मुंबई - लोकल रेल्वेमध्ये महिलांचा डबा राखीव असल्याचे दर्शवणारे साडीतील महिलेचे चित्र आपले लक्ष वेधते. पण, हे चित्र आता लवकरच बदलणार आहे. बदलत्या काळानुसार यात देखील बदल करण्यात आले आहेत. या टिकाणी आधुनिक पेहरावातील महिलेचे चित्र लावण्यात येणार आहे.
लोगो बदला व्यतिरिक्त डब्यातील अंतर्गत भागात बँडमिंटनपटू सायना नेहवाल, क्रिकेटपटू मिताली राज, अंतराळवीर कल्पना चावला या प्रेरणा देणाऱ्या महिलांचा फोटो लावण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस आहे.
सध्या १२ कोचमध्ये प्राथमिक स्तरावर हा बदल केला जाईल. आधुनिक पेहराव घातलेली, हाताची घडी व चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत असलेल्या आधुनिक स्त्रीचे चित्र निश्चित करण्यात आले आहे. लवकरच ते पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या डब्याबाहेर झळकेल.
यामुळे महिला डबा राखीव असलेला स्पष्ट होण्यास मदत होईल. पश्चिम रेल्वेवरील ११० रॅकना चित्रित करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.