औरंगाबाद - जर एखाद्या विवाहित महिलेला कुटुंबासाठी घरची कामे करण्यास सांगितले तर. त्यामुळे मोलकरणीसारखं काम करणं मानलं जाणार नाही आणि ते क्रौर्य मानलं जाणार नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतीच एका प्रकरणावर सुनावणी करताना स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश एस. पाटील यांच्या खंडपीठाने पती आणि सासरच्यांविरुद्ध आयपीसी कलम 498 अ अन्वये नोंदवलेली एफआयआर रद्द करण्यात आला आहे.
Breaking News Live : महिलेने घरकाम करणे म्हणजे मोलकरीण काम नव्हे, खंडपीठाने पतीला दिला दिलासा - Etv Bharat marathi news
21:16 October 27
महिलेने घरकाम करणे म्हणजे मोलकरीण काम नव्हे, खंडपीठाने पतीला दिला दिलासा
20:29 October 27
आता एअर बस प्रकल्प देखील राज्यातून गेला; आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
पुणे :- राज्यात वेदांत फॉक्सकॉन पाठोपाठ आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातला गेला आहे. यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आहे ते म्हणाले की आम्ही सातत्याने या घटनाबाह्य सरकारला सांगत होतो की एअर बस हा प्रकल्प राज्यातून निघून जाईल आणि आज धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. मला सत्ताधाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की राज्यात तरुण हुशार बेरोजगार नाही का ज्यांना रोजगार पाहिजे. देशभरातील जे तरुण कामाच्या निमित्ताने आशेवर येणार आहेl. त्यांचा काय होणार..हा चौथा प्रकल्प आहे जो राज्यातून निघून गेला आहे. याचा उत्तर कधीना कधी द्यावाच लागणार आहे अस यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल आहे.
19:42 October 27
मुंबईत आज ५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही
मुंबई - मुंबईत आज ५९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनाने शहरात एकही मृत्यू झाला नाही. गेल्या काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली होती. आज त्यात घट होऊन ६५० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
19:23 October 27
ऐन दिवाळीत जालन्यात होलसेल कापड दुकानांवर जीएसटीच्या धाडी
जालना - ऐन दिवाळीमध्ये होलसेल कपड्याच्या दुकानावर जीएसटी पथकाने धाड टाकल्याने व्यापारीवर्गामध्ये एकच खळबळ उडाली. जुना मोंढा परिसरात असलेल्या 5 ते 7 दुकानावर जीएसटी चे 25 ते 30 सदस्य असलेल्या पथकाने आज धाड टाकल्याची माहिती मिळाली. यामध्ये जुना मोंढा भागात असलेली रमेश हरीराम क्लाॕथ सेंटर, आकाश गारमेंट्स, बंजारा केंद्र आशा 5 ते 7 दुकानावर जीएसटी पथकाने धाड टाकली.
19:12 October 27
कांदिवलीत एसी बसला आग, प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले
मुंबई - कांदिवली पूर्वकडील क्रांतीनगरमधून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आग लागली. या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नाही. बस चालकाच्या कॅबिनमध्ये शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे. आगीची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशामन दलाच्या जवानांनी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविले. त्यांच्या मदतीला स्थानिक रहिवासीसुध्दा होते. आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने कांदिवलीत मोठा अनर्थ टळला.
18:54 October 27
कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाणची लक्ष्मी सॉ मिल आगीत जळून खाक
सातारा - कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मी सॉ मिलला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संपूर्ण मिल जळून खाक झाली. गुरूवारी पहाटे ही घटना घडली. या घटनेत ३५ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तीन अग्निशामक बंबांच्या साह्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग लागल्याचे निदर्शनास येताच मिलचे मालक मनन पटेल तसेच ३०-३५ तरुणांनी मिल परिसरातील पाण्याची बोअर सुरू करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले.
18:43 October 27
TDS विवरण दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली
नवी दिल्ली - केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसर्या तिमाहीसाठी फॉर्म 26Q मध्ये TDS विवरण दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. ही मुदत 31 ऑक्टोबर 2022 वरुन 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे.
18:33 October 27
सर्वच राज्यांमध्ये 2024 पर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणा कार्यालये - अमित शाह यांची घोषणा
देशातील सर्वच राज्यांमध्ये 2024 पर्यंतराष्ट्रीय तपास यंत्रणा कार्यालये असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
18:11 October 27
भारतीय यूट्यूबर्सची वार्षिक कमाई तब्बल 6800 कोटी रुपये, 7 लाख रोजगारनिर्मितीही झाली
नवी दिल्ली - भारतीय यूट्यूब क्रिएटर्सनी देशाच्या जीडीपीमध्ये तब्बल 6800 कोटी रुपयांची वार्षिक भर घातल्याची माहिती यूट्युबच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यू्टुबमुळेही भारताची अर्थव्यवस्था तेजीत आहे असेच त्यांनी म्हटले आहे. तसेच या प्रक्रियेत 7 लाख रोजगार निर्मिती झाल्याचीही त्यांनी माहिती दिली. यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी नील मोहन यांनी ही माहिती दिली.
