कोल्हापूर - इचंलकरंजी येथील ४ वर्षीय बालकाने कोरोनावर मात केली आहे. आज दुपारी त्या बालकाचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून तो कोरोनामुक्त झाला आहे. या बाळाला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून दक्षता म्हणून सीपीआर रुग्णालयात ठेवले आहे.
MAHA CORONA : राज्यात आज 841 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णांचा आकडा साडेपंधरा हजारांवर, दिवसभरात 34 मृत्यू - कोरोना अपडेट
20:48 May 05
राज्यात आज 841 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णांचा आकडा साडेपंधरा हजारांवर, दिवसभरात 34 मृत्यू
20:40 May 05
मुंबईमध्ये आज 635 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 9 हजार 758 वर
20:32 May 05
दिलासादायक..! मुंबईत आज एकाच दिवसात 350 रुग्णांना डिस्चार्ज
20:04 May 05
सोलापुरात आज 10 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 145 वर
19:55 May 05
धारावीमध्ये आज नवीन 33 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 665 वर
19:51 May 05
रत्नागिरीमध्ये कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण, एकूण बाधितांची संख्या 15वर
19:12 May 05
विप्रो पुण्यात उभारणार ४५० बेडचं विशेष कोविड रुग्णालय; महाराष्ट्र सरकार सोबत सामंजस्य करार
17:26 May 05
इचलकरंजीमधील ४ वर्षीय बालकाची कोरोनावर मात
12:50 May 05
नंदुरबार जिल्ह्यात मद्य विक्रीला परवानगी, सकाळपासूनच दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी
नंदुरबार- जिल्ह्यात मद्य विक्रीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज सकळापासूनच दारू खरेदीसाठी तळीरामांनी वाईन शॉप्सच्या बाहेर रांग लावल्याचे पाहायला मिळाले.
12:50 May 05
पुण्यात वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रुग्णालयाबाहेर नागरिकांची गर्दी
पुणे - लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या नागरिकांना आपापल्या मूळगावी जाण्यास परवानगी देण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. या नागरिकांना जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन नावनोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या नागरिकांना कोरोनासदृश्य आजार तर नाही ना याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्रही अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी उत्सुक असणारे नागरिक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत आहेत.
12:50 May 05
जळगावात आजपासून दारू विक्रिला परवानगी; तळीरामांची दुकांनांसमोर लांब रांग
जळगाव- जिल्ह्यात आजपासून दारू विक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सकाळपासूनच तळीरामांची दारूच्या दुकानांसमोर लांब रांगा लागल्याचे चित्र होते. दुकाने उघडण्यापूर्वीच अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे राहिले होते. तब्बल दीड महिन्यांनी दारू मिळणार असल्याने तळीराम खुश आहेत.
12:09 May 05
एसटीच्या 'स्मार्ट कार्ड' ला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या 'स्मार्ट कार्ड' योजनेला १५ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली आहे. यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू आहेत त्या भागातील प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहे.
12:08 May 05
सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक येत्या दोन दिवसात - उदय सामंत
रत्नागिरी - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, सीईटीच्या परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण विभागाला घ्याव्याच लागतील. याच परीक्षांसंदर्भातील अंतिम बैठक व्हीसीद्वारे आज (मंगळवारी) दुपारी 12 वाजता होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
11:38 May 05
नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी, 20 वर्षीय महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू
10:47 May 05
नंदुरबारमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कातील 15 जण क्वारंटाईन
नंदुरबार - नंदुरबार तालुक्यातील नटावद येथील 31 वर्षीय युवक कोरोनाबाधित आढळला आहे. त्याच्या संपर्कातील कुटुंबीय व मित्रांसह 15 जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून अन्य काहींचा शोध घेण्यात येत आहे. तसेच, गावात कंटेन्मेन्ट झोन जाहीर करण्यात आले असून प्रशासनाकडून गावात वेळोवेळी निर्जंतुकीकरण फवारणी केली जात आहे.
10:47 May 05
धुळ्यात 4 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत; 70 वर्षीय महिलेचीही कोरोनावर मात
धुळे - शहरातील हिरे सर्वोपचार रुग्णालयातून 4 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात एका 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे
09:45 May 05
हिंगोलीत आणखी 22 जवानांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; परिचारिकेलाही लागण
हिंगोली - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात सोमवारी रात्री आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात अजून 22 जवानांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे सामान्य रुग्णालयातील एका 24 वर्षीय परिचरिकेलाही कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे, आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली आहे.
09:45 May 05
पुणे विभागात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 364, तर जिल्ह्यात 2 हजार 103
पुणे - विभागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 वर पोहोचली असून 558 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्या 1 हजार 681 आहे. आतापर्यंत 125 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 86 रुग्ण गंभीर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले आहे.
09:44 May 05
औरंगाबादमध्ये 24 कोरोनाबाधितांची भर, रुग्णाचा एकूण आकडा 321 वर
औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. मंगळवारी सकाळी 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्येने त्रीशतक पूर्ण केले असून रुग्णसंख्या थेट 321 वर पोहचली आहे.
09:30 May 05

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 14 हजार 541 झाली आहे. सोमवारी नव्याने 771 रुग्णांचे निदान झाले आहे. तर सोमवारी राज्यात आज 350 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 2465 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.