ETV Bharat / state

Breaking News : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मागितली मुंबई पोलिसांकडे सुरक्षा - Balasaheb Thackeray birth Annniversary

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra breaking News
author img

By

Published : Jan 23, 2023, 6:49 AM IST

Updated : Jan 23, 2023, 9:35 PM IST

21:34 January 23

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मागितली मुंबई पोलिसांकडे सुरक्षा

'गांधी गोडसे - एक युद्ध' या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मुंबईतील विशेष सीपी देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांच्या आणि त्यांच्या टीमने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर मुंबईतील आंदोलकांच्या गटाने अडवणूक केल्यानंतर स्वत:साठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिरिक्त सुरक्षेची मागणी केली आहे.

19:57 January 23

डुप्लिकेट वाघ आणि मांजर यांना आपण घाबरत नाही - नारायण राणे

मुंबई - विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांनी बाळासाहेबांची महती सांगताना त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री झाल्याचे सांगितले. त्याचवेळी डुप्लिकेट वाघ आणि मांजर यांना आपण घाबरत नाही असा टोलाही नाव न घेता त्यांनी ठाकरेंना लगावला.

19:17 January 23

ठाणे जिल्ह्यातील शीळ गाव परिसरातील तलावात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

ठाणे - जिल्ह्यातील शीळ गाव परिसरातील तलावात आज ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गुन्हा दाखल असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

18:57 January 23

विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण

मुंबई - विधान भवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान परिषद उपसभापती, माजी विधानसभा उपाध्यक्ष देखील मंचावर हजर होते.

18:46 January 23

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम दिलासा; उद्या पुन्हा सुनावणी

मुंबई - अभिनेत्री राखी सावंत यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. आज झालेल्या सुनावणी दरम्यान सुनावणी पूर्ण होईपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. या अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. राखीवर शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या आठवड्यात आंबोली पोलिसांनी राखीची चौकशी केली होती.

18:11 January 23

राखी सावंतला उद्यापर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा

मुंबई - अभिनेत्री राखी सावंतला उद्यापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा अटकेपासून अंतरिम दिलासा मिळाला आहे. राखीने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. एका प्रसिद्ध मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार राखीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात याप्रकरणी राखीची आंबोली पोलीस ठाण्यात अनेक तास चौकशी झाली होती.

18:05 January 23

उद्धव ठाकरेंसोबत कुणी उरलंय का? नारायण राणेंचा चिमटा

उद्धव ठाकरेंसोबत कुणी उरलंय का? 56 आमदार होते, आता 12ही उरले नाहीत, त्यांच्याकडे काय उरले आहे, त्यांचा एकही कार्यकर्ता जमिनीवर उरला आहे का? अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर दिली आहे.

16:32 January 23

शिझान खानच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी

मुंबई - अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी टीव्ही कलाकार शिझान खानने मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. शिझान खान याची जामीन याचिका वसई सत्र न्यायालयाने फेटाळली होती. जामीन अर्जावर लवकरच सुनावणीची शक्यता आहे. आरोपी शिझान खानने आपल्या विरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज यावर सुनावणी होणार आहे.

15:52 January 23

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याचा तयारीत

मुंबई - राज्यपाल पदावरून मुक्त करा अशी विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. राज्यपाल राजीनामा देण्याचा तयारीत असल्याचे वृत्त आहे. उर्वरित काळात चिंतन, अध्ययन करायचे आहे असे त्यांनी पंतप्रधानांना कळवले आहे. महाराष्ट्रासारखी ऐतिहासिक भूमी संतांचा आणि महापुरुषांचा वारसा असलेल्या भूमीचे मला राज्यपालपद भूषवायला मिळाले. याबद्दल समाधान आणि आनंद आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेचा आभारी आहे अशा पद्धतीच्या भावना राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.

15:34 January 23

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप नाही

केंद्रीय अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

15:31 January 23

शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून

ठाणे - भिवंडी तालुक्यातील काटई गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय चिमुरडीवर मोबाईल दाखवण्याच्या बाहण्याने घरात घेऊन बळजबरीने अत्याचार केला आहे. अत्याचार करून नराधमाने पीडित मुलीचा गळा दाबून खूनही केला. निजामपूर पोलीस ठाण्यात अत्याचारासह खुनाचा गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे.

15:26 January 23

हिंमत असेल तर निवडणुका घ्या; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटासह भाजपला आव्हान

आरएसएस प्रमुख मोहन भागवत मशिदीत गेले, त्यांनी हिंदुत्व सोडले का? भाजपने पीडीपीसोबत युती केली तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडले का? ते जे काही करतात ते योग्य आहे आणि आम्ही काही करतो तेव्हा हिंदुत्व सोडतो, ते योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी युतीनंतर दिली.

