नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने गोव्यातील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यास मंजुरी दिली. माजी संरक्षण मंत्री आणि चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या पर्रिकर यांना आदरांजली वाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Breaking News : गोव्यातील ग्रीनफिल्ड विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव - Etv Bharat breaking news
19:58 January 04
गोव्यातील ग्रीनफिल्ड विमानतळाला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
19:44 January 04
महिला डॉक्टरांचा लैंगिक छळ धमकी प्रकरणी डॉक्टरला अटक
मुंबई - महिला डॉक्टरांचा लैंगिक छळ आणि धमकी दिल्याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी डॉक्टर सुशांत कदम याला अटक केली आहे. त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कलम 354A (3),500,504,506,509 IPC आणि IT कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
18:53 January 04
फडणवीस आणि सामंत 14 ते 20 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर
मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत 14 ते 20 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर जाणार आहेत.
18:50 January 04
सायरस मिस्त्री कार अपघातप्रकरणी पालघर न्यायालयात आरोपपत्र दाखल
पालघर - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि सहप्रवासी यांचा मृत्यू झाल्याच्या चार महिन्यांनंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सूर्या नदीवरील पुलावर 4 सप्टेंबर रोजी मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांची आलिशान कार दुभाजकाला धडकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात चालक अनाहिता पांडोळे आणि दारियस पांडोळे हे गंभीर जखमी झाले आहेत.
18:36 January 04
लोणावळ्यात मित्राच्या वाढदिवसाची दारू पार्टी जीवावर बेतली, स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
लोणावळा - लोणावळ्यात मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज पाम ग्रूव्ह बंग्लो येथे घडली आहे. निखिल संपत निकम वय २२ असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो दारू प्यायला होता असे पोलिसांनी सांगितले आहे. हिंजवडीतील नामांकित आयटी कंपनीत तो कामाला होता. लोणावळा शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
18:10 January 04
आरपीआयच्या कवाडे गटाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाशी हातमिळवणी
मुंबई - शिवसेनेच्या सत्ताधारी एकनाथ शिंदे गट आणि जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी बुधवारी महाराष्ट्रातील नागरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी युतीची घोषणा केली. गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडून उद्धव ठाकरे सरकार पाडल्यानंतर आपला पाया मजबूत करू पाहणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला युतीमुळे दलितांची मते मिळू शकतात असे बोलले जात आहे.
17:28 January 04
ऋषभ पंत उपचारासाठी मुंबईत एचएन रुग्णालयात दाखल
मुंबई - भीषण रस्ते अपघातात जखमी झालेला भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला डेहराडूनहून मुंबईतील एचएन रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. एच एन रुग्णालयाच्या डॉक्टरांसोबत बीसीसीआयच्या रुग्णालयाचे डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार होणार असल्याचे समजते.
17:18 January 04
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त 18 कंपन्या जम्मू-काश्मीरमध्ये पाठवणार
जम्मू - राजौरी जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये नागरिकांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दल अतिरिक्त 18 कंपन्या अर्थात 1800 पोलीस जम्मू आणि काश्मीरमध्ये पाठवणार आहेत. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात हे कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
17:00 January 04
अनिल परब यांची 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई - शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते अनिल परब आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. अनिल परब यांच्या विरोधात पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला आहे. अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्याबरोबर संगनमताने जमिन अकृषिकमध्ये रुपांतरित करण्यासाठी स्थानिक एसडीओ कार्यालयाकडून बेकायदेशीर परवानगी घेतली. तसेच सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधल्याचे पीएमएलएच्या तपासातून समोर आले आहे, असे ईडीने स्पष्ट केले.
16:54 January 04
सोनिया गांधी गंगाराम रुग्णालयात दाखल
नवी दिल्ली - यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शनची तपासणी आणि उपचारांसाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे, असे डॉ अजय स्वरूप यांनी सांगितले.
16:15 January 04
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई - राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचा संप हा जनतेच्या हितासाठी होता. मात्र उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री यांच्याबरोबर आज सकारात्मक चर्चा झाली. खासगीकरण करणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. ती आपल्याला पटल्याचे वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. वयोमर्यादा वाढवून भरती करणार अशीही भूमिका त्यांनी मांडली. संप मागे घेण्याचा त्यामुळे निर्णय घेत आहे, असे प्रतिनिधींनी सांगितले.
