ETV Bharat / state

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आजपासून लोकलचे दरवाजे उघडणार

लोकल रेल्वेगाड्यांमधून डबेवाल्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा कोड मिळाल्यानंतरच डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून हे क्यूआर कोड दिले जाणार आहेत.

डब्बेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले
डब्बेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले
author img

By

Published : Oct 1, 2020, 1:34 AM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील डबेवाल्यांना लोकल ट्रेनमधून प्रवासाची परवानगी नसल्याने त्यांचे आर्थिक गणित बिघडले होते. अनेक दिवसांपासून रेल्वेतून प्रवास करू द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनानी केली होती. त्यामुळे त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत राज्य सरकारने लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देत डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले केले आहेत.

मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आजपासून लोकलचे दरवाजे उघडणार

राज्य सरकारने अनलॉक-5 मध्ये काही गोष्टी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाउनमध्ये आणखी शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून अनेक गोष्टींवरील निर्बंध हटवले आहेत. राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

लोकल रेल्वेगाड्यांमधून डबेवाल्यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी डबेवाल्यांना क्यूआर कोड दिला जाणार आहे. हा कोड मिळाल्यानंतरच डबेवाल्यांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडून हे क्यूआर कोड दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने डबेवाल्यांची गेली 6 महिन्याची व्यथा लक्षात घेता अनलॉक- ५ च्या जाहीरनाम्यात मुंबईच्या डबेवाल्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ तसेच नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टच्या वतीने आभार मानतो. तसेच कोरोना विषाणूसंदर्भात शासनाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. तसेच कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेऊन पुन्हा एकदा सेवा सुरू करण्यात येईल, असे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.