मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई विभागातील मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर सध्या 350 निवडक उपनगरी फेऱ्या चालविण्यात येत आहेत. सोमवार 13 जूलैपासून आणखी दोन अतिरिक्त सेवा ठाणे-वाशी दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर चालविण्यात येतील.
मध्य आणि हार्बर मार्गावर आतापर्यंत 350 लोकल फेऱ्या सुरू होत्या, त्यात आता सोमवारपासून ठाणे ते वाशी दरम्यान अतिरिक्त दोन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. या सेवा फक्त राज्य सरकारद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रेल्वेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असतील. राज्य शासनाने निश्चित केलेल्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना या निवडक उपनगरी सेवांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल. इतरांनी स्थानकावर गर्दी करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
वाशी येथे जाण्यासाठी विशेष लोकल ट्रेन ठाणे येथून सकाळी निघेल आणि ठाण्याकरिता विशेष ट्रेन वाशी येथून संध्याकाळी सुटेल. या विशेष ट्रेन रबाळे, कोपरखैरणे, तुर्भे आणि सानपाडा या स्थानकांवर थांबतील.