ETV Bharat / state

Madhurav Boru To Blog : राजभवनात रंगला मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणारा मधुरव- बोरू ते ब्लॉग - of the birth of the Marathi language

मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणारा कार्यक्रम म्हणजे मधुरव बोरू ते ब्लाॅग या कार्यक्रमाचे नुकतेच राज्यपाल भवनात आयोजन करण्यात आले होते मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चांगलाच रंगला (Madhurav Boru To Blog)

Madhurav Boru To Blog
मधुरव, बोरू ते ब्लॉग
author img

By

Published : Jan 26, 2023, 2:25 PM IST

मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. याच मराठी भाषेच्या जन्मापासून ते आत्ता पर्यंत झालेला मराठी भाषेचा प्रवास, त्यातील गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन, नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण असलेला कार्यक्रम म्हणजे मधुरव - बोरू ते ब्लॉग. मराठी भाषेच्या जन्माची २००० वर्षांची संगीतमय कहाणी सांगणाऱ्या या नाट्यप्रयोगाचे नुकतेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख तसेच अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते.

Madhurav Boru To Blog
मधुरव, बोरू ते ब्लॉग

मधुरव : बोरू ते ब्लॉग ही मराठी भाषे बद्दल सार्थ अभिमान जागविणारी नाट्यकृती असून नाट्याचे प्रयोग सर्वत्र आणि विशेषतः महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक झाले पाहिजे असे प्रतिपादन यावेळी बोलताना राज्यप भगतसिंह कोश्यारी यांनी केले. तसेच मराठी भाषिक माणूस हा नाट्यप्रयोग पाहून अधिकाधिक प्रभावित होईल तसेच त्याला गौरवा वाटेल असे ही त्यांनी आवर्जून नमूद केले. याप्रसंगी त्यांनी या कार्यक्रमाला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Madhurav Boru To Blog
मधुरव, बोरू ते ब्लॉग

अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, निर्माते अभिजित साटम व डॉ समीरा गुजर यांच्या पुढाकाराने आयोजित या नाट्यप्रयोगाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ कलाकार साटम, प्रदीप वेलणकर, रजनी वेलणकर यांच्यासह दिगदर्शक आशुतोष गोवारीकर, अविनाश गोवारीकर, राजेश मापुस्कर, अभिनेत्री वंदना गुप्ते, सोनाली खरे, रसिका सुनील संगीतकार कौशल इनामदार, गायक मिलिंद इंगळे यांच्यासह अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक, मान्यवर व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

मधुरव - बोरू ते ब्लॉग ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी साकारली आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाश योजना शीतल तळपदे, वेशभूषा श्वेता बापट, अंकिता जठार, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला आले आहेत.

Madhurav Boru To Blog
मधुरव, बोरू ते ब्लॉग

हेही वाचा : Raundal marathi movie : 'ख्वाडा' आणि 'बबन'च्या यशानंतर भाऊसाहेब शिंदे झळकणार 'रौंदळ' चित्रपटात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.