वर्षीय मुलीसोबत उडी घेत आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज उजेडात आली आहे.
17:08 January 31
एअर इंडियाच्या विमानात महिलेवर लघुशंका प्रकरण; शंकर मिश्राला जामीन मंजूर
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्कहून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका महिलेवर लघवी केल्याचा आरोप असलेल्या शंकर मिश्रा यांना पतियाळा हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला. त्याला दिल्ली पोलिसांनी ६ जानेवारीला अटक केली होती.
16:48 January 31
'जय जय महाराष्ट्र माझा'ला राज्य गीत म्हणून मान्यता
मुंबई - महाराष्ट्र सरकारने मंगळवारी 'जय जय महाराष्ट्र माझा'ला राज्य गीत म्हणून मान्यता दिली. 19 फेब्रुवारीला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी हे गाणे स्वीकारण्यात येणार आहे.
16:41 January 31
सुरजागड लोहखनिज खाण जाळपोळ प्रकरण; वकील सुरेंद्र गडलिंग यांना जामीन नाकारला
नागपूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 2016 मधील सुरजागड लोहखनिज खाण जाळपोळ प्रकरणी वकील सुरेंद्र गडलिंग यांना जामीन नाकारला.
16:07 January 31
अधिष्ठाता नियुक्ती प्रकरणी नागपूर खंडपीठाची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस
नागपूर - अधिष्ठाता नियुक्तीचा वाद उच्च न्यायालयापर्यत गेला आहे. अधिष्ठाता नियुक्ती प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नोटीस बजावण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादात अडकताना दिसत आहेत. माजी सिनेट सदस्य मोहन वाजपेयी यांनी प्राचार्य प्रशांत कडू यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले आहे.
15:52 January 31
लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा
लैंगिक अत्याचार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
15:48 January 31
मला नोटीस काढणाऱ्याला समोर आणा; म्हाडाच्या सीईओंना परबांनी धरले धारेवर
मुंबई - वांद्रे येथील शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालयाच्या पाडकामानंतर शिवसेना नेते अनिल परब यांनी थेट म्हाडा कार्यालय गाठत, सीईओंना धारेवर धरले. कार्यलयाशी माझा संबंध नसताना, नोटीस काढणाऱ्या अधिकाऱ्याला समोर आणा, अशी मागणी परब यांनी केली. दरम्यान, घोषणाबाजी करत गदारोळ करणाऱ्या सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
15:15 January 31
पॉर्न चित्रफित दाखवण्याचे प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतरांवर कायदेशीर कारवाई होणार
कोल्हापूर - पॉर्न चित्रफित दाखवण्याचे प्रकरण लपवणाऱ्या मुख्याध्यापक आणि इतरांवर कायदेशीर कारवाई होणार. एसपी शैलेश बलकवडे यांचा इशारा. नराधम शिक्षक विजयकुमार बागडी याच्यावर गुन्हा दाखल करून केली अटक.
14:50 January 31
मालगाडी इंजिनमध्ये बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित
मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड
कल्याण ते कसारा मार्ग विस्कळीत
14:42 January 31
एमपीएससीच्या अभ्यासक्रमासंदर्भात मंत्रिमंडळ समिती थोड्यावेळात निर्णय जाहीर करणार
दोन वर्षांनंतर MPSC चे नवीन नियम लागू होणार
मंत्रिमंडळ सदस्यांची विनंती उपमुख्यमंत्री यांना
2025 पासून नियम लागू करा
मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आंदोलनाची माहिती
इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली
14:06 January 31
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
13:50 January 31
जीडीपी वाढीचा अंदाज 6-6.8 टक्के, आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा अंदाज
आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आला. अहवालात चालू आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6-6.8 टक्के वर्तविण्यात आला आहे.
13:44 January 31
धक्कादायक! प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याच्या हातावर कोयताने वार
पुण्यातील नुमवि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर भर दिवसा कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी हा जखमी झाला आहे. विद्यार्थ्याच्या हातावर कोयताने वार करण्यात आले आहे. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाने या शाळकरी मुलावर हल्ला केला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
13:37 January 31
वाद पेटला! ठाकरे गटातील शिवसैनिकांचा म्हाडा कार्यालयाबाहेर राडा
माजी मंत्री अनिल परब यांच्या कार्यालयावर कारवाई करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक संतप्त झाले आहेत. शिवसैनिक थेट म्हाडामध्ये घुसले आहेत. म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
13:00 January 31
कोकणवासीयांना होळीपूर्वी चांगले रस्ते मिळण्याची शक्यता, कारण...