आतापर्यंत निवडणुकीची घोषणा झालेली नाही. मला देशद्रोह्यांना (शिंदे गट) निवडणूक घेण्याचे आव्हान द्यायचे आहे... त्यांच्यात (शिवसेना शिंदे गट आणि भाजप) हिम्मत असेल तर त्यांनी निवडणूक जाहीर करावी, असेही माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

15:11 January 23

उस्मानाबादेत सकल मराठा समाजाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यक्रमाला विरोध

सदावर्ते गो बॅक, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आज एड गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यक्रमाला सकल मराठा समाजाने विरोध दर्शवला आहे,मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावे यासाठी उस्मानाबाद येथे संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून सदावर्ते येणार आहेत. मराठवाडा मुक्ती मोर्चा उस्मानाबाद शाखेकडून संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात आज दुपारी ४ वाजता अँड गुणरत्न सदावर्ते हे प्रमुख वक्ते आहेत.या अगोदर शिवसेनेने या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता.

14:54 January 23

अभिनेत्री राखी सावंतची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव

मुंबई - अभिनेत्री राखी सावंतची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव. मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला राखीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शर्लिन चोप्राच्या तक्रारीवरून आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी राखी सावंतची पोलीस ठाण्यात बसवून चौकशी केली होती.

14:16 January 23

पदवीधर निवडणुकीतील उमेदवारावर अज्ञाताने केला हल्ला

अमरावती: अमरावती पदवीधर निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असून यामध्ये अपक्ष असलेले उमेदवार विकेश गोकुल गवाले सोमवारी प्रचारार्थ मोर्शी येथे जातांना माहुली जहागीर नजीक त्यांना काही अज्ञात इसमांनी पाठींबा देण्यासाठी वाद घालून त्यांच्यावर अचानक हल्ला केला आहे.

13:39 January 23

पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक, थेटर बाहेरील पोस्टर काढण्यात आले

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू आहे. पुण्यात देखील त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक झाले आहे. पुण्यातील राहुल चित्रपटाबाहेर पठाण चित्रपटाचा पोस्टर्स लावण्यात आला होता. हे पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे.

13:23 January 23

महाराष्ट्रात सध्या वैचारिक प्रदूषण, लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र-उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात सध्या वैचारिक प्रदूषण आहे. लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. सध्या राजकारणात वाईट परंपरा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

13:23 January 23

एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचा अंत होईल-प्रकाश आंबेडकर

काही सेक्टर्स जनतेच्या हातात द्यायला हवेत. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे. देशातल भांडवलशाहीचे राज्य आहे. एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचा अंत होईल. उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेचे सामाजिकरण व्हावे. ईडीद्वारे नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात आहे. शरद पवार आमचे जुने भांडण आहे, तेही आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा असल्याचे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

13:15 January 23

21 सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्रांची नावे, बॉलीवूड अभिनेत्यांनी निर्णयाचे केले स्वागत

अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 सर्वात मोठ्या बेटांना परमवीर चक्रांची नावे देण्यात आली आहेत. चित्रपटांमध्ये परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनी पंतप्रधानांचे निर्णयाचे स्वागत केले आहे.

13:13 January 23

उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे. सध्या राजकारणात वाईट परंपरा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

13:08 January 23

शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख कोर्टात हजर

शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोर्टात हजेरी लावण्यासाठी हजर झाले आहेत. मात्र जामीनावर बाहेर असलेले आणि या प्रकरणातील अनुपस्थित आरोपींना पुढील तारखेला हजर न राहिल्यास वॉरंट जारी करणार असल्याची कोर्टाने ताकीद दिली आहे. आज कोर्टात अनिल देशमुख व त्यांचे पुत्र न्यायालयात हजर झाले आहेत. पुढील तारीख 6 फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे.

13:06 January 23

योगी आदित्यनाथ हे लोकांच्या हत्येबद्दल उघडपणे बोलून द्वेष पसरवित आहेत-दिग्विजय सिंह

राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण ऐकावे. लोकांच्या हत्येबद्दल उघडपणे बोलून ते द्वेष पसरवित आहेत असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केली.

12:56 January 23

तुमचा दाभोलकर करू, बागेश्वर बाबांच्या अनुयायांकडून श्याम मानव यांना धमकी

बागेश्वर बाबा शास्त्री यांना आव्हान दिल्यानंतर श्याम मानव यांना धमकी मिळाल्याचे समोर येत आहे. त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

12:46 January 23

अनिल देशमुख यांची कोर्टात हजेरी

मुंबई - शंभर कोटी कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख कोर्टात हजेरी लावण्यासाठी आले आहेत. मात्र जामीनावर बाहेर असलेले आणि या प्रकरणातील अनुपस्थित आरोपींना पुढील तारखेला हजर न राहिल्यास वॉरंट जारी करणार असल्याची ताकीद कोर्टाने दिली आहे. आज कोर्टात अनिल देशमुखांसह देशमुख यांचे दोन्हीही पुत्र हजर होते. पुढील सुनावणी 6 फेब्रुवारीला होईल.

