मुंबई - 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पूरपरीस्थितीचा आढावा घेतला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदीची तटकरे यांच्याशी चर्चा केली आहे. तात्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत. पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी दिले आहेत.