17:34 October 27
अतिवृष्टीची पाहणी करायला आलेल्या अब्दुल सत्तार यांनी कलेक्टरला विचारले 'दारु पिता का'
बीड - कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य. अतिवृष्टीची पहाणी करायला आल्यानंतर चक्क दारूच्या गप्पा. थेट जिल्हाधिकाऱ्यांना विचारले दारु घेता का? जिल्हा अधिकाऱ्यांचे उत्तर कधी कधी थोडी घेतो. मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्याचा दुःखाचा विसर. अतिवृष्टीने होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्यांविरोधात बीडमध्ये संताप. व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल. व्हायरल क्लिपने शेतकऱ्यांमध्ये संताप.
17:15 October 27
पायाभोवती मेणाच्या स्वरूपात गुंडाळून आणले तब्बल 2.65 किलो सोने
मुंबई - विमानतळावरील कस्टम्सने काल दुबईहून आलेल्या 2 भारतीय महिला प्रवाशांना अडवले. तपासणी केल्यावर असे आढळून आले की दोघांनीही त्यांच्या पायाभोवती मेणाच्या स्वरूपात गुंडाळलेले 2.65 किलो 24Kt सोने आणले होते. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने ही माहिती दिली.
16:34 October 27
7 हजारांसाठी कामगारांचा ठेकेदारावर गोधडीत बांधून चाकू आणि रॉडने जीवघेणा हल्ला
नवी मुंबई - केवळ सात हजार रुपयांसाठी ठेकेदारावर रॉड आणि चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील पुष्पक नगरमध्ये घडली आहे. शिवाजी राठोड असे गंभीर जखमी सिविल कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे. त्यांच्यावर कामोठे येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राठोड यांची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.
15:59 October 27
भावाच्या घृणास्पद कृत्यामुळे पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे - चुलत बहिण झोपेत असताना अल्पवयीन भावाच्या घृणास्पद कृत्यामुळे पीडितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. कल्याण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे.
15:08 October 27
हवाई दलासाठी सी २९५ वाहतूक विमानाची निर्मिती टाटा एअरबस करणार
वडोदरा - येथे भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ वाहतूक विमानाची निर्मिती टाटा-एअरबसद्वारे केली जाणार असल्याचे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. 40 विमाने बनवण्याव्यतिरिक्त, गुजरातमधील वडोदरा येथे ही सुविधा हवाई दलाच्या गरजांसाठी आणि निर्यातीसाठी अतिरिक्त विमानांची निर्मिती करेल, असे संरक्षण सचिवांनी सांगितले.
14:56 October 27
वडे तळताना फक्त 28 वर्षाच्या कामगाराचा हार्टफेल झाल्याने मृत्यू
सोलापूर - माढा तालुक्यात वडे तळताना हॉटेल कामगाराचा मृत्यू झाला आहे. प्रकाश नानुराम कुमार वय 28 असे मृत्यू झालेल्या हॉटेल कामगाराचे नाव आहे. राजस्थानी हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
14:48 October 27
जालना ते छपरा रेल्वे सुरू, जालन्यातून दानवेंनी दाखवला हिरवा झेंडा
जालना - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते जालना ते छपरा या साप्ताहिक रेल्वेची सुरुवात करण्यात आली. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशातून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वेची दिवाळी भेट ठरली आहे. जालनाही औद्योगिक नगरी असल्याने, उत्तरप्रदेश, बिहारमधील अनेक कामगार कामसाठी जालन्यात येतात. त्यांना गावाकडे परत जाण्यासाठी जालना ते मनमाड व मनमाडवरून दुसऱ्या रेल्वेने जावे लागायचे. परंतु ही रेल्वे सुरू झाल्याने या लोकांची मोठी सोय झाली. आता जालन्याहून थेट प्रवास करता येणार आहे. उत्तरप्रदेश, बिहार येथून आलेल्या जालन्यात काम करणाऱ्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
14:39 October 27
आकासा एअरच्या विमानाला पक्षाची धडक, विमान सुरक्षितपणे उतरवले
अहमदाबाद - अहमदाबादहून दिल्लीला जाणार्या आकासा एअर फ्लाइट QP 1333 ला पक्ष्यांची धडक बसली. त्यानंतर विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले. त्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवण्यात आले. त्यानंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. दरम्यान प्रवाशांची दुसऱ्या विमानाने रवानगी करण्यात आली.
