- परमबीर यांच्यासोबत माझी भेट झाली, १०० कोटी कुणाकडे गेले याचा उल्लेख पत्रात नाही. बदली झाल्यावर परमबीर यांनी आरोप केले आहेत. परमबीर बदलीबाबत मला भेटले होते. आयुक्त असताना परमबीर यांनी कोणतेही आरोप केले नाहीत. त्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत- शरद पवार
- मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांवरील आरोपांबाबत चौकशी करुन निर्णय घ्यावा, सखोल चौकशी व्हायला हवी. चौकशीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. परमबीर यांनी पत्रात आरोप केले, पण पुरावे नाहीत. सरकारवर या घटनेचा कुठलाही परिणाम होणार नाही. सरकार स्थिर, धोका नाही - पवार
- वाझेंना नियुक्ती देण्याचा निर्णय गृहमंत्र्यांचा नाही तर परमबीर यांचा होता - शरद पवार
LIVE : परमबीरसिंह यांच्या लेटर बॉम्बने अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या - मनसुख हिरेने मृत्यू प्रकरण
14:17 March 21
सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरुय पण त्यात यश येणार नाही - शरद पवार
14:12 March 21
अनिल देशमुखांच्या गृहमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतली - शरद पवार
13:16 March 21
मनसुख हिरेन हत्येप्रकरणी दोघांना अटक; एका बडतर्फ पोलिसाचा समावेश
ठाणे - मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एटीएसने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका पोलिसाचा समावेश आहे. नरेश ढेरे व विनायक शिंदे अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यातील विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील आरोपी असून मुंबई पोलीस खात्यांमधून त्याला बडतर्फ केलेले आहे. कोरोना काळामध्ये शिंदे पॅरोलवर बाहेर आला होता. तो सचिन वाझेंच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला आहे.
13:14 March 21
भाजपाकडून महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी रचलेले हे कुभांड आहे - सचिन सावंत
- विरोधी पक्षाची सरकारे टिकू दिली जात नाहीत, ते पाडण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची भारतीय जनता पक्षाची तयारी.
- केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून राजकीय फायदा घेतला जातो.
- गोदी मीडिया न्याय दानाची प्रक्रिया पार पाडत आहे, त्यामागचे तथ्य जाणून घेत नाहीत.
- महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे कुभांड या माध्यमातून भाजपकडून रचले जात आहे.
- महाराष्ट्रातील कायदे व्यवस्था बिघडवणे हे भाजपाचे षडयंत्र आहे.
- प्रशासकीय अधिकाऱ्यांने आरोप करणे हे पहिल्यांदा झाले नाही..
- गुजरातमध्ये डीजी बंजारा यांनी तत्कालीन गृहमंत्री शाहांवर आरोप केले होते. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल सावंत यांनी केला.
- तसेच आरोप संजीव भट यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला होता का? त्याची उत्तरे आता द्यावा.. विरोधी पक्ष बेजबाबदारपणे काम करत आहे..
- परबीरसिंह यांच्या अत्यंत जवळच्या सहकार्याला अटक झाली. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा दबाव असेल
- डान्स बार बंद होते, मग वसुली कशी..
- फेब्रुवारीत सचिन वाझे गृहमंत्र्यांना भेटले आहे, असे म्हटले जाते.. तर त्या काळात आम्ही झुमद्वारे बैठका घेत होतो... मग हे कसे शक्य आहे..
- त्या भेटीबाबत तुम्ही का स्पष्ट केले नाही..
- १६ तारखेला चॅटिंगमधील अर्जट हा शब्द एवढ्या दिवस का सुचले नाही हेच सुचवते..
- एटीएस चौकशी करत असताना लगेच हा तपास केंद्रीय तपास यंत्रणाकडे कसा जातो
- तिहारझेलमध्ये मोबाईल कसे पोहोचले.. त्याची चौकशी का नाही..
- मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या संदर्भात गृहमंत्री देशमुख यांनी एसआय़टी मार्फत चौकशी करण्याचा हट्ट केल्याचा पत्र उल्लेख केला. कारण यामागे यात भाजप नेत्यांचा नाव आहे. त्या प्रफुल्ल पटेल यांचा राजीनामा का घेतला नाही.. त्या प्रकरणात डेलकर यांनी पंतप्रधान मोदी, शाह यांना पत्र लिहले त्याबद्दल का कारवाई नाही.
11:58 March 21
अँटिलिया बॉम्ब प्रकरणाचा केंद्राने तपास करावा; अनेक चेहरे समोर येतील - राज ठाकरे
- परबीरसिंह यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यावर आरोप केले. अशी घटना महाराष्ट्राच्या इतिहासात घडली असेल असे वाटत नाही.
- परबीरसिंह यांना एक वर्ष झाले असेल, त्यामुळे १२०० कोटी दिले असतील, असा सवाल राज यांनी केला.
