ETV Bharat / state

Live Sex App Case : केवळ हजार रुपयात ॲपवरून लाईव्ह सेक्सचा आनंद; दोन तरुणींसह तरुणाला फ्लॅटमधून अटक

Live Sex App Case : अंधेरीतील एका निवासी फ्लॅटमध्ये वर्सोवा पोलिसांनी धडक कारवाई करत 'लाईव्ह सेक्स व्हिडिओ' प्रक्षेपित करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. (Live Sex Video App) सोशल मीडियावर एक ॲप आहे. (Live Sex Video Makers Arrested) या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सेक्स दाखवण्यासाठी सभासदांकडून एक हजार पासून वेगवेगळ्या रकमेचा मोबदला म्हणून पैसे घेतले जात असत. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Live Sex App Case
लाईव्ह सेक्स व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 4:08 PM IST

मुंबई Live Sex App Case : मुंबईत लाईव्ह सेक्स प्रकरणी तनिषा राजेश कनोजिया, रुद्र नारायण राऊत आणि तमन्ना आरिफ खान अशी अटक आरोपींची नावं आहेत. (Live Sex Video App Revealed) या आरोपींचा या गुन्ह्यात समावेश असून अटकेनंतर तिघांनाही वांद्रे न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यामध्ये ॲपचा मालक आणि चालक आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Mumbai Crime)

एक हजारात लाईव्ह सेक्स पाहण्याची संधी : ही गँग लाईव्ह सेक्स पाहण्यासाठी सभासद फी म्हणून एक हजार रुपये ते पुढे कितीही रक्कम घेत असल्याचं तपासात उघडकीस आलं. अंधेरीतील एका फ्लॅटमध्ये पोलिसांनी ही कारवाई केल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांनी सांगितलं. ॲपचे एक हजार रुपये भरून सभासद झाल्यास तुम्हाला 'लाईव्ह सेक्स' पाहण्याची संधी मिळते, अशी माहिती वर्सोवा पोलिसांना मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी 'गुगल प्ले स्टोअर'वरून संंबंधित ॲप डाऊनलोड केलं होतं. ते ॲप ओपन केल्यानंतर त्यात पोलिसांना काही अश्‍लील व्हिडिओ दिसून आले.

पोलिसांची फ्लॅटवर छापेमारी : त्यानंतर तांत्रिक माहितीवरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, उपनिरीक्षक मनोज हावळे, नागेश मिसाळ, अर्चना कोळी, अंमलदार आवारी, चव्हाण, किंजलकर यांनी अंधेरीतील वर्सोवा, चारबंगला, मॉडेल टाऊन, शिल्प प्रसाद इमारतीच्या फ्लॅट क्रमांक तीनमध्ये छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी तनिषा कनोजिया, रुद्र राऊत आणि तमन्ना खान या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत याच फ्लॅटमध्ये तनिषा राहत असून 'लाईव्ह सेक्स'साठी याच फ्लॅटचा वापर होत असल्याचं उघडकीस आले.

ॲपच्या मालकासह चालकही आरोपी : त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नागेश मिसाळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संविधान कलमांसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात रविवारी सकाळी तिघांना पोलिसांनी अटक केली. या अटकेनंतर त्यांना दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची आता पोलिसांकडून चौकशी होणार आहे. दरम्यान या गुन्ह्यात ॲपच्या मालकासह चालकाला आरोपी दाखविण्यात आले. त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा:

  1. जोडप्याचं विचित्र कृत्य, चालत्या बाईकवर करु लागले अशी गोष्ट... Video पाहून सगळ्यांना बसला धक्का
  2. शिवसेनेच्या आमदारांची व्हिडिओ कॉलवरून सेक्स चॅटकरून फसवणूक; राजस्थानमधून आरोपीला केली अटक
  3. Sex Video Call Center Mumbai फोन आणि सेक्स व्हिडिओ कॉल सेंटरचा पर्दाफाश, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.