VOTING UPDATES -
- मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालील प्रमाणे -
- मुंबई उत्तर - ५७.७६ टक्के, मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य) - ५३.५३ टक्के, मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) - ५४.५० टक्के, मुंबई उत्तर मध्य - ५१.४४ टक्के. मुंबई दक्षिण मध्य - अंदाजे 53.61 टक्के, मुंबई दक्षिण अंदाजे - 50.17 टक्के.
- जिल्ह्यात अंदाजे ५४.३० टक्के सरासरी मतदान झाले आहे. तर, मुंबई शहर जिल्हा मतदानाची टक्केवारी अंदाजे ५२ टक्के आहे.
- ईशान्य मुंबई मतदार संघात मतदारांना मतदार चिठ्या न मिळणे, मतदार यादीमध्ये नावात घोळ आदी कारणाने मतदानापासून वंचित राहावे लागले
- दोन बोगस मतदानाची प्रकारणे निदर्शनास आली आहे. त्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार केली. त्यावर कारवाई केली जात आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांची माहिती.
- वंचित बहुजन आघाडीकडूनही मतदार चिठ्या न आल्याबाबत नाराजी व्यक्त केली असून आघाडीकडूनही याबाबत तक्रार केली जाणार आहे.
- ५ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - ५४.७२ टक्के, वायव्य मुंबई - ५०.४४ टक्के, ईशान्य मुंबई - ५२.३० टक्के, उत्तर मध्य - ४९.४९ टक्के, दक्षिण मध्य ५१.५३ टक्के, दक्षिण मुंबई - ४८.२३ टक्के मतदानाची नोंद
- ३ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - ४४.६५ टक्के, वायव्य मुंबई - ४०.६३ टक्के, ईशान्य मुंबई - ४३.१२ टक्के, उत्तर मध्य - ३९.८४ टक्के, दक्षिण मध्य ४१.०९ टक्के, दक्षिण मुंबई - ३८.७६ टक्के मतदानाची नोंद
- २ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - ३२.९२ टक्के, वायव्य मुंबई - ३०.०० टक्के, ईशान्य मुंबई - ३०.५९ टक्के, उत्तर मध्य - २८.३६ टक्के, दक्षिण मध्य २८.४२ टक्के, दक्षिण मुंबई - २७.१३ टक्के मतदानाची नोंद
- सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांनी वांद्रेच्या मतदान केंद्र २०३ वर केले मतदान
- सलमान खान, सलीम खान आणि सलमा खान यांनी वांद्रे येथील बूथ क्र. २८३ येथे बजावला मतदानाचा हक्क
- प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी जुहू येथे केले मतदान
- अभिनेत्री करिना कपूरने बजावला मतदानाचा हक्क
- भाजपच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यांचे पती झुबीन इराणी यांच्यासह वर्सोवा येथे केले मतदान
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबासहित नवजीवन विद्या मंदिर, वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
- १२.१० - मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने केले मतदान
- १२.०१ - हेमा मालिनी आणि ईशा देओलने बजावला मतदानाचा हक्क
- ११:४८ - बॉलिवूड क्वीन कंगना रनौतने मुंबईच्या खारमध्ये केलं मतदान
- ११.२८ - गुलजार यांनी बजावला मतदनाचा हक्क
- ११.२७ - अभिनेता इम्रान हाश्मीने वांद्रे येथे नोंदवले मत
- ११.०८ - अनुपम खेर यांनी जुहूमध्ये बजावला मतदानाचा हक्क
- ११.०२ - अभिनेत्री भाग्यश्रीने बजावला मतदानाचा हक्क
- १०:४३ - अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी बजावला मतदानाचा हक्क
- सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - १९.४६ टक्के, वायव्य - १७.६४ टक्के, ईशान्य - १८.३९ टक्के, उत्तर मध्य - १६.२१ टक्के, दक्षिण मध्य १६.८० टक्के, दक्षिण मुंबई - १५.५१ टक्के मतदान
- ११.५५ - राज ठाकरे यांनी दादरच्या बालमोहन शाळेत केले मतदान
- ११.०० - ११ वाजेपर्यंत दक्षिण मध्य मतदारसंघात ११.०० टक्के तर मुंबई दक्षिण मतदारसंघात १५.६० टक्के मतदानाची नोंद
- ९.३५ - दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी पत्नी कामिनी शेवाळे यांच्यासह मानखुर्द येथे मतदानाचा हक्क बजावला
- ९.३० - सकाळी ९ वाजेपर्यंत उत्तर मुंबई - 7.85 टक्के, वायव्य - 6.90 टक्के, ईशान्य - 7.00 टक्के, उत्तर मध्य - 5.98 टक्के, दक्षिण मध्य 6.45 टक्के, दक्षिण मुंबई - 5.91 टक्के मतदान