- एका आयुक्तांकडून हा आकडा समोर आला, तर मग राज्यभरातून किती वसुली याची चौकशी झाली पाहिजे
- अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला हवा, आणि त्यांचीही चौकशी झाली पाहिजे.
- या प्रकरणात मुळ विषय़ाला बगल दिली जात आहे. अंबानीच्या घराबाहेरील स्कॉर्पियो प्रकरणाला बगल दिली जाता कामा नये,
- बॉम्ब पोलीस ठेवतात हे पहिल्यांदाच ऐकले.
- परमबीर सिंह यांना का हटवले? हे सरकारने का सांगितले नाही, ते या प्रकरणात सहभागी होते तर त्यांची चौकशी करण्याऐवजी त्यांना का हटवले? असा सवाल राज ठाकरे यांनी केला
- मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. त्या गाडीत ठेवलेले जिलेटेने आले कुठून? गाड्यांबाबत माहिती समोर आली.
- वाझे प्रकरणात पाहिले ख्वाजा युनूस प्रकरणात १७ वर्षे हा व्यक्ती निलंबित होता. त्यानंतर भाजप सेनेचे सरकार आले. त्यानंतर वाझेंचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यांना शिवसेनेत कोण नेले?
- वाझेंना पोलीस खात्यात रुजू करा असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. याचा अर्थ वाझे मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा माणूस.
- तसेच मुख्यमंत्री आणि अंबांनीचेही मधुर संबंध आहेत, ते शपथ विधीला हजर राहिले होते
- मग वाझे कोणाच्या तरी सूचनेशिवाय अंबानीच्या गाडी ठेवण्याचे धाडस करणार नाही, अशी शंका राज यांनी उपस्थित केली.
- केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप करावा-
- केंद्राकडून याची निस्पक्ष चौकशी झाल्यास मी फटाक्यांची माळ लावेन
- यात अनेक जण आत जातील
- मुकेश अंबानीच्या सुरक्षेसाठी इस्त्रालयी सुरक्षा व्यवस्था आहे. तसेच मध्यप्रदेश पोलिसांची सुरक्षा आहे, असे असताना तिथे गाडी ठेवली जाते.
- त्यांना लिहलेले पत्र वाचले असता,धमकी देणारा आदराने बोलतो का? तो माणूस गुजराती लकबीमध्ये बोलतो, असेही राज यांनी म्हटले आहे
- त्या पत्रावरून अशा प्रकारचे धाडस पोलीस करू शकत नसल्याेचही ते म्हणाले,
- ज्या मुख्यमंत्र्यांचे अंबानींशी संबंध आहेत, तिकडे पोलीस पैसे खायला कशाला जातील..? असा सवालही त्यांनी केला
- त्यामुळे हे प्रकरण वेगळे आहे. ही गाडी कोणी ठेवली आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली..याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
- त्यामुळे केंद्राने या प्रकरणाचा तपास करावा...
- महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, कोरोना वाढतोय , मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. बेरोजगारी वाढली आहे..
- पोलीस भ्रष्टाचारी आहेत म्हणतात , मग पोलिसांनाच वसुली करायला लावणे म्हणजे लाजीरवाणे
- जर महाराष्ट्राचे गृहमंत्री असे बारमध्ये जाऊन पैसे गोळा करायला लावणे म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे
- केंद्राने यात हस्तक्षेप करावा, तसे नाही झाले तर देश आराजकतेकडे जात आहे.
11:20 March 21
ठाकरे सरकार वसुली सरकार ठाकरे सरकार खंडणीबाजांचे सरकार! - शेलार यांची टीका
एका महिन्याला १०० करोडोची वसुली द्या म्हणणारा गृहमंत्री आणि त्याच्याविरोधात आवाज उठवणारा आयुक्त यांनी महाराष्ट्राची जगभरात बदनामी केली. याचे पाप केवळ ठाकरे सरकारचे आहे. कुणी मागणी न करता मदिरालये उघडणारे सरकारे आहे. हे पब पार्टी गँगचे सरकार आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरे द्यावे लागतील अशी टीका शेलार यांनी केली आहे.
11:12 March 21
आरोप धक्कादायक, गृहमंत्री अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा; फडणवीसांची मागणी
नागपूर - सरकार वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी सादर केलेला चॅट हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नौतिक भूमिका घेऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावरून आता राज्यातले वातावरण तापले आहे.
11:11 March 21
काही तरी दुरुस्त करावे लागेल- संजय राऊत
पोलीस अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांवर आशा प्रकारचे आरोप होणे हे दुर्दैवी आहे. ज्यांनी हे सरकार यावे म्हणून खारीचा वाटा उचलला अशा आमच्या सारख्यांसाठी हे धक्कादायक आहे. प्रत्येकाने आपले पाय नक्की जमिनीवर आहेत का? हे तपासले पाहिजेत. माझी यात वैयक्तिक भूमिका नाही. मात्र पोलीस प्रशासन हा कोणत्याही सरकारचा कणा असतो. पोलिसांकडे आम्ही कणा म्हणून पाहतो, आमची राजवट देखील उत्तम चालली आहे, पण काही तरी दुरुस्त करावे लागेल, असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणात खंत व्यक्त केली आहे.