14:05 October 27
राणा आणि कडू यांच्यातील गैरसमज दूर होतील - बावनकुळे
नागपूर - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये काही गैरसमज निर्माण झाला आहे. फडणवीस आणि शिंदे बसवून हा वाद मिटवतील. दोन्ही सक्षम कार्यकर्ते आहेत. दोन्ही नेते प्रभावी आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वाद संपुष्टात येईल असा वश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
13:52 October 27
आचार्य अत्रे मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांच्या मंडळाला छटपूजेची परवानगी
मुंबई - मुंबई महानगरपालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांना छटपूजेच्या आयोजनाकरिता उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानावर छट पूजेसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव यांच्या मंडळाला परवानगी दिली. 30 ऑक्टोबरला दुर्गा परमेश्वरी सेवा मंडळ या संस्थेला मुंबई हायकोर्टाने छट पूजेसाठी परवानगी दिली.
13:44 October 27
मानवाधिकाराच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानला किती आहे काळजी?
मी पाकिस्तानला विचारू इच्छितो की त्याने अनधिकृतपणे आपल्या भागातील लोकांना किती अधिकार दिले आहेत? मानवाधिकाराच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानला या भागातील लोकांची किती काळजी आहे, हे सर्वांना माहीत आहे, अशी टीका केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे.
13:18 October 27
महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन, बीसीसीआयची घोषणा
बीसीसीआयने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान वेतन देण्याची बीसीसीआयने घोषणा केली आहे.
12:46 October 27
छटपूजेवरून राष्ट्रवादीला महापालिकेचा दणका
मुंबई - छटपूजेवरून राष्ट्रवादीला महापालिकेचा दणका. भाजपला छटपूजा करता देण्यात आले मैदान. उच्च न्यायालयात महापालिकेची माहिती. अटल सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेला परवानगी देण्यात आली आहे. आम्ही आवश्यक नियमांची पूर्तता केली आहे म्हणून आम्हाला मनपातर्फे मैदान देण्यात आले आहे, असा त्यांचा दावा. परवानगी प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपात तथ्य नसल्याचाही दावा केला. आज सुनावणी दरम्यान महापालिकेने सुट्टीकालीन खंडपीठांसमोर माहिती दिली.
12:38 October 27
शिंदे गटाचा शिवसेनेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवर ताबा
मुंबई - शिंदे गटाने शिवसेनेच्या डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळवला आहे. यासाठी दोन्ही गटात संघर्ष झाला. शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये वाद झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
12:29 October 27
नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो हवा - राम कदम
मुंबई - नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हवा, असे मत भाजप नेते राम कदम यांनी मांडले आहे. सध्या नोटांवर कुणाचा फोटो असावा यावरुन दिल्लीपासून गल्लीपर्यंत रान उठले आहे. केजरीवाल यांनी गणेश आणि लक्ष्मीचे फोटो नोटांवर छापा अशी सूचना मोदींना केली होती. त्यानंतर विविध मते मांडण्यात येत आहेत.
12:16 October 27
आदित्य ठाकरे पुणे व नाशिक जिल्हा दौऱ्यावर
मुंबई - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी युवासेना प्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे आज पुणे व नाशिक जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
12:14 October 27
अपहरण झालेले बाळ सापडले, अपहरणकर्त्याला अटक
मोहम्मद हनीफ शेख याला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. 2 महिन्यांच्या मुलीच्या अपहरणातील तो आरोपी आहे. या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी आणि मुलीला परत मिळवण्यासाठी 8 टीम तयार केल्या होत्या.
11:46 October 27
सेंट झेवियर्स शाळेजवळच्या रस्त्यावरून 2 महिन्यांच्या बाळाचे अपहरण
मुंबई - सेंट झेवियर्स शाळेजवळच्या रस्त्यावरून 2 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. तिच्या आईसोबत ही बाळ झोपली होती. कलम ३६३ (अपहरण) आयपीसी अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरू आहे.
11:42 October 27
अंबरनाथ कर्जत दरम्यानमध्ये रेल्वेला तांत्रिक अडचण
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतच्या दिशेने जाणारी एस 3 लोकल ही कर्जत ते अंबरनाथ दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अचानक सकाळी 7 वाजून 50 मिनीटांनी थांबवण्यात आली. त्यामुळे सर्व ट्रेन एक तास उशिराने धावत आहे. यामुळे इंद्रायणी एक्सप्रेसला देखील उशीर झाला मध्य रेल्वेच्या डीसाळ कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण कामावर जाण्यास उशीर झाला.
11:41 October 27
‘शौर्य दिवस’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री बडगाममध्ये..
भारतीय लष्कराने आयोजित केलेल्या ‘शौर्य दिवस’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बडगाममध्ये पोहोचले. या कार्यक्रमाला नायब राज्यपाल मनोज सिन्हा देखील उपस्थित होते
11:31 October 27
Maharashtra Breaking मानवाधिकाराच्या नावाखाली मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानला किती आहे काळजी?
पुणे : आज पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर राजकीय फराळ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. यात शहरातील सर्वच राजकीय पक्षातील नेते मंडळी ही एकत्र आले होते. यावेळी या राजकीय नेते मंडळीत चांगलीच राजकीय मैफिल तसेच नाष्ट्याबरोबर राजकीय फटाकेबाजीदेखील पाहायला मिळाली.