12:25 January 23

वरळीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत

मुंबई - वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले.

11:56 January 23

शाळेच्या मुख्यध्यापकानेच केला विद्यार्थीनीचा विनयभंग

मुंबई - नागपाडा परिसरातील एका शाळेच्या मुख्यध्यापकाने विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत. याबाबत रितसर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

11:44 January 23

अंदमान आणि निकोबार बेटांमधील 21 सर्वात मोठ्या बेटांना मिळाली नावे

नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार बेटांमधील 21 सर्वात मोठ्या नाव नसलेल्या बेटांना नावे दिली. वीर जवानांच्या नावाने आता ही बेटे ओळखली जातील.

11:18 January 23

बाळासाहेबांमुळेच मी आज मुख्यमंत्रीपदावर-एकनाथ शिंदे

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करणार आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे हे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

10:10 January 23

आमच्या ह्रदयावर कोरलेले बाळासाहेबांचे चित्र अमर-संजय राऊत

आमच्या ह्रदयावर कोरलेले बाळासाहेबांचे चित्र अमर आहे. बाळासाहेबांनी आम्हाला घडविले व ओळख दिल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

09:57 January 23

मंदिर उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू

अरक्कोनममधील कीलवेठी येथे मंदिर उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान क्रेन कोसळल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आणि 9 जण जखमी झाले. क्रेन वापरण्याची परवानगी नव्हती. क्रेन ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे. तपास सुरू असल्याचे राणीपेटचे जिल्हाधिकारी भास्कर पांडियन यांनी सांगितले.

09:48 January 23

पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त केले अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले होते, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

09:41 January 23

प्रकल्प 75 कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी लवकरच होणार कार्यान्वित

प्रकल्प 75 कलवरी वर्गाची पाचवी पाणबुडी, वगीर लवकरच भारतीय नौदलात नौदल डॉकयार्ड मुंबई येथे अॅडमिरल आर हरी कुमार सीएनएस यांच्या उपस्थितीत कार्यान्वित होणार आहे.

09:28 January 23

केरळमध्ये गरिबीचे प्रमाण फक्त ०.७ टक्के

केरळमध्ये गरिबीचे प्रमाण फक्त ०.७ टक्के आहे. हे गरिबीचे देशातील सर्वात कमी प्रमाण असल्याचे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.

07:50 January 23

लॉरीवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात ५ तरुण ठार

अलाप्पुझा जिल्ह्यातील अंबालपुझाजवळ तिरुअनंतपुरमकडे जाणाऱ्या लॉरीवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात ५ तरुण ठार झाले. त्यातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 1चा रुग्णालयात मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा घडली घटना घडल्याचे अंबालापुढा पोलिसांनी सांगितले.

07:49 January 23

कोची विमानतळावर प्रवाशाकडून 85 लाख रुपये किमतीचे सोने जप्त

सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिटने काल कोची विमानतळावर एका प्रवाशाकडून 85 लाख रुपये किमतीचे 1978.89 ग्रॅम सोने जप्त केले. अब्दुल असे या प्रवाशाचे नाव असून तो मूळ मलप्पुरमचा रहिवासी आहे.

06:57 January 23

बिहारमध्ये मद्यसेवनामुळे 2 जणांचा मृत्यू

सिवानच्या लकारी नबीगंजमध्ये मद्यसेवनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12

06:56 January 23

वाशिम जिल्ह्यात एका विद्यार्थ्यासाठी चालविली जाते शाळा

वाशिम जिल्ह्यातील गणेशपूर गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालविले जाते. गावाची लोकसंख्या 150 आहे. गेल्या 2 वर्षांपासून शाळेत फक्त एकच विद्यार्थी दाखल आहे. शाळेत मी एकमेव शिक्षक आहे, असल्याचे किशोर मानकर यांनी सांगितले. विद्यार्थ्याला माध्यान्ह भोजनासह शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

06:55 January 23

ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

फतेहपूर-सालासर मार्गावर ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 5 जणांचा मृत्यू झाला. मृत हरियाणाचे रहिवासी आहेत, ओळख पटविली जात असल्याचे फतेहपूरचे डेप्युटी एसपी राजेश कुमार विद्यार्थी यांनी सांगितले.

06:55 January 23

पेट फेड - इंटरनॅशनल पेट फेस्टिव्हलचा समारोप

दोन दिवसीय 'पेट फेड - इंटरनॅशनल पेट फेस्टिव्हल'चा काल मुंबईत समारोप झाला. कोविड महामारीमुळे 3 वर्षांच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

06:38 January 23

Breaking News : Breaking News : बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, भीमशक्ती, शिवशक्ती आज एकत्रित येण्याची शक्यता

मुंबई : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पेटून उठत हिदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रोखठोक विधानांमुळे ते नेहमीच चर्चेत रहायचे. आज त्यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. वंचित महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आज एकत्रित येण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Jan 23, 2023, 9:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.