- ९.०१ - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकारी विद्यामंदिर, पेडर रोड, मुंबई येथे केले मतदान
- ८.२४ - ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे यांनी जूहू येथे केले मतदान
- ८.४० - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळी सी फेस येथे बजावला मतदानाचा हक्क
- ७.५० - वायव्य मतदारसंघ - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कुटुंबासहित बजावला मतदानाचा हक्क
- ७.४५ - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी बजावला मतदानाचा हक्क
- ७.४० - ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांनी पत्नी स्वरूप संपत यांच्यासह विले पार्लेच्या जामनाबाई शाळेत बूथ क्र. २५०-२५६ वर केले मतदान
- ७.३९ - अभिनेत्री आणि काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क
- ७.३८ - वायव्य मतदारसंघ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे भाजप उमेदवार रवी किशन यांनी गोरेगावच्या मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क
- ७.३४ - दक्षिण : अनिल अंबानी यांनी जी़डी स्वामानी शाळेतील बूथ नं. २१६ कपी परेड येथे केले मतदान
- ७.३६ - दक्षिण : पेडर रोड येथे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी बूथ नं ४०, ४१ वर केले मतदान
- ७.३२ - उत्तर मध्य : भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी वरळीच्या बूथ क्रमांक ४८ वर केले मतदान
- 7.25 - दक्षिण मतदारसंघ : स्वाती पारेख या मतदार आजारी होत्या. तरीही त्यांनी मतदानाचे कर्त्तव्य पूर्ण करुन हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या
- 7.24 - दक्षिण मतदारसंघ : सरकारी विद्यामंदिर ताडदेव येथे एक मतदार मतदान करुन येताना कोसळून पडला
- 7.22 - उत्तर मध्य मतदारसंघ : सिनेअभिनेत्री रेखा यांनी वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क
- केंद्रात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज देते मुंबई
- देशात कुणाची सत्ता येणार, याचा कल मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांच्या निकालावरून कळतो, असा आजवरचा इतिहास आहे. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहिला असता मुंबईत जो पक्ष बाजी मारतो, त्याचीच केंद्रात सत्ता यते, असेच एकंदरीत चित्र राहिले आहे. यावेळीही मुंबईत या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
- २०१४ मध्ये मुंबईतील सहाच्या सहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत शिवसेना-भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धोबीपछाड दिला होता. तेव्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले. त्याअगोदर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने मुंबईत बाजी मारत सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडीचे सरकार दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आले होते.
- २००४ मध्ये मुंबईत शिवसेनेच्या मोहन रावलेंचा अपवाद वगळता सहापैकी पाच जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळवला होता. त्यामुळे केंद्रात वाजपेयी सरकारचा पराभव करत काँग्रेसने मित्रपक्षांच्या साथीने सत्ता हस्तगत केली होती.
- १९९९ च्या लोकसभेत वाजपेयींच्या नेतृत्वाखाली भाजपने छोट्या-मोठ्या पक्षांना साथीला घेत केंद्रातील सत्ता हस्तगत केली. त्या वेळी मुंबईत काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली होती. सुनील दत्त एकटे काँग्रेसकडून विजयी झाले होते. उर्वरित पाच जागा शिवसेना आणि भाजपने जिंकल्या होत्या.
- १९९८ मध्ये वाजपेयींच्या नेतृत्वाखाली अवघ्या तेरा दिवसांचे सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. त्या वर्षी मुंबईतील सहाच्या सहा जागा शिवसेना आणि भाजपने जिंकल्या होत्या. ही बाब लक्षात घेता हीच परंपरा २०१९ च्या निवडणुकीतही कायम राहणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.