होळी पूर्वी कोकणात जाणाऱ्या 84 किलो मीटरचे रस्ते पूर्ण करणार असल्याची माहिती एनएचएआयने मुंबई उच्च न्यायालयात दिली. त्यामुळे कोकणवासीयांना होळी पूर्वी चांगले रस्ते मिळण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा महामार्गाचा मागील बारा वर्षांपासून चौपदीकरण आणि महामार्गावरील खड्डे भरण्याच्या काम रखडलेला आहे. मुळ कोकणातील वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे
12:15 January 31
विलेपार्ले स्थानकावर एकाची लोकल ट्रेनखाली आत्महत्या
मुंबई - विलेपार्ले स्थानकावर एका व्यक्तीने लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. मृतदेह बाजूला करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
12:11 January 31
राजन विचारे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि खासदारांची सुरक्षा काढल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. दोन आठवड्यात उत्तर सादर करा, असे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ता यांचे वकील नितीन सातपुते यांना याचिकेत सुधार करून पुन्हा याचिका दाखल करण्याचे निर्देश
न्यायमूर्ती ए. एस. गडकरी आणि न्यायमूर्ती पी.डी.नाईक यांचे राज्य सरकारला निर्देश
12:02 January 31
येऊन दाखवा, अनिल परब यांचे सोमैय्या यांना आव्हान..पोलिसांनी सोमैय्या यांना रोखले
किरीट सोमैय्या हे अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाई पाहणी करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना अडविले. त्यामुळे अनिल परब आणि सोमैय्या यांच्यातील वाद टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे.
11:48 January 31
कार्यालय अनधिकृत असल्याच्या बातम्या खोट्या-अनिल परब
कार्यालय अनधिकृत असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे माजी मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राणेंच्या अनधिकृत बांधकामाची सोमैय्या पाहणी करणार का? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
11:16 January 31
जगाला हेवा वाटेल, अशी भारताची वाटचाल सुरू-राष्ट्रपती
भारतात वेगवान आणि निडरपणे काम करणारे सरकार आहे. जगाला हेवा वाटेल, अशी भारताची वाटचाल सुरू असल्याचे राष्ट्रपतींनी अभिभाषणात म्हटले आहे.
10:19 January 31
मिठाई देण्याच्या बहाण्याने दादरमध्ये घरफोडी
मुंबईतील दादर पश्चिम भागात बंदुकीच्या धाकावर गुन्हेगारांनी घरफोडी केली. मिठाई देण्याच्या बहाण्याने ते घरात घुसले. एक आरोपी अटक, दुसरा फरार. फरार व्यक्तीचा शोध सुरू आहे. आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदविल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
09:36 January 31
आधीच कोयता गँगची दहशत, आणखी त्यात ही पडली भर
येरवाड्याच्या बालसुधार गृहातून मध्यरात्री कोयता टोळीतील ७ खतरनाक विधी संघर्ष बालक सुधारगृह तोडून पळाले. त्यामुळे कोयता गँगची दहशत असताना पुणेकरांची चिंता वाढली आहे.
09:23 January 31
सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीला अटक
मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीला अटक, तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
09:13 January 31
मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला राहणार गैरहजर, कारण..
खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून उड्डाणांना उशीर झाला आहे. त्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर अनेक काँग्रेस खासदार आज सकाळी 11 वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दिली आहे.
09:12 January 31
एनएसए अजित डोवाल अमेरिकेच्या दौऱ्यावर, विविध मुद्द्यांवर करणार चर्चा
यूएस वाणिज्य सचिव जीना रायमोंडो आणि एनएसए अजित डोवाल आणि जेक सुलिव्हन यांनी उद्योग, शैक्षणिक आणि विचारवंत नेत्यांची भेट घेतली. भारत-अमेरिका विश्वसनीय भागीदार इकोसिस्टम तयार करण्यावर तपशीलवार चर्चा होत असल्याचे अमेरिकेतील भारतीय दूतावासाने म्हटले आहे.