11:10 March 21
परमबीर सिंहांच्या लेटर बाॅम्बने सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले - संजय राऊत
नाशिक - मुंबईचे माजी पोलीस आतुक्त परमबीर सिंह हे चांगले अधिकारी आहेत. त्यांच्या पत्राने सरकारवरच्या प्रतिमेवर शिंतोडे नक्कीच उडाले. हे मान्य करण्याचा आमच्यात मोठेपणा आहे. लेटरची सत्यता तपासून पाहिली जाईल. मुख्यमंत्री आणि शरद पवार यात लक्ष देतील व योग्य निर्णय घेतील, असे मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबिरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्रातून गंभीर आरोप केले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत बोलत होते.
11:10 March 21
शरद पवारांनी दिल्लीत बोलावली राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. शरद पवारांनी अजित पवार आणि जयंत पाटील यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर लावलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची शक्यता नाकारता येत नाही.
11:05 March 21
विरोधी पक्षनेते दरेकर यांचे अनिल देशमुखाविरोधात आंदोलन
11:02 March 21
मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा; पुण्यात चंद्रकांत पाटलांचे आंदोलन
गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधातील लेटरबॉम्ब नंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राज्यभरात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. १००कोटी रुपये वसुली प्रकरणाचा मुद्दा उपस्थितीत करत चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप
मुख्यमंत्र्यांना नीतिमत्तेची चाड असेल तर त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा
11:01 March 21
नागपुरात भाजपच्या वतीने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन; देशमुखांचा पुतळा जाळला
नागपूरात भाजपच्या वतीने संविधान चौकात माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी वातावरण तापवले आहे. संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. तसेच भाजपा युवा मोर्च्याच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर पुतळा जाळून निषेध केला आहे. यावेळी भाजपायुमोच्या आंदोलकांना पोलीस अटक केली आहे.
10:56 March 21
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवारांची दिल्लीत भेट घेणार-
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच देशमुख यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या प्रकरणात गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घेणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कालच स्पष्ट केले. मात्र, आज अजित पवार आणि जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीला जात आहेत. त्यामुळे राज्यात आज मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
10:50 March 21
ते पत्र माझ्याच ईमेल आयडीवरून पाठवले आहे; परबीरसिंहाचे स्पष्टीकरण
दर महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस अधिकारी सचिन वाझेला देण्यात आल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या कथित पत्रामध्ये केला आहे. त्या ईमेलची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. कारण परमबीर सिंग यांनी पाठविलेल्या पत्रावरून राज्यातील वातावरण तापले असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून पत्राची खातरजमा करण्यात येत आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर शनिवारी दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, त्यावर केवळ नाव लिहिलेले असून त्यावर स्वाक्षरी नाही. पत्र हे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच पाठविले की नाही, याबाबत शहानिशा सुरू असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले होते. त्यावर परबीरसिंह यांनी तो माझाचा ईमेल आयडी असल्याचा खुलासा केला आहे.
10:37 March 21
आतापर्यंत किती पैसे दिले असतील; अनुराग ठाकुरांचा सवाल
मुंबई पोलीस दलाच्या माजी आयुक्तांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप लावले आहेत. याची कल्पना केल्यास आपणास लक्षात येईल की एका महिन्यात एका पोलीस आयुक्ताला 100 कोटीची द्यावे लागत असतील, मग त्यांच्या नियुक्तीपासून आतापर्यंत त्यांनी किती पैसे दिले असा प्रश्न केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात कोण कोण सामिल आहे. जर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे पैसे देण्याच्या गोष्टी होत असतील तर आपण कल्पना करू शकता मुंबई शिवाय इतर जिल्ह्यातून किती पैसा येत असेल. या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष घालणार का असा सवाल अनुराग ठाकुर यांनी केला आहे.
10:36 March 21
पुण्यात अनिल देशमुखांविरोधात भाजपाचे आंदोलन
अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,चंद्रकांत पाटील
10:24 March 21
अनिल देशमुखांविरोधात भाजपची राज्यभरात आंदोलने; राजीनाम्याची मागणी
मुंबई - अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंना अटक आणि मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली झाल्यानंतर अनेक खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. त्यामध्ये परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बने महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटीची वसुली करायला सांगितल्याचा आरोप परबीरसिंह यांच्या लेटरमध्ये झाला. त्यानंतर विरोधकांनी देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संजय राऊत यांनी देखील नाराजीचा सुर व्यक्त केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देशमुखांची पाठराखन केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज दिवसभरात घडणाऱ्या घडामोडीचे अपडेट... वाचा ईटीव्ही भारतवर