16:04 January 04
राज्य सरकारला वीज मंडळांचे खासगीकरण करायचे नाही - देवेंद्र फडणवीस
मुंबई - राज्य सरकारला वीज मंडळांचे खासगीकरण करायचे नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या 32 संघटनांच्या प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
15:25 January 04
सुरेंद्र गडलिंग यांची जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव
मुंबई - भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी सुरेंद्र गडलिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने डिफॉल्ट जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. गडलिंग यांचा एनआयए कोर्टाने डिफॉल्ट जामीन फेटाळला होता. गडलिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
15:21 January 04
आपचे गोपाल इटालिया महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्त
नव दिल्ली - आम आदमी पक्षाने गोपाल इटालिया यांना महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
15:15 January 04
संपाचा फटका ग्रामीण भागाला, १५० गावांचा विद्युत पुरवठा बंद
उस्मानाबाद - जिल्ह्यातील दीड हजार वीज कर्मचारी तर राज्यातील एक लाख 28 हजार कायम आणि कंत्राटी कर्मचारी आजपासून ७२ तासाच्या संपावर गेले आहेत. वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ नये या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. संपाचा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. यामुळे १५० गावांचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे तर १० उपकेंद्र बंद आहेत.
15:09 January 04
महावितरण कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा महिला रुग्णालयाची यंत्रणा जनरेटरवर सुरू
जालना - मध्यरात्रीपासून महावितरण कर्मचारी संपावर गेलेत. याचा परिणाम आता सरकारी रुग्णालयावर देखील होत आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात वीज गुल झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महावितरण कर्मचारी संपावर गेल्याने जिल्हा महिला रुग्णालयाची यंत्रणा जनरेटरवर सुरू आहे.
15:07 January 04
डीएनए अहवालानुसार श्रद्धा वालकरचे केस आणि हाडांचे नमुने जुळले
नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणात माइटोकॉन्ड्रिअल डीएनए अहवालानुसार श्रद्धा वालकरचे केस आणि हाडांचे नमुने जुळल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांना केंद्राकडून डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डायग्नोस्टिक्सचा अहवाल मिळाला आहे. विशेष सीपी सागर प्रीत हुडा यांनी ही माहिती दिली.
14:35 January 04
जिंदाल कंपनीच्या आगीत आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडला
नाशिक - जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीत आणखी एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता 3 दिवसानंतर आणखी एका पुरुष कामगाराचा मृतदेह सापडला आहे. बचावकार्य सुरू असताना बेपत्ता असलेल्या सुधीर मिश्रा नामक कामगाराचा मृतदेह आज सकाळी सापडला आहे. आग पूर्णपणे विझली असली तरी धुराचे लोट अजूनही कायम असल्याने उशिरा मृतदेह सापडला आहे. जिल्हा पोलीस प्रशासन मदत करत नसल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप आहे. अजूनही काही मृतदेह आढळून येण्याची शक्यता आहे.
13:57 January 04
संभाजी महाराजांचा अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही - अजित पवार
मुंबई - संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रुपये तसेच महाराजांच्या स्मृतिप्रित्यर्थ इतर उपक्रम राबवण्याची घोषणा मागील वर्षी मार्चमध्ये अर्थसंकल्पात पहिल्याच पानावर केली होती. याची आठवण अजित पवारांनी करुन दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनादर करण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
13:51 January 04
भिवंडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारा अल्पवयीन विद्यार्थी हिंदू
ठाणे - भिवंडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारा अल्पवयीन विद्यार्थी हिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 19 आंदोलकांवर गुन्हे दाखल करून प्रत्येकी दहा हजाराचा दंड आकारण्यात आला. तसेच वर्षभर शांतता राखण्याच्या अटीवर पोलिसांनी त्यांची जामीनवर सुटका केली.
12:50 January 04
वाईमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्मारक उभारणार
मुंबई - वाई येथे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी याची घोषणा केली आहे. मुंबईत संमेलनात त्यांनी ही घोषणा केली.
12:43 January 04
साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांऐवजी दोन कोटी रुपये द्या - केसरकर
मुंबई - साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख रुपयांऐवजी दोन कोटी रुपये राज्य शासनातर्फे देण्यात यावे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे ही मागणी केली आहे.
12:40 January 04
पालघरमध्ये जुगार खेळणाऱ्या 3 जणांना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
पालघर - जिल्ह्यातील एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी तीन जणांना जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
11:50 January 04
दिगंबर जैन समाजातील लोकांची मुंबईत निदर्शने
मुंबई - झारखंड सरकारच्या 'पवित्र' श्री समेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजातील लोकांनी मुंबईत निदर्शने केली.
11:45 January 04
क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईत हलवणार
डेहराडून - क्रिकेटपटू ऋषभ पंतला पुढील उपचारांसाठी आज मुंबईत हलवणार आहेत. ऋषभला 30 डिसेंबर रोजी झालेल्या कार अपघातानंतर डेहराडूनमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते.
11:26 January 04
नागपूरच्या कोराडी आणि खापरखेडामधून दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत सुरु राहील
सरकारने विद्युत विभागाचा खासगीकरणाचा डाव रचला असून सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि निर्णय मागे घ्यावा अन्यथा आमचे आंदोलन अश्याच पद्धतीने सुरू राहील. सरकार मेस्मा लावण्याची भाषा करत असल तरी आम्ही देखील आमच्या मागण्यासाठी ठाम असल्याचं मत कर्मचारी व्यक्त करत आहे. नागपूरच्या कोराडी आणि खापरखेडामधून दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत सुरु राहू शकेल अशी स्थिती आहे. त्यानंतर मात्र वीज निर्मिती खंडित झाल्यास नागपूरसह राज्यातील अनेक भागांना याचा फटका बसेल.