08:42 January 31
अबुधाबी ते मुंबई फ्लाइटमध्ये महिलेचा विमानात गोंधळ, अटक केल्यानंतर न्यायालयाकडून मिळाला जामिन
विस्तारा अबुधाबी ते मुंबई फ्लाइटमध्ये इटालियन महिला पाओला पेरुसिओने गैरवर्तन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. काल विमान उतरल्यानंतर सहारा पोलिसांनी तिला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयाने जामिन दिला होता. इकॉनॉमी तिकीट असूनही तिने बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला, क्रूवर हल्ला केला, काही कपडे काढले आणि अर्धवट नग्न अवस्थेत वर-खाली जाण्याचा आग्रह धरला. विस्ताराचे प्रवक्ते म्हणाले, की एसओपीनुसार या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
08:27 January 31
कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला.
07:28 January 31
माजी मंत्री आदित्य ठाकरे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा दौरा करणार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे 1 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील इतर दोन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
07:26 January 31
आदिवासींच्या जमिनीच्या बेकायदेशीर' खरेदीप्रकरणी एनसीएसटीचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना समन्स
आदिवासींच्या जमिनी एका खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. एनसीएसटीने जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रांसह 3 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी वैधानिक संस्थेने मागितलेला कृती अहवाल सादर करण्यात अपयशी ठरले आहेत.
07:24 January 31
राज्यातील रेल्वे प्रकल्पांचा 50 टक्के खर्च राज्य सरकार उचलणार
राज्यातील रेल्वे प्रकल्पांना 50 टक्के वाटा न देण्याचा मागील सरकारचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी खासदारांना विविध प्रलंबित प्रकल्प केंद्राकडे पाठपुरावा करण्यास सांगितले आहे.
07:24 January 31
कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९१.०२ टक्के मतदान
कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक ९१.०२ टक्के मतदान झाले, तर नाशिक विभागातील पदवीधर मतदारसंघात सर्वात कमी ४९.२८ टक्के मतदान झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत मतदान झाले.
07:20 January 31
मुंबईत वृद्ध महिलेच्या घरी दरोडा, १२ लाखांची चोरी
अज्ञात व्यक्तीने एका ७२ वर्षीय महिलेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सोमवारी संध्याकाळी मध्य मुंबईतील तिच्या घरातून १२ लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोकड लुटून नेली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दादर (पश्चिम) येथील कीर्ती महाविद्यालयाजवळील एका निवासी इमारतीत ही घटना घडली आहे.
07:06 January 31
फ्लोरिडामध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी
फ्लोरिडामध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात नऊ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील गोळीबाराचे सत्र संपत नसल्याचे दिसत आहे.
07:05 January 31
भारतात लॉजिस्टिक खर्च १३ टक्के, हा खर्च कमी होऊ शकतो- निरंजन हिरानंदानी
भारतात लॉजिस्टिक खर्च १३ टक्के आहे. येत्या २-३ वर्षांत देशातील प्रत्येक वस्तूसाठी लॉजिस्टिक खर्च ३-४ टक्क्यांनी कमी करू शकतो, असे हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले.
07:04 January 31
सरकारने गृहकर्जाचे दर कमी करावेत-अशोक छाजेर
सरकारने गृहकर्जाचे दर कमी करावेत. 45 लाखांपर्यंत मर्यादेत असलेल्या परवडणाऱ्या घरांचा विभाग 60-75 लाख रुपयांमध्ये बदलला पाहिजे, अशी अपेक्षा अरिहंत इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडचे सीएमडी अशोक छाजेर यांनी व्यक्त केली.
07:03 January 31
मशिदीतील आत्मघातकी स्फोटातील मृतांची संख्या 59 वर पोहोचली
पेशावर मशिदीतील आत्मघातकी स्फोटातील मृतांची संख्या 59 वर पोहोचली आहे. किमान 157 जखमी झाले आहेत.
07:03 January 31
पंतप्रधान मोदी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे करणार उद्घाटन
12 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या सोहना-दौसा मार्गाचे उद्घाटन करणार आहेत.
06:30 January 31
Maharashtra Breaking News : भररस्त्यात तरुणाची चाकू भोसकून हत्या, पाच तासातच आरोपी गजाआड
मुंबई : मिरारोड परिसरातील जांगिड सर्कल येथे भररस्त्यात एका तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर गुन्हे शाखा एकच्या पथकाने पाच तासातच संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेने मिरा रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी पाहणी केली. किरकोळ वादातून हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे.