ETV Bharat / state

'फसवणूक करून सत्तेत आलेल्या सरकारची कर्जमाफी देखील फसवीच' - farmers

सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देवून २ लाखांपर्यंतची कर्जमाफी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची बोचरी टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. अशा, विचित्र निकषात शेतकरी कसा बसणार असा सवालही उपस्थित करून भंडारी यांनी महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे.

mumbai
माधव भांडारी, भाजप प्रवक्ते
author img

By

Published : Dec 29, 2019, 8:27 AM IST

मुंबई - लोकांची फसवणूक करून सत्तेत आलेल्या सरकारची कर्जमाफी देखील फसवीच असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात घोषणा करताना या सरकारने सरसकट २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते या सरकारने पाळलेले नाही.

माधव भांडारी, भाजप प्रवक्ते

आधी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मागणी यांनीच विरोधात असताना लावून धरली होती. मात्र, आज त्यावर कुणी अवाक्षर देखील बोलत नाही. दुसरीकडे २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्यातही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. २ लाख रुपयांच्या आत कर्जाची रक्कम देण्याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार असून अनेकजण कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. ही कर्जमाफी फक्त सहकारी बँकांच्या भल्यासाठी असून त्या नक्की कुणाच्या ताब्यात आहेत. त्याचा फायदा नक्की कुणाला होणार आहे, हे सांगण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे फक्त मुद्दल २ लाख असून चालणार नाही तर, मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून कर्ज २ लाखांच्या आत असेल तरच कर्जमाफी मिळेल. अशा, विचित्र निकषात शेतकरी कसा बसणार असा सवालच भांडारी यांनी उपस्थित करून महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुराबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी १५ दिवसांपूर्वी आपण बंगला सोडला तेव्हा असे काहीही लिहिलेले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे पक्षासाठी याहून जास्त बोलणे योग्य नसल्याचे मत भांडारी यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - कुख्यात गुंड एजाजच्या मुलीला अटक, एजाजपर्यंत पोहोचण्यासाठी मुलीची चौकशी सुरू

अॅक्सीस बँकेतील खाती कशाला बंद करतायत ते त्यांनाच विचारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केल्यानंतर अमृता फडणवीस काम करत असलेल्या एक्सीस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवायला सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरीही जेव्हा ही खाती २००५ साली उघडण्यात आली तेव्हा शिवसेनाच ठाणे महापालिकेत सत्तेत होती. त्यामुळे, तेव्हा त्यांनी ती खाजगी बँकेत का काढली आणि आता सरकारी बँकेत का वळवली, ते त्यांच त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया भांडारी यांनी दिली.

मात्र, वर्षा बंगल्याच्या विषयात माजी मुखमत्र्यांची लहान मुलगी आणि एक्सीस बँकेच्या विषयात राजकारणात नसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खेचून विरोधक त्यांची कोती मानसिकता दाखवून देत असल्याची बोचरी प्रतिक्रियाही भांडारी यांनी दिली आहे.

हेही वाचा - फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत अॅक्सिस बँकेत खाते वळवले असतील तर चौकशी होईल- यशोमती ठाकूर

Intro:लोकांची फसवणूक करून सत्तेत आलेल्या सरकारची कर्जमाफी देखील फसवीच असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात घोषणा करताना या सरकारने सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं.मात्र ते या सरकारने पाळलेले नाही.

सगळ्यात आधी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मागणी यांनीच विरोधात असताना लावून धरली होती मात्र आज त्यावर कुणी अवाक्षर देखील बोलत नाही. दुसरीकडे 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यातही सरकारने शेतकर्यांची फसवणूक केलेली आहे. दोन लाख रुपयांच्या आत कर्जाची रक्कम देण्याचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होणार असून अनेक जण कर्जमाफी पासून वंचित राहणार आहेत. ही कर्जमाफी फक्त सहकारी बँकांच्या भल्यासाठी असून त्या नक्की कुणाच्या ताब्यात आहेत आणि त्याचा फायदा नक्की कुणाला होणार आहे हे सांगण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले. दुसरीकडे फक्त मुद्दल 2लाख असून चालणार नसून मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून कर्ज 2 लाखाच्या आत असेल तरच कर्जमाफी मिळेल. आशा विचित्र निकषात शेतकरी कसा बसणार असा सवालच भंडारी यांनी करून महाविकास आघाडी सरकारला जाब विचारला आहे.

वर्षा बंगल्यातील चित्र फडणवीस यांनी बांगला सोडला तेव्हा नव्हती

मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्याबाबत लिहिलेल्या आक्षेपार्ह मचकुराबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिल असून त्यांनी 15 दिवसांपूर्वी आपण बंगला सोडला तेव्हा अस काहीही लिहिलेलं नव्हतं अस स्पष्टीकरण दिल आहे. त्यामुळे पक्षासाठी याहून जास्त बोलणं योग्य नसल्याचं मत भंडारी यांनी व्यक्त केलं आहे.

एकसीस बँकेतील खाती कशाला बंद करतायत ते त्यांनाच विचारा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केल्यानंतर अमृता फडणवीस काम करत असलेल्या एकसीस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवायला सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने हा निर्णय घेतला असला तरीही जेव्हा ही खाती 2005 साली उघडण्यात अली तेंव्हा शिवसेनाच ठाणे महापालिकेत सत्तेत होती त्यामुळे तेव्हा त्यानी ती खाजगी बँकेत का काढली आणि आता सरकारी बँकेत का वळवली ते त्यांचं त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया माधव भंडारी यांनी दिली.

मात्र वर्षा बंगल्याच्या विषयात माजी मुखमत्र्यांची लहान मुलगी आणि एकसीस बँकेच्या विषयात राजकारणात नसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला खेचून विरोधक त्याची कोती मानसिकता दाखवून देत असल्याची बोचरी प्रतिक्रिया भंडारी यांनी दिली आहे.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.