ETV Bharat / state

अधिवेशनात कोणते नेते काय म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून काळा अध्याय लिहिला गेला- फडणवीस

author img

By

Published : Jul 6, 2021, 10:57 AM IST

Updated : Jul 6, 2021, 5:21 PM IST

leaders reaction
leaders reaction

17:18 July 06

वर्ष २०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता, नाना पटोलेंनी केला गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना फोन टॅपिंगचे गंभीर आरोप केले. '२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता. तेंव्हा मी खासदार होतो, असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्यासाठी अमजद खान, असा कोड वापरण्यात येत होता, असेही ते म्हणाले. त्यासोबतच रावसाहेब दानवे स्विय साहायक, तसेच खासदार संजय काकडे यांचेही फोन टॅप करण्यात आला होते, अशी माहितीही नाना पटोलेंनी दिली. नाना पटोलेंच्या या आरोपानंतर सभागृहातील अनेक सदस्यांनी या प्रकणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

17:04 July 06

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच - फडणवीस

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला कौरवाची उपमा दिली आहे. ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. तसेच, पांडवांनी कौरवांना केवळ सात गावं मागितली होती. पण सुईच्या टोका एवढीही जागा देणार नाही, असं दुर्योधन म्हणाला होता. याचा अर्थ काय होतो, दुर्योधनाचा अहंकार शिगेला पोहोचला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच ठाकरे सरकारचा अहंकारही शिगेला पोहोचला आहे. डोक्यात अहंकार घेऊन आलेले हे सरकार आहे. त्यामुळे दुर्योधन कोण? दुशासन कोण? आणि भीष्म पितामह कोण? हे तुम्हीच ठरवा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

12:18 July 06

विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला - फडणवीस

भाजपच्या प्रतिसभागृहावर कारवाईनंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक

  • कितीही दहशत माजवली तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही - फडणवीस
  • अध्यक्ष्यांच्या आदेशावरुन माध्यमांना धक्काबुक्की केली जातेय, ही हुकूमशाही आहे
  • आम्ही सरकारविरोधात बोलणार, यांचे पितळ उघडे पाडणार
  • महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रयत्न
  • भास्कर जाधवांकडून आम्हाला धोका आहे - फडणवीस
  • विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेला - फडणवीस
  • लोकशाहीची हत्या सुरु आहे.

11:22 July 06

शिस्तीसाठीच निलंबन, नाहीतर सदनात दंगली होतील - संजय राऊत

भाजपच्या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई होणे हा शिस्तीचा भाग आहे. नाहीतर सदनात दंगली होतील असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. भाजपच्या 12 आमदारांचं वागणं अतिशय चुकीचं होतं. ते वेलमध्ये गेले हे आम्ही पाहिलं आहे. तालिका सभेचे अध्यक्ष भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की, त्यांना धक्काबुक्की झाली, शिवीगाळ झाली. सर्वोच्च न्यायालयाचं एक जजमेंट आहे, ज्यामध्ये कोर्टाने नमूद केलं आहे की, आमदारांचं किंवा खासदारांचं आशा प्रकारचं वर्तन सहन करता कामा नये. १२ आमदारांचं निलंबन हा शिस्तीचा भाग आहे. जर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. जे आम्ही पाकिस्तानच्या सभागृहात पाहिलं आहे. बिहार, उत्तरप्रदेशच्या सभागृहात आम्ही हे पाहिलं आहे तिथं दंगली उसळल्या आहेत. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये यासाठी आशा प्रकारचा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे राऊत म्हणाले. 

11:02 July 06

प्रवीण दरेकर यांची ठाकरे सरकारवर टीका

  • अधिवेशनाचा पहिला दिवस शासकीय ठराव, मराठा आरक्षण, इम्पेरिकल डेटा यावर गेला
  • आपली काम करता आली नाही आणि केंद्रावर ढकलण्याचे काम इम्पेरिकल डेटा निमित्त केले, कृषिविधेयक बाबतपण तेच हेच करणार आहेत
  • चांगल्या कायदा आहे, सरकारला विनंती आहे, चर्चा हाऊद्या
  • काल विरोधकांना बोलू दिले नाही
  • ओबीसीचा मुद्दा असता सोमवारी अचानक मराठा आरक्षणासंदर्भात बोलले

  • लसीकरणाबद्दल केंद्राचे आभार मानायला हवेत
  • देशात सगळ्यात जास्त लसीकरण महाराष्ट्राने केले
  • एक रुपया आपण खर्च नाही केला, केंद्राने लस दिली
  • मागणी असेल लसीची आम्ही प्रयत्न, करू, कृतज्ञात नको

  • राज्यात कशा पद्धतीने काम सुरू आहे ते जनतेच्या दरबारात जाऊन सांगू
  • कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात घालणार नाही, काळजी घ्यावी
     
  • एमपीएससीबाबत, आमच्या मागणीला हरताळ फसण्याचा काम केले
  • स्वप्नीलचा बळी गेल्यानंतर सुद्धा सरकारला कळलेलं नाही
  • योग्य ती मदत करावी, तर योग्य वेळी करा

09:07 July 06

कोर्टात जाऊन भाजपला काही फायदा होईल असे वाटत नाही - छगन भुजबळ

'कोर्टात जाऊन भाजपला काही फायदा होईल असे वाटत नाही'

निलंबनाच्या विरोधात भाजपचे आमदार कोर्टात जात असतील तर जाऊ द्या, मात्र कोर्टात गेल्याने काही फायदा होणार नाही, असे मला वाटते असे मत राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कोर्टानेच सदनात होणाऱ्या बेशिस्तीवर ताशेरे ओढलेले आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन काही फायदा होणार नाही असे वाटत असल्याचे भुजबळ म्हणाले. याशिवाय कालचा प्रकार राज्यपालांसह संपूर्ण राज्याने बघितला आहे. त्यामुळे राज्यपालही यावर भाजपसाठी सकारात्मक भूमिका घेतील असे वाटत नसल्याचे भुजबळ म्हणाले.

Last Updated : Jul 6, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.