11:06 January 04
आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात, अफवा न पसरविण्याचे आवाहन
बीड : माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाहनाला मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला आहे. सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप आहेत. आमदार धनंजय मुंडे हे मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटपून परळीकडे परतत असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परळी शहरात शहरात त्यांच्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला. त्यात त्यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी घेण्याचे काही कारण नाही व अफवा पसरवू नका असे आव्हान माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.
10:48 January 04
तोतया सीबीआय अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दीपकने सीबीआयचे बनावट ओळखपत्र दाखवून घाटकोपरच्या हॉटेल्समध्ये झडती घेतली होती.
10:05 January 04
आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाही, संजय राऊत यांची दीपक केसरकरांवर टीका
प्रकाश आंबेडकरांबरोबर युतीची चर्चा सुरू आहे. चर्चेची माहिती महाविकास आघाडीला आहे. प्रकाश आंबेडकरांचे कालचे भाष्य सकारात्मक आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती येणे एकत्र येणे गरजेचे आहे. आम्ही तुमच्यासारखे लफंगे नाही. तुम्ही न्यायालय नाही. त्यांनीही २०२४ ला तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी.
09:31 January 04
जैन समाजाच्या सदस्यांची मुंबईत निदर्शने
झारखंड सरकारच्या पवित्र श्री समेद शिखरजीला पर्यटन स्थळ घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात जैन समाजाच्या सदस्यांनी मुंबईत निदर्शने केली.
09:22 January 04
कोयनेच्या वीजनिर्मितीला कर्मचारी संपाचा फटका, ३६ मेगावॅटची दोन युनिट बंद
सातारा - राज्यातील वीज कर्मचारी संपाचा कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका बसला आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोयना प्रकल्पातील ३६ मेगावॅटची दोन युनिट बंद आहेत. कोयना धरणाच्या पायथा वीज प्रकल्पातील ३५ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. पोफळी वीजनिर्मिती प्रकल्पातीलही कर्मचारी संपामुळे कामावर आलेले नाहीत. कर्मचारी संपामुळे कोयना प्रकल्पातील वीजनिर्मितीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोयना प्रकल्पातील पायथा वीजगृह पुर्णपणे बंद आहे तर तिसऱ्या टप्प्यातील एकच युनिट सुरू आहे. चौथा टप्पाही बंद असल्याने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर परिणाम झाला आहे. सध्या ९०० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू असून गरज पडल्यास आणखी २५० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल, अशी माहिती प्रकल्पाच्या सुत्रांनी दिली.
09:09 January 04
मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर विमानात केली लघुशंका
26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये एका मद्यधुंद पुरुष प्रवाशाने महिला सहप्रवाशावर लघुशंका केली. 26 नोव्हेंबर रोजी जेएफके (यूएस) वरून दिल्लीला उड्डाण जात असताना घडलेल्या घटनेबाबत एअर इंडियाने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
08:50 January 04
अजित पवार आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार
विरोधी पक्षनेते अजित पवार आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील विधानाबाबत स्पष्टीकरण करणार आहेत.
07:47 January 04
काँग्रेसची भारत जोडो बागपत जिल्ह्यातून पुन्हा सुरू
काँग्रेसची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील माविकला येथून पुन्हा सुरू झाली आहे.
07:34 January 04
महावितरण संपात देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी
सह्याद्री अतिथीगृहात आज दुपारी १ वाजता वीज कर्मचारी संघटनांची बैठक बोलाविण्यात आली आहे.
07:23 January 04
वीज कंपनीचे कर्मचारी संपावर गेल्यास होणार कारवाई, राज्य सरकारकडून इशारा
खासगीकरणाला विरोध (Mahavitaran Strike Against Privatization) करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. संपावर केल्यास मेस्मा कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा राज्य सरकारने इशारा दिला आहे.
06:57 January 04
भाजपच्या निलंबित नेत्याचे हॉटेल पोलिसांकडून उद्धवस्त
सागर येथील जगदीश यादव खून प्रकरणाचा जाहीर निषेध केल्यानंतर भाजपचे निलंबित नेते मिश्री चंद गुप्ता यांचे बेकायदेशीर हॉटेल पोलिसांनी उद्ध्वस्त केले. कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. फक्त इमारत पाडण्यात आली, असे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी सांगितले.
06:26 January 04
Breaking News : निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला, पण...
मुंबई : प्रश्न सोडवण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यात प्रश्न सुटले नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासन ( Mard doctors strike ) यांच्यात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे अशी माहिती पालिका मार्डचे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे ( Dr Pravin Dhage ) यांनी दिली.